Maharashtra News Updates 17 January 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jan 2023 10:19 PM
Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.


राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे याठिकाणी पोलिसांनी टाकला छापा.


कोल्हापूर पोलिसांनी चार जणांना घेतलं ताब्यात.


सोनोग्राफी मशीनसह 2 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त.


गर्भलिंग निदान करणारे आणि एजंट राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील.

मोदींच्या आगमनासाठी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी

मुंबईतील विविध विकास कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारी रोजी मुंबईत येत आहेत. यासाठी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीकेसी येथे एक मोठी सभा होणार आहे, या सभेला दोन्ही गटाचे हजारो कार्यकर्ते येणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आपल्या विभागात मोठ्या प्रमाणात बॅनर, गळ्यातील पट्टे , टोप्या, झेंडे हे पक्ष कार्यालयातून पाठवले जात आहेत. बाळासाहेब भवन या शिंदे गटातील कार्यालयातून हे काम सध्या सुरू आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र - ठाकरे गटाच्या आमदाराचा आरोप

अखेर नितीन देशमुखांची अडीच तासांनंतर चौकशी पुर्ण झालीय. अमरावती येथील एसीबीच्या विभागीय कार्यालयात तब्बल अडीच तासांपासून नितीन देशमुखांची चौकशी सुरु होती. दुपारी 12.50 वाजता ही चौकशी सुरू झाली होती.. तब्बल अडीच तासांनंतर दुपारी 3.16 वाजता देशमुख एसीबी कार्यालयातून बाहेर आलेय. यावेळी आमदार नितीन देशमुखांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर अनेक गंभीर आरोप केलेय. 


 


 माझी चौकशी करताना एसीबीचे अधिकारी प्रचंड दबावात. तो दबाव त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होताय. 

 बेहिशेबी मालमत्तेचे आरोप झाल्यानंतर मतदारसंघात झालेली बदनामी कोण भरून काढणार. 

 यापुढे चौकशीत सहकार्य करणार. 

हे सारं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र. 
उल्हासनगरात तरुणाला तरुणाला बेदम मारहाण पैशाच्या देवाण-घेवाणीवरून मित्रांनीच केली मारहाण मारहाणीची घटना सीसीटीव्हीत झाली कैद

 उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात जीलाजित दुबे हा वास्तव्याला आहे. १५ जानेवारी रोजी रात्री तो घराबाहेर बसलेला असताना त्याचे मित्र करण चंडालिया, रोहित टाक, सागर वाघेला, नरेश चंडालिया आणि जग्गू हे तिथे आले आणि त्यांनी जीलाजित याला मारहाण करण्यास सुरुवात केली. उसने घेतलेले पैसे परत करण्याच्या वादातून ही मारहाण करण्यात आली. तब्बल १० ते १५ मिनिटं ही मारहाण सुरू होती. यावेळी जीलाजित याच्या कुटुंबीयांनी मध्ये पडत त्याला वाचवण्याचाही प्रयत्न केला, मात्र या तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मात्र फरार झाले आहेत.

शिवसेना कोणाची? यावर थोड्याव वेळात निवडणूक आयोगासमोर निकाल

शिवसेना कोणाची? यावर थोड्याव वेळात निवडणूक आयोगासमोर निकाल होणार आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे वकील निवडणूक आयोगात दाखल झाले आहेत. 

बीड जिल्हा हादरवणारे तिहेरी हत्याकांड, पती-पत्नी,बाळंतीण मुलीचा खून करणाऱ्यांना जन्मठेप

गेवराई येथील सरस्वती कॉलनीत भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरी सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या करून दोन मुलींवर हल्ला केला होता. उपचारादरम्यान बाळंतीण मुलीचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, पाच वर्षांपूर्वीच्या या घटनेत दोन आरोपींना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन जन्मठेपेची शिक्षा सुनावली 



सोमा शेरू भोसले व लखन प्रताप भोसलेला जन्मठेपे ची शिक्षा

Nashik News: नाशिक पदवीधर विधान परिषद उमेदवार शुभांगी पाटील यांना विजयी करण्यासाठी धुळ्यातील शिवसेना ठाकरे गट अॅक्टिव्ह मोडवर

Nashik News: नाशिक पदवीधर विधान परिषद उमेदवार शुभांगी पाटील यांना विजयी करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गट अॅक्टिव्ह मोडवर आली असून शुभांगी पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे, या निवडणुकीत तांबे पिता पुत्राने काँग्रेसला कसं फसवलं हे पदवीधर मतदारांनी बघितलं असून यामुळे या लबाड लोकांना त्यांची जागा सुज्ञ मतदार दाखवून देतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना ठाकरे गट कामाला लागले असले तरी दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यांच्याशी संपर्क साधला असता या निवडणुकीबाबत लवकरच महाविकास आघाडीची बैठक होणार असून पक्षश्रेष्ठींकडून येणाऱ्या आदेशावर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे.

Nashik News

नाशिक पदवीधर विधान परिषद उमेदवार शुभांगी पाटील यांना विजयी करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गट ऍक्टिव्ह मोडवर आली असून शुभांगी पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे, या निवडणुकीत तांबे पिता पुत्राने काँग्रेसला कसं फसवलं हे पदवीधर मतदारांनी बघितलं असून यामुळे या लबाड लोकांना त्यांची जागा सुज्ञ मतदार दाखवून देतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.... नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना ठाकरे गट कामाला लागले असले तरी दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यांच्याशी संपर्क साधला असता या निवडणुकीबाबत लवकरच महाविकास आघाडीची बैठक होणार असून पक्षश्रेष्ठींकडून येणाऱ्या आदेशावर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे.

Crime News: चाकूचे वार करून तरुणाची हत्याच; कळंब येथील घटना

Crime News: यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे पूर्व वैमनस्यातून तरुणावर चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. ही घटना कळंब मधील इंदिरा चौकात घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अश्विन राऊत असे मृताचे नाव आहे. तरुण कळंब येथील इंदिरा चौकात उभा असताना  दोन दुचाकीवरून चार अनोळखी व्यक्ती तेथे आले. त्यांनी तरुणाच्या डोक्यावर हातोडीने हल्ला केला. त्यानंतर  चाकूने पोटात सपासप वार केले. त्यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. चारही जण दुचाकी सोडून फरार झाले. तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.  घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ संपत भोसले, ठाणेदार अजित राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहे.

पंकजाना डावलतानाच जयदत्त क्षीरसागर यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांची सलगी; आणखी एक ओबीसी नेता भाजपाच्या जवळ

काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून निलंबित केलेले जयदत्त क्षीरसागर भाजपच्या आणखी जवळ जातानाचे चित्र पाहायला मिळत आहे. तर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे..बीड जिल्ह्यातील विकास कामाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करून क्षीरसागर यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे दिशा निर्देश दिले होते तर नुकत्याच  गहीनिनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आणखी जवळीक पाहायला मिळाली.


विशेष म्हणजे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना टाळून देवेंद्र फडणवीस यांना गहिनीनाथ गडावर बोलून त्यांचा सन्मान जयदत्त क्षीरसागर यांनी केला होता त्यामुळे भविष्यात जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील भाजपाचे नेते असतील अशी चर्चा राजकीय गोटामध्ये पाहायला मिळत आहे. 

सदा सरवणकर मुंबई सत्र न्यायालयात दाखल; नारायण राणेंची 2005 मधील एक सभा उधळून लावल्याचं प्रकरण 

सदा सरवणकर मुंबई सत्र न्यायालयात दाखल


नारायण राणेंची 2005 मधील एक सभा उधळून लावल्याचं प्रकरण 


विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणेंची शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयासमोर सभा सुरू असताना घातलेल्या गोंधळाचं प्रकरण


दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता


याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र निश्चिती होणार आहे


सरवणकरांसोबत शिवसेनेच्या दोन्ही गटातील अनेक नेते यात आरोपी आहेत

Sangola News:  शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, सांगोला तालुक्यातील कोळा येथील धक्कादायक प्रकार

Sangola News:  सांगोला तालुक्यातील कोळा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  शाळेचे स्नेहसंमेलन सुरू असताना शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग  केला आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शिक्षकाला अटक देखील केली आहे. 

बीडमधून जाणाऱ्या बिंदुसरा नदीचे पात्र होणार स्वच्छ, नगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
Beed News : बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीची स्वच्छता मोहीम नगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांनी हाती घेतल्या असून आठवड्यातील दर शनिवारी नदीपात्रामध्ये स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी लागणारे यंत्रसामग्री आणि त्यासाठी लागणारे इंधनासाठी लोकसभागातून याची व्यवस्था केली जात असून या स्वच्छते मोहिमेअंतर्गत पाच किलोमीटरपर्यंत नदीचे पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये 20 ट्रॅक्टर 200 नगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे बिंदुसरा नदीमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी चार जणांची समिती नेमण्यात आली असून नदी पात्रात कचरा टाकणाऱ्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
इमारतीमधील घराला लागलेल्या आगीत आजी-नातीचा मृत्यू, कल्याणमधील धक्कादायक घटना

Kalyan News : कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला अचानक आग लागली. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. या भीषण आगीत घराचे पूर्णपणे नुकसान झाले तर घरात झोपलेल्या 70 वर्षीय महिला आजी आणि तिची 22 वर्षीय नात आगीत गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. खातीजा हसम माइमकर आणि इब्रा रौफ शेख अशी मृतांची नावं आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र या आगीत घराचे संपूर्णपणे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

खेडमध्ये व्हेलची उलटी जप्त; तिघे अटकेत
भरणे येथील साई रिसॉर्ट जवळ व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना पोलीस पथकाने अटक केली.माशाच्या उलटी सह दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. काही व्यक्ती लुप्त प्रजातीच्या माशाची उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि वनरक्षक यांचे पथक तयार करण्यात आले.त्यांनी भरणे ते साई रिसॉर्ट जवळ सापळा रचला. या रिसॉर्ट जवळून तिघेजण दोन दिवसांवरून संशय रित्या जाताना पथकाच्या निदर्शनात आले.पथकांने तिघांनाही थांबवून झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीत व्हेल माशाची उलटी आढळली. या तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अन्य व्यक्तींच्या सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरत पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

 
Sangli Crime News: सांगली पोलिसांकडून दरोडे टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Sangli Crime News: सांगली शहरामध्ये गेल्या महिन्यात घडलेल्या दरोड्याचा छडा अखेर सांगली पोलिसांनी लावला आहे. मोठ्या शिताफीने दरोड्यातील तिघा आरोपींना अटक करत आंतरराज्य टोळीचा केला आहे. त्यांच्याकडून दरोड्यातील मुद्देमाल आणि रोकड अशा पाच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेली तिघे अहमदनगर जिल्ह्यातील असून त्यांचे इतर पाच साथीदार मध्यप्रदेश मधील असल्याचे समोर आले आहे. लवकरच या आरोपींनाही अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी व्यक्त केला आहे. शहरातील कर्नाळ रोडवर असणाऱ्या एका घरावर पहाटेच्या सुमारास दरोडा टाकून,हात पाय बांधून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचा गतीने तपास करत अखेर या दरोड्याचा आणि दरोडेखोरांच्या टोळीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला असून या टोळीवर महाराष्ट्रसह, छतीसगड मध्यप्रदेश आणि ओडिसा या राज्यात गुन्हे दाखल असल्याचे देखील समोर आले आहे.

Buldhana News: यंदा हरभाऱ्याची रेकॉर्डब्रेक लागवड

Buldhana News: सध्या थंडीचा जोर वाढल्याने व हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने हरभरा पिकाची स्थिती चांगली आहे ,राज्यात सामान्यतः विदर्भ , मराठवाडा आणि खान्देशात हरभरा पिकाची लागवड केल्या जाते. यंदा राज्यात सरासरीच्या 100% हरभऱ्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड झाल्याने उत्पादन मोठं होण्याचीही शक्यता आहे आणि त्यामुळे खरिपात कुठे अतिवृष्टीमुळे तर कुठे रोगाराईमुळे पिकांचं झालेलं नुकसानामुळे शेतकरी हवालदील झाला होता त्यांना आता हरभऱ्याच पीक तारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात सरासरी 1 लाख 46 हजार हेक्टर इतका हरभरा लागवड होत असते पण यंदा पोषक हवामान असल्याने शेतकऱयांनी जवळपास 2 लाख 05 हजार हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 139% वाढ हरभरा पिकाची लागवडित आहे. त्यामुळे यंदा रब्बीतील हरभरा शेतकऱयांना तारणार असल्याचं चित्र आहे.

वर्ध्यात भूमिहीन महिलेच्या घरात आग, मोजमजुरी करुन जमवलेले 27 हजार रुपये देखील जळाले

Wardha News : वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील साहूर येथे एका भूमिहीन महिलेच्या घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत महिलेचे मोठे नुकसान झाले असून मजुरी करुन जमवलेले 27 हजार रुपये सुद्धा या आगीत जळाले आहे. विशेष म्हणजे ही महिला विधवा असून आता घर व साहित्य जाळल्याने या महिलेवर बेघर होण्यासोबतच उपासमारीची वेळ आली आहे

नागपूर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र झाडे यांच्या प्रचारासाठी आमदार कपिल पाटील आज नागपुरात

Kapil Patil In Nagpur : शिक्षक भारतीचे नेते आणि आमदार कपिल पाटील नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांच्या प्रचारासाठी आज नागपुरात येत आहेत. नागपुरात कपिल पाटील संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विनंतीनंतरही काल कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने नागपूर मतदारसंघात आपला उमेदवार मागे घेण्यास नकार दिला होता.

मुंबईतील चौकाचौकात पंतप्रधान मोदी, बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे कटआऊट्स

Mumbai News : मुंबईतील विविध विकासकामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारी रोजी मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांचे कटआऊट्स पाहायला मिळत आहेत.

Firing in California: गोळीबारानं अमेरिका पुन्हा हादरली; घरात घुसून अंदाधुंद गोळीबार

Firing in California: जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत (America News) बंदूक संस्कृती खूप मोठं आव्हान ठरतेय. दिवसागणिक संपूर्ण देशभरात अनेक गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. सोमवारी पहाटे अमेरिकेतील प्रसिद्ध शहर असलेल्या कॅलिफोर्नियातील एका घरात घुसून काही बंदुकधारींनी केलेल्या गोळीबारात (Firing in California) सहा जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बाळासह त्याच्या आईचाही समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती देत, मृतांचा आकडाही जाहीर केला आहे. 


स्थानिक माध्यमांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टार्गेटेड हल्ला होता. या हल्ल्यात सामील असलेल्या टोळीचा अंमली पदार्थ किंवा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असावा, असा संशय आहे. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता कॅलिफोर्नियाच्या जोक्विन व्हॅलीमधील टुलारे सॅन शहरातील एका घरावर दोन पुरुषांनी हल्ला केला आणि अनेक गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सहा जणांनी आपला जीव गमावला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Sindhudurg News: तळकोकणातील आकेरीच्या सुपुत्राने घडविलेले शिल्प ६२ व्या राज्य कला प्रदर्शनातील शिल्पकला स्पर्धेत अव्वल

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आकेरी गावचा जयेश धुरी याने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. लहान वयातच अद्भूत अदाकारी दाखवत आकेरी या छोट्याशा गावातील युवा शिल्पकार जयेश धुरी या विद्यार्थ्याने अख्ख्या महाराष्ट्राला दिली.


उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग कला संचालनालयातर्फे महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा 62 व्या राज्य कला प्रदर्शनातील शिल्पकला स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 200 हून अधिक कला महाविद्यालये सहभागी झाली होती. या स्पर्धेत विद्यार्थी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयात शिकत असलेल्या जयेशने आपल्या अद्भुत कलेने प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकावत राज्यभरातील शिल्पकारांचे लक्ष वेथून घेतले. हुबेहूब कलाकृती साकारत सुवर्णपदक पटकावलं आहे. पुढील महिन्यातील तीन तारखेला जयेशला प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक, सन्मानपत्र आणि महाराष्ट्र शासनाच्या रोख रकमेचे पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. सिंधुदुर्ग वासीयांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे. लहानपणापासूनच चित्रकला, शिल्पकलेची आवड जयेशला होती.



Shivsena: शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? आज निवडणूक आयोगात सुनावणी

Shiv Sena Symbol: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याची निर्णय मात्र त्या आधीच होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर आज सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता त्यावर काय निर्णय होतो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 


निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकांना परवानगी दिली तर याचा अर्थ शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होतं. त्यामुळे एकतर मुदतवाढ किंवा त्याआधीच काही मोठा निर्णय या दोन शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 फेब्रुवारी रोजी चिपळूणमध्ये, लोकमान्य टिळक स्मारकाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार

Ratnagiri News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 फेब्रुवारी रोजी चिपळूण दौऱ्यावर असणार आहेत. चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारकाच्या वतीने पर्यटन लोककला सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याची विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 फेब्रुवारी रोजी येणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष तानाजी चोरगे यांनी दिली.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात आज निकाल लागणार आहे. 92 नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का?  महानगरपालिका मधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख अमरावती येथील एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाणार आहेत. 


शिवसेना कोणाची आज ठरणार? आयोगात दुपारी 4 वाजता सुनावणी 


शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात आज निकाल लागणार आहे.  उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपतीये. त्यामुळे ठाकरे गटाकडून निकाल द्या किंवा संघटनात्मक निवडणुकीची परवानगी मागितली आहे. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं सादर केली आहे.


 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी 


 92 नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का?  महानगरपालिका मधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे.  
 
 ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना आज एसीबी समोर हजर रहाणार 


बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख अमरावती येथील एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाणार आहेत. देशमुख यांना एसीबीच्या अमरावती विभागीय कार्यालयाने 17 जानेवारीला अमरावती येथे हजर होण्याचे समन्स बजावले होते. नितीन देशमुख आज चौकशीसाठी निघताना शक्ती प्रदर्शन करणार आहेत.  
 
आज वाशिम बंदची हाक
शिरपूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आज वाशिम बंदची हाक देण्यात आलीय. शिरपूर येथील एका विशिष्ट समाजातील युवकाने व्हाट्सअप तथा इंस्टाग्रामवर माळी समाजाबद्दल धार्मिक भावना दुखावणारे अपशब्द आणि पोस्ट व्हायरल केल्याबद्दल वाशिम शह आज बंद राहणार आहे. संबंधित युवकावर त्वरित कारवाई करावी तसेच सर्वांनी आज बंद पाळावे असं माळी समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. 
   
वारणा धरणग्रस्तांचा मोर्चा  
वारणा धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीच्या इस्लामपूर मध्ये धरणग्रस्तांनी थेट तहसील कार्यालयासमोर धडक मोर्चा काढणार आहेत. बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होणार आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून कब्जा पट्टीच्या बाबतीत लादण्यात आलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.


देशातील पहिली धम्म पदयात्रा आज प्रस्थान करणार


आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ, थायलंड येथील 110 भिक्खूंचा सहभाग असलेली देशातील पहिली धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी, दादर मुंबईपर्यंत आज प्रस्थान करणार आहे. शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान येथून ही धम्म पदयात्रा मुंबई कडे रवाना होणार आहे. यात आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ, थायलंड येथील 110 भिक्खूंचा सहभाग असुन प्रथमच तथागत गौतम बुद्धांचे अस्थिदर्शन हि घेता येणार आहे. हि पदयात्रा पुढेच महिनाभर परभणी ते मुंबई 500 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
 
 केतकी चितळेच्या याचिकेवर  सुनावणी
गुन्हा रद्द करण्यासाठी केतकी चितळेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. या प्रकरणात शरद पावर यांनाही प्रतिवादी करण्यासाठी केतकीचा हायकोर्टात अर्ज. सोशल मीडियावर जर ती पोस्ट शरद पवारांशी संबंधित होती, तर मग शरद पवारांनी एकही तक्रार का दाखल केली नाही? केतकीचा सवाल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.