Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...

Maharashtra LIVE Updates : आज दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Feb 2024 07:34 PM
Pune News : पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला

Pune News : निखील वागळे यांना पोलीस बंदोबस्तात जात असताना भाजप कार्यकर्त्यांकडून गाडीवर हल्ला करण्यात आला. निखिल वागळे यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली आहे. 

Nashik : पावसाळ्यापूर्वी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम पूर्ण करावे - छगन भुजबळ

यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी डोंगरगाव येथे पोहचेल यादृष्टीने या कालव्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.आज दिंडोरी तालुक्यातील मावडी, खडकजाम यासह विविध ठिकाणी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची व प्रकल्पाच्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

Chandrakant Patil : जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर शिक्षा केली जाईल - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी टीका करणे हे त्यांचं कामच आहे. परंतु घडणाऱ्या घटना या चिंताजनक आहेत. प्रत्येक घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जात असून यात जे दोषी असतील. त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; पुण्यातील नौशाद शेखवर आणखी तीन गुन्हे

Pune Crime News : पिंपरी चिंचवडमधील शिक्षण संस्थेचे चालक नौशाद शेखवर आणखी तीन गुन्हे दाखल झालेत. नौशादने त्याच्या क्रिएटिव्ह ऍकॅडमी अर्थात निवासी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केले होते. याप्रकरणी त्याला बेड्या ठोकताच, अन्य विद्यार्थिनी ही आता पुढं येताना दिसतायेत. आणखी तीन विद्यार्थिनींनी त्यांच्यावर अत्याचार झाल्याची फिर्याद दिलीये. त्यामुळं नौशाद शेखवर आत्तापर्यंत चार गुन्हे दाखल झालेत. नौशाद शेखला निवासी शाळेत चाळे करताना पाहिलेल्या काही विद्यार्थिनींनी जवाब दिलेत. त्या सबळ पुराव्यांच्या आधारे नराधम नौशादला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पावलं टाकली जातायेत. अन्य विद्यार्थिनींसोबत असे काही प्रकार घडले असल्यास त्यांनी पुढं यावं, असं आवाहन पोलिसांनी केलीये.

Nitesh Rane : घोसाळकर गोळीबार प्रकरणावरून नितेश राणेंचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

घोसाळकर यांच्या चिरंजीवाची हत्या हे उबाठा गटात अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरचा परिणाम आहे. आदित्य विरुद्ध राऊत हा जो गँगवॉर उबाठात अंतर्गत सुरू आहे. तो पहिले फक्त कपडे फाडेपर्यत होता. आता गोळी झाडे पर्यंत आलेला असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. 

गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी?: सुप्रिया सुळे

Supriya Sule criticizes Devendra Fadnavis : मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची सोशल मिडियावर लाईव्ह असताना गोळीबार करुन हत्या करण्यात आली.नेत्यांवर गोळीबार होण्याची ही महिन्यातील दुसरी वेळ. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या राज्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे अधिकृतपणे 'गुंडाराज' सुरु झाले आहे का? नेत्यांचे दिवसाढवळ्या खुन पडत आहेत. याचाच अर्थ राज्याच्या गृहमंत्री महोदयांचे त्यांच्या स्वतःच्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी?

दहिसर गोळीबार प्रकरणावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

लोकांच्या डोक्याला झालंय काय मला कळत नाही, फेसबुक लाईव्ह करतात आणि अशा घटना घडतात. यात पोलीस (Police) तरी काय करणार, चोऱ्या दंगल अशा घटनांमध्ये पोलीस संरक्षण देत असतात, इथं तुमच्या घरात येऊन घटना घडतात.पोलिसांनी बंदूक लायसन्स देताना अधिक काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.  

गेल्या 26 तासांपासून एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागाची चौकशी सुरूच

Income Tax Raid Pradeep Sharma: वादग्रस्त आणि मुंबई पोलिस दलातील माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी तब्बल 26 तासापासून आयकर विभागाची रेड सुरू आहे. माजी आमदार रमेश दुबे यांचा मुलगा पप्पू दुबेचा डेव्हलपमेंट प्रकरणी आईएएस अधिकारी निर्मल देशमुख आणि प्रदीप शर्मा यांच्या घरी काल सकाळी आठ वाजेपासून आयकर विभागाने रेड सुरू आहे. मात्र 26 तास उलटून गेले असून प्रदीप शर्मा यांच्या घरी अजूनही आयकर विभागाची रेड सुरू आहे. प्रदीप शर्मा यांचासह कुटुंबियांचा मोबाईल आयकर विभागाने जप्त केले असून, आयकर विभागाचे पंधरा ते वीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरात चौकशी करत आहेत. 

सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Maharashtra Politics : सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्या आद्देशाच्या अनुषंगाने सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे व त्यांच्यासह 39 आमदारांविरोधत याचिका दाखल केली आहे. कपिल सिब्बल यांनी प्रकरणावर सुनावणी होत नसल्याचे नमूद केले होते. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रकरण वादसूचीवर घेणार असल्याचे नुकतेच सांगितले होते.  त्यानुसार नवी तारीख 22 जानेवारी आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून, माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. तर, अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यांनी या सर्व प्रकरणाची पोलिसांकडून माहिती घेतली आहे. तसेच, रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.