Maharashtra News LIVE Updates : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खाजगी रुग्णालयात वळसे पाटलांना केले दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Mar 2024 03:18 PM
Kolhapur : कोल्हापूर लोकसभा लढवण्यावर चेतन नरके ठाम, काही पक्षांकडून अजूनही ऑफर आल्याचा नरकेंचा दावा

Kolhapur : कोल्हापूर लोकसभा लढवण्यावर चेतन नरके ठाम 


काही पक्षांकडून अजूनही ऑफर आल्याचा नरके यांचा दावा


शिवसेनेकडून तिकीट लढवण्यासाठी नरकेंनी केली होती तयारी


कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाल्याने नरकेंना उमेदवारी मिळाली नाही


जनता हाच माझा पक्ष असल्याने विजयासाठीच मैदानात उतरणार


उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघातून दिली होती लढण्याची ऑफर


चेतन नरके यांच्याकडून हातकणंगलेतून लढण्यास नकार


30 दिवसात मतदार संघात पोहोचणे शक्य नसल्याने नम्रपणे दिला नकार

Politics : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, मुख्य निवडणूक अधिका-यांकडे लेखी तक्रार

Politics : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, तात्काळ कारवाई करावी


काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे लेखी तक्रार


खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंकडून न्यायालयाचा अवमान आणि जनतेची दिशाभूल


नवनीत राणांचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागल्याचा बावनकुळेंचा दावा.

Pune : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खाजगी रुग्णालयात वळसे पाटलांना केले दाखल

Pune : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात


घरात पाय घसरून पडले


वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर


वळसे पाटील यांच्यावर होणार शस्त्रक्रिया


पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात वळसे पाटील यांना केले दाख

Praniti Shinde : भिडायचं असेल तर माझ्याशी भीडा, मी लोकसभेला उभी आहे. माझ्या वडिलांना काय बोलता? - प्रणिती शिंदेचे सडेतोड उत्तर

Praniti Shinde : सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांना दिलं सडेतोड उत्तर


राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांना प्रॉपर्टीचा हिशोब देण्यासाठी दिल होत चॅलेंज,


त्याला आता प्रणिती शिंदे यांनी त्याच भाषेत उत्तर दिल आहे.


"भिडायचं असेल तर माझ्याशी भीडा, मी लोकसभेला उभी आहे.


माझ्या वडिलांना काय बोलता..?" असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी उत्तर दिल आहे.


ज्यांना संस्कार दिले गेले नाहीत ते सर्व एकत्र आले आहेत,


माझ्या विरोधात जे उभे आहेत, त्यांना तुम्ही पार्सल म्हणता, मात्र मी कांही म्हणणार नाही 


ते कांही दिवसांपासून शिंदे साहेबांवर बोलत आहेत.


भिडायचं असेल तर माझ्याशी भीडा, मी लोकसभेला उभी आहे.
माझ्या वडिलांना काय बोलता..?

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या रिमांडवर सुनावणी पूर्ण, न्यायालयाने निकाल राखून ठेवला

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या रिमांडवर सुनावणी पूर्ण


न्यायालयाने निकाल राखून ठेवला


अरविंद केजरीवाल यांची सात दिवसांची कोठडी ED ने मागितली आहे


केजरीवाल यांना जेल की बेल, थोड्याच वेळात होणार फैसला

Sanjay Patil : साहेबांनी कानमंत्र दिले, कुठे काय करायचे, याबाबत मार्गदर्शन केले  - संजय दिना पाटील

Sanjay Patil : उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो - संजय दिना पाटील


साहेबांनी कानमंत्र दिले, कुठे काय करायचे, याबाबत मार्गदर्शन केले  - संजय दिना पाटील


राष्ट्रवादी काँग्रेसला माझ्या रूपाने पहिल्यांदाच मुंबईत खासदार मिळाले.- संजय दिना पाटील


आम्ही पवार साहेब जयंत पाटील यांच्या सोबत बोलुन नाराजी दुर करुन काम करतोय - संजय दिना पाटील


आमचेही लोक काही नाराज आहेत पण मदत करतोय - संजय दिना पाटील


उध्दव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूती  मला विजयाचा विश्वास - संजय दिना पाटील


नगरसेवक आमदार खासदार सर्वांना सोबत घेऊन काम सुरू- संजय दिना पाटील

Share Market : सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांची उसळी, निफ्टी देखील 321 अंकांनी वधारला 

Share Market : सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांची उसळी 


निफ्टी देखील 321 अंकांनी वधारला 


बॅंकांच्या समभागात मोठ्या उसळीनंतर भारतीय शेअर बाजार तेजीत 


नवं आर्थिक वर्ष सुरु होण्याआधी जागतिक बाजारात देखील चांगली तेजी 


सोबतच अमेरीकेतील महागाई दरासंदर्भातले आकडे प्रसिद्ध होण्याआधी बाजारात उत्साहाचे वातावरण

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेऊन ईडीची टीम राऊज अवेन्यू कोर्टात पोहोचली 

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेऊन ईडीची टीम राऊज अवेन्यू कोर्टात पोहोचली 


आज पुन्हा कोठडी वाढवून मागितली जाणार


माध्यमांशी बोलताना माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र  असल्याचा केजरीवाल यांचा दावा 


आजच्या सुनावणी वेळी केजरीवाल नवा खुलासा करणार ?

Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेच्या उमेदवारीचा नामांकन अर्ज दाखल केला

Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेच्या उमेदवारीचा नामांकन अर्ज दाखल केलाय .. 


विद्यमान खासदार प्रतापरावं जाधव यांना स्वपक्षातून झंटका...


आ.संजय गायकवाड यांनी नेमका का अर्ज दाखल केला केला कारण मात्र गुलदस्त्यात

Raigad : रायगडात शिवजयंती उत्साहात साजरी, पालखीत बसवून राजांची गावातून सवारी 

Raigad : रायगडात शिवजयंती उत्साहात साजरी


अवघे वातावरण झाले शिवमय


पालखीत बसवून राजांची गावातून सवारी 


आज 19 फेब्रुवारी… छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे  394 जयंती… सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह आहे. शिवरायांचं राज्याभिषेक झालेल्या किल्ले रायगडावर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक राज्यातून मावळे शिवज्योत न्यायला रायगडावर काल रात्रीपासून दाखल झालेत रायगडच्या काही गावांमध्ये देखील शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय

Mumbai : मुंबईकडून कल्याण ला जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत, कल्याण-ठाकुर्ली दरम्यान अडकला पेंटग्राफ

Mumbai : कल्याण - मुंबईकडून कल्याण ला जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत


कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान लोकलला अडकला पेंटग्राफ


जलद मार्गावरील वाहतुकीवर परिणाम

Politics : महायुतीत खदखद, आमच्या जागेवरच का हट्ट?अर्जुन खोतकर यांचे भाजपला सवाल.

मोठी बातमी-महायुतीत खदखद अर्जुन खोतकर यांचे भाजपला सवाल.


शिवसेनेचा जागेवरच कशासाठी गोंधळ केला जातो?


आमच्या जागेवरच का हट्ट? तुमच्या जागा आम्ही मागितल्या का.?


माझ्यामते एक घाव दोन तुकडे व्हायला पाहिजेत.


 भाजपने 20 जागा जाहीर करण्याचा अधिकार तसा आमच्या 18 जागा जाहीर करण्याचा अधिकार होताच ना ,आम्ही चौकट ओलांडली नाही त्यांनी जाहीर केलं आणि आम्हाला ताटकळत ठेवलं..

Gadchiroli : गडचिरोलीत सी-60 आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक

Gadchiroli : गडचिरोलीत सी-60 आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक..


गडचिरोली छत्तीसगड च्या कांकेर जिल्ह्याच्या सिमेवर चकमक...


पोलिसांचा वाढता दबाव पाहता जंगलाच्या दिशेने झाले पसार..


एटापल्ली तालुक्यातील कसनसुर पोलीस मदत केंद्रा पासून 15 किलोमीटर वर झाली चकमक..


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कार्यवाही...


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात दुर्गम भागात सुरु आहे नक्षल विरोधी अभियान...


काल छत्तीसगड मध्ये बिजापूर - सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झाली होती मोठी चकमक


 चकमकीत 6 नक्षल्याना कंठस्नान घालण्यात आला यश

Politics : महाविकास आघाडीची आज हॉटेल ट्रायडंटला बैठक, सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई जागेचा तिढा सुटणार?

Politics : महाविकास आघाडीची पाच वाजता हॉटेल ट्रायडंटला  बैठक होणार आहे . या बैठकीला शरद पवार,  बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण,  संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या जागेवरचा तिढा आजच्या बैठकीमध्ये सोडवला जाणार


या बैठकीच्या आधी काँग्रेस नेत्यांची बैठक होईल या बैठकीमध्ये तिढा कसा सोडवायचा यावरती चर्चा केली जाईल

Jayant Patil : माढा मध्ये इंडिया आघाडी एकतर्फी निवडणूक लढेल, माढा मधील शेतकरी भाजप विरोधात - जयंत पाटील

Jayant Patil : माढा मध्ये इंडिया आघाडी एकतर्फी निवडणूक लढेल. माढा मधील शेतकरी भाजप विरोधात आहे. - जयंत पाटील


भाजप सुनिल तटकरे यांच्यासोबत राहील की नाही माहिती नाही. मागील वेळी मावळ मध्ये पाठिंबा दिला होता त्यावेळीं 30 हजार मतांचा लीड दिला आहे. तटकरे यांना मागील निवडणुकीत अलिबाग आणि श्रीवर्धन मध्ये जास्त मत मिळाली होती. आता हे चित्रं दिसणार नाही त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे.

Nagpur : नागपूरच्या चौदामैल भागातील एलएनटी कंपनीच्या वेअरहाऊसला भीषण आग

Nagpur : नागपूरच्या चौदामैल भागातील एलएनटी कंपनीच्या वेअरहाऊसला भीषण आग ...


आग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल ..


सकाळी 11:30 वाजताच्या सुमाराला लागली आग ..


आगी मध्ये ऑईल व मशीनरी सुटे भाग चे  जळून  राख..


शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं प्राथमिक अंदाज .

Politics : मावळ मध्ये श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार! सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी.

Politics : मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको,


सुरुवातीपासून अशी टोकाची भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आता यूटर्न घेण्याच्या तयारीत आहेत.


अजित पवारांनी मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा. 


असा आदेश देत बारणेचं महायुतीचे उमेदवार असतील याचे संकेत दिलेत.


आता अजित दादा जे आदेश देतील, त्याचं पालन आम्ही करू.


नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेऊ.


असं म्हणत सुनील शेळकेनीं यूटर्न घेण्याची तयारी दर्शवली आहे.

Thane : खासदार राजन विचारे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर

Thane : खासदार राजन विचारे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर...


खासदार राजन विचारे ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धर्मवीर आनंद दिघेंच्या स्मारकास करणार अभिवादन...


खासदार राजन विचारे यांच्या लोकसभेच्या प्रचाराला आजपासून सुरुवात....


 राजन विचारे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर घेणार भेट...

Politics : उद्धव ठाकरे- शरद पवार यांच्या लवकरच महाराष्ट्रात होणार संयुक्त सभा

Politics : उद्धव ठाकरे- शरद पवार यांच्या लवकरच महाराष्ट्रात होणार संयुक्त सभा


उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ  नेत्यांच्या संयुक्त सभांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात


महाविकास आघाडीच्या प्रचाराचा धुरळा या सभांनी  उडणार,महाराष्ट्रभर निवडणुकांच्या टप्प्यानुसार  या संयुक्त सभांचा नियोजन महाविकास आघाडी कडून  केले जाणार


 ठाकरे पवार यांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर  पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत  प्रचाराची रणनीती आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरवली जाणार आहे


आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपले पक्ष लढणार असणाऱ्या  लोकसभा मतदारसंघात  आपल्या पक्षाच्या सभा घेतल्या होत्या आता एकत्रित येऊन  मतदारसंघांमध्ये सहभाग संयुक्त सभा घेतल्या जाणार आहेत

Mumbai Fire : मुंबईच्या मालाड मध्ये सेंट्रल प्लाझा इमारतीत मोठी आग, अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळावर दाखल

Mumbai Fire : मुंबईच्या मालाड पूर्वेत दप्तरी रोडवर असलेला सेंट्रल प्लाझा इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे.


सेंट्रल प्लाझा इमारतीचा पाचवा मजल्यावर कपड्याच्या गोदाम मध्ये सकाळी साडे अकराच्या सुमारास ही मोठी आग लागली आहे.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळावर दाखल आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.


आग लागल्याची माहिती मिळतात या गोदाम मध्ये काम करणारे सर्व कामगार सुखरूप बाहेर निघाले आहेत.

Rashmi Barve : रश्मी बर्वे यांचे जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द, जात पडताळणी समितीने दिला निर्णय

Rashmi Barve : रश्मी बर्वे यांचे जात वैद्यता प्रमाणपत्र रद्द .


जात पडताळणी समितीने दिला निर्णय

Ramtek : काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अर्जावर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी निर्णय राखून ठेवला

Ramtek : काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला.


अपक्ष उमेदवार सुनील साळवे यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र अवैध्य असल्याचा आक्षेप नोंदविला 


निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी निर्णय राखून ठेवला

Nashik : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर निघाले, पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

Nashik : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर निघाले आहेत


आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार


रात्री नाशिकच्या शिवसैनिकासह गोडसे यांनी घेतली होती मुख्यमंत्री ची भेट
-
नाशिकची जागा शिवसेनेलाच राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नी गोडसेना दिले होते आश्वासन
-
गोडसेच्या भेटीनंतर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली त्यामध्ये काय ठरले ते अद्याप गुलदस्त्यात
-
नाशिकची जागा मिळविण्यासाठी गोडसे पुन्हा मुख्यमंत्रीच्या दारी गेलेत


छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होण्याचे कळताच शिवसेनेत अस्वस्थत

Politics : नितीन गडकरींच्या उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आक्षेप नोंदवला जाणार

Politics : नितीन गडकरी यांनी जो उमेदवारी अर्ज भरला,


त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्हे व त्यांच्या संपत्ती बाबत


विदर्भ राज्य समितीचे उमेदवार मुकेश मासोदकर हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आक्षेप नोंदवणार आहे 

Politics : तुळजापुरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घेतली अजित पवार यांची भेट

Politics : तुळजापुरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घेतली अजित पवार यांची भेट


आज सकाळी घेतली अजित पवार यांची घेतली भेट


धारशीवची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून लढा


राणा जगजित सिंह पाटील यांना राष्ट्रवादीकडून विचारणा


मात्र या प्रस्तावास राणा पाटील यांचा इन्कार


धाराशिव जागेबद्दल राणा जगजित सिंग पाटील आणि बसवराज पाटील यांच्या नावाची चर्चा


मागच्या निवडणूकित राणा पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये केला होता प्रवेश


पाटील-पवार घराण्याचे जवळचे नाते संबंध

Nashik : विजय करंजकर असणार सकल मराठा समाजाचे उमेदवार? नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंविरोधात लढणार?

Nashik : विजय करंजकर असणार सकल मराठा समाजाचे उमेदवार?


ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंविरोधात करंजकर लढणार?


- सकल मराठा समाजाच्या बैठकीत विजय करंजकरांची एन्ट्री 


- उबाठा गटाकडून तिकीट कापले गेल्याने करंजकर आहेत नाराज 


- विजय करंजकर उबाठा गटाचे नाशिक लोकसभा संघटक 


- विजय करंजकरांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष

Nashik - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीला सुरुवात

Nashik - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीला सुरुवात 


- छगन भुजबळ लोकसभा निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू असतांनाच दुसरीकडे सकल मराठा समाज उतरणार रिंगणात


- बैठकीत नाशिक लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवाराची केली जाणार चाचपणी 


- नांदूरनाका परिसरातील शेवंता लॉन्समध्ये पार पडते आहे बैठक


- नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे बांधव भगिनी उपस्थित


- बैठकीचा अहवाल मनोज जरांगे पाटलांना दिला जाणार

Lok Sabha 2024 : नवनीत राणा विरोधात अभिजित अडसूळ उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत

Lok Sabha 2024 : नवनीत राणा विरोधात अभिजित अडसूळ उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत


नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी देऊ नये यासाठी सगळेच घटक पक्ष विरोधात होते..


यात माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांचाही समावेश होता.. 


अखेर विरोध असतांना ही भाजपबे विरोध झुगारून नवनीत राणाला भाजपबे उमेदवारी दिली..


त्यामुळे आता बच्चू कडू प्रहारचा उमेदवार देणार तर दुसरीकडे कॅप्टन अभिजित अडसूळ देखील अमरावती लोकसभेच्या रिंगणात नवनीत राणा यांच्या विरोधात मैदानात उरतण्याची तयारी करताय...

Politics : शिंदेच्या 13 पैकी 12 खासदारांना पुन्हा मिळणार संधी, काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं खासदारांना आश्वासन

Politics :  शिंदेच्या 13 पैकी 12 खासदारांना पुन्हा मिळणार संधी


काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं खासदारांना आश्वासन 


हेमंत गोडसे, हेमंत पाटील, भावना गवळी संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या बाबत होत संभ्रम 


आज काही खासदारांची यादी जाहिर होण्याची शक्यता


ठाणे, संभाजीनगरच्या जागेवर अद्याप उमेदवार निश्चित नाही

Lok Sabha 2024 : रायगड लोकसभेचा पेच अजूनही कायम, भाजप नेते धैर्यशील पाटील लोकसभेसाठी इच्छूक

Lok Sabha 2024 : रायगड लोकसभेचा पेच अजूनही कायम


भाजप नेते धैर्यशील पाटील लोकसभेसाठी इच्छूक


धैर्यशील पाटील लवकरच समर्थकांसह घेणार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट


सुनील तटकरे यांना भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध

Political News : भाजपकडून शिवसेनेच्या खासदारांची तिकिटं कापली जात असल्याने शिवसेना पक्षात अंतर्गत नाराजीचा सूर

Political News : भाजपकडून शिवसेनेच्या खासदारांची तिकिटं कापली जात असल्याने शिवसेना पक्षात अंतर्गत नाराजीचा सूर.


भाजपकडून निगेटिव्ह सर्व्हे पुढे करून शिवसेनेच्या जागा अप्रत्यक्ष स्वत:कडे करत, खच्चीकरण करत असल्याची पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा.


लोकसभेतील विद्यमान खासदार मोठ्या विश्वासाने ठाकरेंची साथ सोडून युतीत सहभागी झाल्यानंतर एनवेळी अशी वागणूक मिळत असल्याने शिवसेनेत अंतर्गत नाराजी.


युतीतील चर्चेला फक्त शिवसनेतून फक्त मुख्यमंत्र्यांनाच बोलावलं जातं,राष्ट्रवादीतून मात्र दादा आणि पटेल उपस्थित असतात


भाजपबाबत होत असलेल्या जागेच्या वाटाघाटीत पक्षातील इतर नेत्यांना लांब ठेवत असल्याने पक्षातील नेते नाराज


लोकसभेलाच हिच परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार, भविष्याच्या चिंतेने शिवसेनेतील आमदारांमध्ये  अस्वस्थता....


जी कारणं सोडून ठाकरेंची साथ सोडली, त्या उलट कृती होत असल्याने आमदार चितेंत....

Amol Kolhe : ..म्हणून शिवाजी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला, अमोल कोल्हेंनी केलं स्पष्ट

Amol Kolhe : दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची आणि स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही ही प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते


कोणत्याही मंदिरात जाण्याआधी पहिले नतमस्तक झालो तो शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर


पहिला पायरीचे दर्शन घेतल्यानंतर संघर्षाची प्रेरणा स्वाभिमानाची प्रेरणा मिळते


शिवाजी आढळरावांचे चरण स्पर्श केल्याबाबत कोल्हे म्हणाले- 


वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे


म्हणून की आढळराव पाटील यांना नमस्कार केला, ही संस्कृती जपली पाहिजे


लढण्यासाठी ताकद द्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या, हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणं मागितलं

Shiv Jayanti 2024 : शिरूर लोकसभेतील उमेदवारांची शिवजयंती निमित्त 'शिवनेरी' वर गर्दी, अमोल कोल्हे-शिवाजी आढळराव विरोधी उमेदवारांची भेट

Shiv Jayanti 2024 : शिरूर लोकसभेतील उमेदवारांनी शिवजयंती निमित्त शिवनेरी गड गाठलं.


यावेळी अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव या विरोधी उमेदवारांची भेट घडली.


दोघांनी हस्तांदोलन करत एकमेकांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.


शिवजयंती निमित्त हे दोघे गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करण्यासाठी शिवनेरीवर आले होते.


यानिमित्ताने दोघांनी राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवलं.


मात्र राजकीय पटलावर एकमेकांवर निशाणा साधायला ते विसरले नाहीत.

Bhandara : काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांच्यासह 40 जणांची उमेदवारी दाखल

Bhandara : काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांच्यासह 40 जणांची उमेदवारी दाखल


रात्री उशिरापर्यंत चालली नामांकन स्वीकारण्याची प्रक्रिया....


दोन उमेदवारी अर्ज दाखल करताना एका अर्जावर काँग्रेस तर दुसऱ्या अर्जावर अपक्ष असा उल्लेख केला आहे.


काल उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी, महायुती, वंचित, बहुजन समाज पार्टी यांच्यासह अपक्ष अशा 40 उमेदवारांनी 49 फॉर्म सादर केले आहेत.


दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी पोहचलेल्या उमेदवारांची संख्या एकाचवेळी अधिक असल्यानं सर्व उपस्थित उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचवेळी प्रवेश देवून त्यानंतर सर्वांची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली. 

Navneet Rana : एक जागा अमरावतीची असेल ज्यांनी विरोध केला, त्यांचे कुटुंब तुटले - नवनीत राणा

Navneet Rana : नवनीत राणा यांना अमरावतीमधून भाजपचे उमेदवार बनवण्यात आले आहे. 


स्थानिक पातळीवर एनडीएच्या घटक पक्षांचाही विरोध आहे.


मात्र नवनीत राणा यांना आपल्या विजयाचा पूर्ण विश्वास आहे.


यावेळी एनडीएचा नारा 400 पार करेल, एक जागा अमरावतीची असेल, असा दावा नवनीत आणि त्यांचे पती रवी राणा यांनी केला आहे. 


नवनीत राणा म्हणाल्या की, हनुमानजींनी मला आशीर्वाद दिला आहे आणि ज्यांनी (उद्भव ठाकरे) विरोध केला आणि त्यांचे कुटुंब तुटले. 


सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांचे नाव न घेता रवी राणा आणि नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

Nana Patole : उद्धव ठाकरेंनी सांगलीतील जागा परस्पर घोषित केल्याने नाना पाटोले नाराज, महाविकास आघाडीच्या बैठकीला असणार गैरहजर

 Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज महाविकास आघाडीच्या बैठकीला गैरहजर असणार आहे


उद्धव ठाकरे यांनी सांगली जागा परस्पर घोषित केल्या नाना पाटोले नाराज आहे


आज काँग्रेस कडून महाविकास आघाडीच्या बैठकीला बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण  बैठकीला हजर राहणार आहे


महाविकास आघाडीच्या चर्चेत सांगली व भिवंडी ही जागा काँग्रेसला देण्यावर जवळपास एकमत झाले होते.  


असे असतांना उद्धव ठाकरे यांनी सांगलीची चंद्रहार पाटील यांना काल घोषित केली


त्यामुळे नाना पटोले नाराज आहे

Maharera : महारेराने वसूल केले घरखरेदीदारांच्या नुकसान भरपाईचे 125 कोटी रूपये, देशातील एकमेव प्राधिकरण

Maharera : महारेराने वसूल केले घरखरेदीदारांच्या नुकसान भरपाईचे 125 कोटी रूपये.


125 कोटी वसूल करून देणारे महारेरा देशातील एकमेव प्राधिकरण


महारेराने आतापर्यंत केली घर खरेदीदारांची 160 कोटींची नुकसान भरपाई वसूल


ही नुकसान भरपाई अधिक प्रभावीपणे वसूल करण्यासाठी विकासकाच्या खात्यावरही टाच आणता यावी


यासाठी वारंटसमध्ये विकासकाचा बँक खाते क्रमांकही महसूल विभागाला कळविणार

Political News : उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता आणखी एका उमेदवाराची घड्याळाच्या चिन्हावर न लढता भाजप चिन्हावर लढण्याची आग्रही मागणी

Political News : उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता आणखी एका उमेदवाराची घड्याळाच्या चिन्हावर न लढता भाजप चिन्हावर लढण्याची आग्रही मागणी


एबीपी माझा ला सूत्रांची माहिती


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धाराशिव ची जागा मिळण्याची शक्यता


या जागेवर प्रवीण परदेशी हे माजी सनदी अधिकारी उमेदवार असण्याची शक्यता


राष्ट्रवादी कडून घड्याळ चिन्हावर परदेशी यांनी लढावं अशी अट


तर परदेशी यांची मात्र भाजपच्या चिन्हावर लढण्याला पसंती


प्रवीण परदेशी बाबत आज दुपारनंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय होण्याची दाट शक्यता


 

Lok Sabha 2024 : ठाणे लोकसभेची जागा नक्की कुणाकडे? सगळ्यात मोठा प्रश्न अजुनही अनुत्तरीत

Lok Sabha 2024 :  ठाणे लोकसभेची जागा नक्की कुणाकडे हा सगळ्यात मोठा प्रश्न अजुनही अनुत्तरीत


ठाणे लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही 


ठाणे लोकसभेत मंदा म्हात्रे, गणेश नाईक आणि संजय केळकर हे भाजपचे तीन आमदार.


शिवसेनेकडे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आमदार आहेत तर गीता जैन या अपक्ष आमदार


ठाणे लोकसभेत आमची ताकद जास्त आहे, अपक्ष आमदार गीता जैनदेखील आमच्यासोबतच आहेत,


ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आमच्या नगरसेवकांची ताकद जास्त आहे असे म्हणत ठाण्याची जागा आम्हाला सोडा अशी भाजपची मागणी


दुसरीकडे ठाणे माझ्या घरातला मतदारसंघ आहे तो आम्हालाच सुटला पाहिजे अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका,

Shiv Jayanti : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शिवजयंती उत्सव साजरा

Shiv Jayanti 2024 : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शिवजयंती उत्सव साजरा केला जातोय


शिवजयंतीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले आहे


 शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली असून पारंपारिक खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले जात आहेत


 थोड्याच वेळात शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील

Bhandara : दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू....लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील घटना...

Bhandara : दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू


लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील घटना


जंगलातील एकाच परिसरात वावरणाऱ्या दोन वाघांमध्ये अस्तित्वासाठी झुंज झाली.


यात गंभीर जखमी झालेल्या एका वाघाचा मृत्यू झाला.


ही घटना भंडारा जिल्ह्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट नंबर 49 मध्ये काल बुधवारी रात्री उघडकीस आली.


मृत वाघ हा नर प्रजातीचा असून तो 4 वर्ष वयाचा


मृत वाघाच्या शरीरावर झुंझुच्या गंभीर जखमा आढळून आल्या असून त्याच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. 

Loksabha election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचीत बहुजन आघाडीकडून दोन उमेदवारांना दिले एबी फॅार्म?

Loksabha election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचीत बहुजन आघाडीकडून दोन उमेदवारांना दिले एबी फॅार्म?


दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्जसोबत जोडले वंचीतचे एबी फॅार्म


शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना वंचीतचे एबी फॅार्म जोडल्याची माहिती 


एकाच मतदारसंघात दोन उमेदवारांनी वंचितचे एबी फॅार्म दिल्याचा दावा केल्याने संभ्रम...


आज उमेदवारी अर्जाची छाननी करताना निवडणुक निर्णय अधिकारी कुणाचा एबी फॅार्म ग्राह्य धरणार? याकडे लक्ष  


तर प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव जाहिर करणार? याकडे सर्वांचं लक्ष..

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी भावना गवळी यांना जाहीर व्हावी, शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते वर्षा बंगल्यावर दाखल

Washim : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी भावना गवळी यांना जाहीर व्हावी


याकरिता शेकडोच्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सकाळी 4 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दाखल झाले होते.



खासदार भावना गवळी हे सतत पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आले असे असतानाही उमेदवारी घोषित करण्यासाठी इतका उशीर आणि आश्वासित का केला जात नाही असा सवाल कार्यकर्त्यांनी  एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवला यावेळी मंत्री संजय राठोड आणि भावना गवळी हे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची आदेश दिले यावरून भावना गवळी यांना उमेदवारी मिळणार असल्याची स्पष्ट झाल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलंय आज दुपारी बारा वाजे पर्यंत उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे

Baramati : शिवजयंती निमित्त बारामतीत गड किल्ल्यावर सुनेत्रा पवार यांच्याकडून हेलिकॉप्टर मधून पुष्यवृष्टी

Baramati :  शिवजयंती उत्सवानिमित्त बारामती लोकसभा मतदारसंघातील गड किल्ल्यावर सुनेत्रा पवार यांच्याकडून हेलिकॉप्टर मधून पुष्यवृष्टी केली जाणार


शिवजयंतीच्या निमित्ताने सुराज्य संकल्प आणि शिवकालीन गडकिल्ले पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन


इंदापूर मधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाला सुरवात होणार


इंदापूर मधील मालोजीराजे गढी, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, राजगड किल्ला, तोरणा किल्ला, सिंहगड किल्ला याठिकाणी पुष्यवृष्टी होणार


आंबेगाव येथील शिवसृष्टीत सुराज्य कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 

America : केजरीवाल अटक, काँग्रेस पक्षाच्या अकाउंट गोठवण्याच्या वादात पुन्हा अमेरिकेची उडी

America : केजरीवाल अटक व काँग्रेस पक्षाच्या अकाउंट गोठवण्याच्या वादात पुन्हा अमेरिकेची उडी


व्हाईट हाऊस प्रवक्ता मॅथ्यू मिलर यांचे विधान


- आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत
- वेळेत पूर्ण होणाऱ्या योग्य व पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेचे समर्थन करण्यासाठी जाहीर भूमिका घेतली आहे

उत्तराखंडचे माजी मंत्री, काँग्रेस नेते हरक सिंग रावत यांना ED चे समन्स

ED : उत्तराखंडचे माजी मंत्री व काँग्रेस नेते हरक सिंग रावत यांना ED चे समन्स


2 एप्रिल रोजी तपासासाठी हजर राहण्याचे निर्देश 


वनजमिन हस्तांतरीत करणे तसेच कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील झाडांची अवैध कत्तल असे आरोप रावत यांच्यावर आहेत

Bacchu Kadu : नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू यांचा विरोध कायम

Bacchu Kadu : नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू यांचा विरोध कायम


नवनीत राणा विरोधात आता बच्चू कडू काय भूमिका घेणार ?

Ratnagiri : नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होणार, सुत्रांची माहिती

Ratnagiri : रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपाच्या पारड्यात


रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे लढणार


भाजप विरोधात शिवसेना उबाठा असा सामना रंगणार


नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होणार - सूत्र

Mumbai : कोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून पोलिसाचा मृत्यू, प्रचंड गर्दीमुळे दरवाजातून तोल गेला

Mumbai : रेल्वेतील गर्दीचा बळी...कोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून पोलीसाचा मृत्यू.


रेल्वेतून प्रवास करत असताना प्रचंड गर्दीमुळे दरवाजात उभे राहिलेले 25 वर्षीय पोलिसाचा जागीच मृत्यू झाला,


ही घटना आज कोपर रेल्वे स्थानक जवळ घडली.


रोहित रमेश किळजे असे रेल्वेतून पडलेल्या पोलीसाचे नाव आहे.


डोंबिवली पश्चिमेकडील मथुरा अपार्टमेंट येथे ते राहात होते


मुंबईत ताडदेव येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात त्याची ड्युटी होती.

Sangali : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात करणीचा अघोरी प्रकार समोर

Sangali : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात करणीचा अघोरी प्रकार समोर


स्मशानभूमीत मुलींचे आणि मुलाचे फोटो असलेले काळ्या कापडाचे पाच गाठोडे बांधले, 


वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावाजवळील स्मशानभूमीतला प्रकार


गाठोड्यात नारळ,लिंबू,काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो व त्यावर धारदार दाभण खुपसून करणीचा अघोरी प्रकार केल्याचे समोर


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संशयितावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाईची केलीय मागणी

Parbhani : परभणीच्या पुर्णा तालुक्यातील लिमला ग्रामस्थांची ग्रामदेवता समोर शपथ, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या सभा प्रचाराला जाणार नाही

Parbhani : परभणीच्या पुर्णा तालुक्यातील लिमला ग्रामस्थांची ग्रामदेवता समोर शपथ


मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या सभा प्रचाराला जाणार नसल्याची शपथ 


मनोज जरांगे यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराला देणार पाठींबा 


मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या ना प्रचाराला जायचे ना सभेला


अशा प्रकारची शपथ परभणीच्या पुर्णा तालुक्यातील लिमला येथील सकल मराठा समाज बांधवानी ग्रामदैवत श्री संत राघोजी आप्पा महाराज सभागृहामध्ये घेतली 

Buldhana : बुलढाणा लोकसभा निवडणूक, जिल्ह्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता

Buldhana : बुलढाणा लोकसभा निवडणूक, जिल्ह्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता.


आज होणार अधिसूचना जारी


आज पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार.


18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून


शिवसेना ठाकरे गटाने आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांचे उमेदवार जाहीर


मात्र  महायुतीने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही.


संभाव्य उमेदवार म्हणून महायुतीचे विद्यमान खा. प्रतापराव जाधव यांचे नाव आघाडीवर


जर प्रतापराव जाधव यांना पुन्हा महायुतीने संधी दिली तर जिल्ह्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आता स्पष्ट होत आहे

 Ashok Chavan : बाळासाहेब आंबेडकर यांना मविआने सन्मान दिला नाही - अशोक चव्हाण

 


 Ashok Chavan : बाळासाहेब आंबेडकर यांना मविआने सन्मान दिला नाही म्हणून ते मविआ आघाडीच्या बाहेर पडले


असा दावा भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलाय.


आपल्या भोकर मतदारसंघात आयोजित सत्कार सोहळ्यात चव्हाण यांचे मोठया उत्साहात स्वागत झाले


चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले.


तसेच आपण आज आपल्या समर्थकांसमोर मनमोकळे केल्याचे ते यावेळी म्हणाले. 

Political news : नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे माझा विजयाचा मार्ग मोकळा - काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे

Political news : नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे माझा विजयाचा मार्ग मोकळा - काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे....


नवनीत राणा यांना भाजप तर्फे अमरावती लोकसभाची उमेदवारी जाहीर


ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार


नवनीत राणा यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात भाजप नेते कार्यकर्ते आणि अमरावती जिल्ह्यातील नेत्या सोबत जी वागणूक दिली


त्यामुळे माझा विजयाचा मार्ग सुकर झाला


अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी दिली..

Navneet Rana : नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश, बावनकुळेंच्या हस्ते हनुमानाची मूर्ती देऊन राणा यांचा पक्ष प्रवेश

Navneet Rana : नवनीत राणा यांचा बुधवारी भाजप प्रवेश


बावनकुळे यांच्या हस्ते बुधवारी प्रवेश झाला


विशेष म्हणजे हनुमानाची मूर्ती देऊन नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला आहे..


अमरावती मधील भाजप नेते अनिल बोंडे, प्रवीण पोटे उपस्थित 


माझी विचारधारा कधी ही भाजप पासून वेगळी नव्हती.. - नवनीत राणा


बावनकुळे आणि फडणवीस यांचं पाठिंबा नेहमीच होता.. - नवनीत राणा


महाराष्ट्रात मविआ सरकार असताना आम्ही दोघे सतत विरोधी पक्षात राहून भाजप सोबत सहकार्य करत होतो.. - नवनीत राणा


मोदींचा टार्गेट आहे अबकी बार 400 पार... मी विश्वास देते त्या 400 मध्ये एक सीट अमरावतीची राहील.... - नवनीत राणा


 


 

Political News : 27 तारखेच्या रात्री 'वर्षा' बंगल्याच्या बैठकीत काय घडलं ?

Political News : 27 तारखेच्या रात्री वर्षा बंगल्याच्या बैठकीत काय घडलं ?


जवळपास रात्री 8.30 च्या सुमारास शेकडो कार्यकर्ता सहित वर्षा वर दाखल झाले


पहिली बैठक हेमंत गोडसे आणि CM यांच्यात पार पडली


या बैठकीत गोडसे यांची समजूत काढत आश्वस्त केलं


त्यांना सांगण्यात आले की, नाशिकची जागा त्यांना मिळेल


त्यानंतर सुनील तटकरे यांच्याबरोबर रायगड मधील नाराज आमदार यांच्यात बैठक पार पडली


या बैठकीत महायुतीचा धर्म पाळत रायगड मधील आमदारांना तटकरे यांना समर्थन देण्याचा सल्ला देण्यात आला. (या बैठकीत आमदारांची समजूत काढण्यात आली तटकरेंना पाठिंबा देण्याचा आमदार तयार)


त्याच बरोबर बर हातकणंगले च्या जागेवर धैर्यशील माने यांच्याबरोबर बैठक


निशिंत राहण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी माने यांना दिला


सिंधुदुर्ग संदर्भात मंत्री उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा


किरण सामंत यांना सिंधुदुर्ग मतदार संघातून उमेदवारी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदार संघाची अधिसूचना होणार आज जारी 

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदार संघाची अधिसूचना होणार आज जारी 


मराठवाड्यातील परभणी,नांदेड,हिंगोलीसह विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात आजपासून उमेदवारी अर्ज विक्री सुरू 


परभणी हिंगोली लोकसभा मतदार संघातील लढती अद्याप स्पष्ट नाहीत


दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदार संघात आज अधिसूचना जारी केली जाणार आहे


आज अधिसुचना जारी करण्यात आल्यानंतर या 8 ही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज विक्री केले जाणार आहेत


उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे

Political News : माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, आज पत्रकार परिषद

Political News : माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा 


आज पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार


काल 'वर्षा' या निवासस्थानी विशेष बैठक पार पडली.


या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.


ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले.


त्यामुळे आज आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेणार


आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी ठरवले आहे.


या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.