Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 May 2024 02:50 PM
Gadchiroli: नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळला

Gadchiroli: नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावलाय. नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी उद्धवस्त केलीत. स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स नष्ट करण्यात आलीत. शिवाय गन पावडर, ब्लँकेट आणि औषधेही इथं सापडलीत. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स नष्ट केली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर, केळीच्या बागांना मोठा फटका

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला. त्यामुळे याचा फटका केळीच्या बागेवर पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतलं जातं. परंतु या तापमानाचा फटका केळीच्या भागावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. उभी असलेली केळीची झाडं वाढत्या तापमानामुळे करपत आहेत, तर तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नव्याने लावल्या केळीच्या बागांची झाडे वाळत आहेत. या तापमानापासून बचाव करण्यासाठी अनेक शेतकरी विक्री लायक तयार झालेल्या केळीच्या फळांना कापड बांधून या उन्हापासून केळीच्या फळांचे संरक्षण करत आहेत. 

Latur Lok Sabha Election 2024 : लातूर लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान, प्रशासन सज्ज

Latur Lok Sabha Election 2024 : लातूर लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. 19 लाख 77 हजार 42 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील 2115 मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 16765 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. 2115 मतदान केंद्रावर 8500 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे त्यांना सहाय्य करण्यासाठी 8262 अधिकार यांनी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्या मुळे कोणताही त्रास होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी 1648 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान सुरळीत आणि व्यवस्थित पार पडावं यासाठी सशस्त्र पोलीस दलासह 244 अधिकारी. 3768 अंमलदार आणि 1800 होमगार्डचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान केंद्राचे वेगळेपण म्हणून आणि जिल्ह्यामध्ये असणारे कमी जंगल क्षेत्र यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर बियाणाचा वाटप करण्यात येणार आहे. जवळपास बहुतेक मतदान केंद्र हे सीसीटीव्ही ना जोडण्यात आले आहेत. उष्णतेची लाट लक्षात घेऊन मतदान केंद्रावर बसण्यासाठी ची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारण्यात आले आहेत. पिण्याची पाण्याची सोयही करण्यात आली आहे. या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ जास्तीत जास्त मतदान प्रशासन सज्ज झाला आहे.पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे मतदान कमी झाल्यामुळे प्रशासन आता तयारीला लागला आहे.

Thane Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुतीची महत्वाची बैठक

Thane Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुतीची महत्वाची बैठक


टीप टॉप हॉटेलमध्ये सकाळी 10 वाजता बैठक होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकार्यांना करणार मार्गदर्शन


महायुतीच्या बैठकीला शिवसेना, भाजप ,मनसे, पदाधिकारी राहणार उपस्थित


नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते होते नाराज


नाराज पदाधिकार्याची समजूत या बैठकित काढली जाण्याची शक्यता

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency: रत्नागिरी- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद


मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा आणि मतदान सुरळीत पार पडण्यासाठी निर्णय

 

रत्नागिरी जिल्ह्यातील 14 ठिकाणचे मंगळवारचे आठवडा बाझार राहणार बंद

 

बाजार आणि जत्रा अधिनियमा नुसार जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांचे आदेश

 

त्यानुसार मंडणगड तालुक्यातील 2, दापोली तालुक्यातील 1, खेड तालुक्यातील 1, चिपळूण तालुक्यातील 1

 

तर संगमेश्वर तालुक्यातील चार, रत्नागिरी तालुक्यातील तीन, राजापूर तालुक्यातील 1 आणि लांजा तालुक्यातील 1 आठवडा बाझार उद्या भरणार नाहीत

 

7 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदान
Maval Lok Sabha Election 2024 : तो प्रचारासाठी आला, त्यानं पाहिलं अन् जिंकलही, पण ज्यांच्यासाठी आला, त्यांचं नावंच विसरला

Maval Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा निवडणूक 2024 : तो आला, त्यानं पाहिलं अन् त्यानं जिंकलंही. पण तो नेमकं कोणासाठी आला हेच विसरला अन् बुचकळ्यात पडला. हे घडलं ते सुपरस्टार गोविंदासोबत. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या रोड शोसाठी गोविंदा रविवारी (5 मे 2024) मावळ लोकसभा मतदारसंघात आला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावं घेऊ लागला. पण ज्यांच्या प्रचारानिमित्त रोडशोमध्ये सहभागी होण्यासाठी तो आला. त्या श्रीरंग बारणेंचं नाव घेणं तो विसरलास. शेवटी शेजारी बसलेल्या भाजप आमदारानं त्यांना आठवण करुन दिली. हा सर्व प्रसंग माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि सर्वत्र चर्चांना उधाण आलं. 


महायुतीचे स्टार प्रचारक सुपस्टार गोविंदा सध्या महायुतीचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. रविवारी श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी गोविंदा मावळमध्ये उपस्थित होते. पण ज्यांच्या रोड शोसाठी गोविंदा मावळमध्ये आला, त्या श्रीरंग बारणेंचं नाव शेजारी बसलेल्या भाजपच्या आमदार उमा खापरेंना सांगावं लागलं. हे सगळं माध्यमांच्या कॅमेरात कैद झालं. आता ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गोविंदा मावळमध्ये आला, त्या उमेदवाराचं नावंच लक्षात नसेल, तर गोविंदाला बोलावून काय साध्य झालं? असा प्रश्न उपस्थितांमध्ये चर्चेत होताच. पण हाच प्रश्न गोविंदाच्या उजव्या बाजूला बसलेल्या मावळ लोकसभेतून महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या श्रीरंग बारणेंना नक्कीच पडला असेल. 


वाचा सविस्तर 

नोकर भरती मुंबईत, पण मराठी माणसाला 'नो एन्ट्री'; Linkedin वरच्या पोस्टमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट

Job Post Viral on Linkedin: मुंबई : 'आपुल्या घरात हाल सोसते मराठी...'सुरेश भटांची ही रचना आठवण्याचं कारण म्हणजे संताप आणणारी एक जॉबसंदर्भातली पोस्ट. एका सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये मराठी उमेदवारांनी अर्ज करु नये, असं चीड आणणारं वाक्य लिहिलं होतं. आणखी धक्कादायक बाब म्हणजे ज्या दक्षिण मुंबईतील गिरगाव भागाची ओळख चाळसंस्कृती, सणसंस्कृती जपणाऱ्या मराठी माणसासाठी आहे, त्याच मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागातील एका नोकरीसंदर्भातली ही जाहिरात होती, ज्यामध्ये मराठी माणसाने अर्ज करु नये, असं डोक्यात तिडीक जाणारं वाक्य नमूद केलं होतं. पाहता पाहता सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आणि संबंधित कंपनीला आपण केलेल्या घोडचुकीचा साक्षात्कार झाला. त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि माफी मागण्यासाठी दुसरी पोस्टही लिहिलीय.


वाचा सविस्तर 

Amol Kolhe On Sharad Pawar : सततच्या सभांमुळे थकवा, शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द

Amol Kolhe On Sharad Pawar : शिरुर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. थकवा जाणवत असल्यानं डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, शिरुर मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार सभा घेणार होते. परंतु शरद पवारांची तब्येत ठीक नसल्याने ही सभा रद्द झाली आहे. ((पवार साहेब उन्हामध्ये तीन तीन चार चार सभा घेत आहेत मीही सभा घेत असताना काय त्रास होतो आहे याची मला जाणीव आहे पवार साहेबांना उन्हाचा त्रास होत असल्यामुळे एक दिवसाचा आराम करून पुन्हा जोमाने सभा घेतील आणि आम्ही प्रचार करू त्यामुळे माझ्या मतदारसंघातील विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही असं अमोल कोल्हे यांनी म्हटल आहे.)

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमधून देश-विदेशातील सर्व घडामोडींचा आढावा संक्षिप्त स्वरुपात वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधून सुरू आहे, अशातच निवडणुकांसोबतच मनोरंजन, क्रीडा यांसारख्या इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावाही या लाईव्ह ब्लॉगमधून घेतला जातो... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.