Maharashtra Live Updates : कल्याण डोंबिवलीतील काही भागांमध्ये पाच तास विद्युत पुरवठा बंद राहणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
कल्याण डोंबिवलीतील काही भागांमध्ये पाच तास विद्युत पुरवठा बंद राहणार
महावितरणाचे देखभाल दुरुस्तीसाठी शट डाऊन. डोंबिवली आणि कल्याणच्या काही भागामध्ये उद्या बुधवारी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे. मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण करणारे झाडे तोडणे पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीचे काम करणे इत्यादी महत्वाच्या कामासाठी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
कल्याण आंबिवली परिसर, नवापाडा ,गणेश नगर ,कुबेर समृद्धी ,हरिप्रिया सोसायटी, 52 चाळ ,गावदेवी मंदिर ,शंकेश्वर पाम्स ,लक्ष्मी लोटस ,चर्च ,जैन कंची ,राज वैभव सोसायटी ,या भागातील विद्युत पुरवठा बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत शट डाऊन घेण्यात येणार आहे.
Raigad News: पनवेल वरून महाडला जाणाऱ्या शिवशाही बसला अपघात झाल्याने यात एकाचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. कर्नाळा खिंडीत बस पोचली असता टर्निंगला ड्रायव्हरचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्ता सोडून खाली नाल्यात जावून आदळली. यामुळे बसने पल्टी खाल्याने आतील प्रवाशांना मार बसला. या बसमध्ये एकूण 38 प्रवाशी होते. यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल ग्रामीण , एमजीएम कामोठे आणि पेन मधील रूग्णालयात दाखवण्यात आले आहे.
Wardha News: वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात आज पुन्हा गारपीटसह पाऊस झाला. अवकाळी पावसाचा उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अचानक होत असलेल्या वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. देवळी तालुक्याच्या अनेक भागात गारपीटही झाली आहे. वर्धा, सेलू, कारंजा व हिंगणघाट या भागात पावसाच्या सरी बरसल्या.
Mumbai Fire News: मुलुंड स्टेशन परिसरात असलेल्या धीरज अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावर आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. सहा माळ्याची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावर काही नागरिक अडकले होते. त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी सुखरूप सुटका केली. तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. पोलीस आणि अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रित चर्चा करणार
चर्चेसाठी खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत मातोश्रीवर
बारसु येथील स्थानिकांनी विरोध केलेला आहे ठाकरे गटाचा देखील विरोध आहे
मातोश्रीवर प्रमुख नेते पुढील रणनीतीवर करणार चर्चा
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात प्रेयसीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करत प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मूल शहरातल्या इंदिरा नगर परिसरात ही घटना असून या प्रकरणात 40 वर्षीय प्रेयसी किरकोळ जखमी झाली आहे. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंडू निमगडे असं मृत प्रियकराचं नाव आहे. मृत बंडू निमगडेवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी (307) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसंबंधांमुळे पत्नीशी वारंवार खटके उडत असल्याने मृतकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra News : अनिल देशमुखांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा कायम; 18 जूनपर्यंत मुंबईबाहेर प्रवास आणि राहण्याची मुभा
दर सोमवारी ईडीच्या कार्यालयातील हजेरीतून सुटका
आमदार या नात्यानं विधानसभा क्षेत्रातील कामांकरता तिथं राहण्यासाठी देशमुखांनी मागितली होता परवानगी
यापूर्वीही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं 1 लाख रूपयांच्या हमीवर दिली होती परवानगी
तिच परवानगी 18 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Bhiwamdi News: भिवंडीत लाकडी खुर्ची आणि भंगाराला भीषण आग आहे. मीनाताई ठाकरे हॉलबाहेर आगीची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण
मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आहे.
Wardha News: वर्धा जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावे... या मागणीसाठी हिंगणघाटमधील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी बंद पुकारलाय.. आज सकाळपासूनच हिंगणघाट येथील नागरिकांनी शहरात कडकडीत बंद पाळला आहे. वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरात होण्यास नागरिकांनी विरोध केलाय.
Kharghar: खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूचा मुद्दा हायकोर्टात पोहचला आहे. अक्षम्य बेफिकीरबद्दल जबाबदार असलेल्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलीये.. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे...
आरे मेट्रो-3 कारशेड परिसरातील 100 हून अधिक झाडं एमएमआरसीएलनं काल कापली
काल पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आरे परिसरातील एकूण 121 झाडांवर कुऱ्हाड
एकूण 177 झाडं तोडण्याची एमएमआरसीएलला परवानगी, ज्यातील 56 झाडांचे प्रत्यारोपण केले जाणार
दरम्यान, एमएमआरसीएलनं 84 झाडांऐवजी 177 झाडे कापण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर
याप्रकरणी मागील आठवड्यात न्यायालयाने नाराजी व्यक्त करत एमएमआरसीएलला 10 लाखांचा दंड ठोठावला होता
सारीपुत नगर परिसरातून गाड्या आत आणण्याचे तांत्रिक कारण पुढे करत एमएमआरसीएलनं 177 झाडं तोडण्यासाठी मागितली होती परवानगी
डिसेंबर 2023 पर्यंत मेट्रो-3 चा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी सुरु करण्याचा एमएमआरसीएलचा मानस
Uday Samant Nashik : आज उद्योग मंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर असून ते उद्योग विभागाच्या महाव्यवस्थापक यांच्या वार्षिक परिषदेस उस्थितीत राहणार आहेत. या परिषदेनंतर उद्योगमंत्री सामंत हे दुपारी 12.00 वाजता गंगापूर धरणाजवळील एमटीडीसी रिसॉर्ट येथे पत्रकार परिषदेस घेणार आहेत.
Nagpur News : नागपुरात आज सरसंघचालक मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात सोबत असणार आहे. श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या वतीने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय परिसरात सुरु असलेल्या दीनदयाल थाळीच्या प्रकल्पाला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता या उपक्रमाचे विस्तार केला जात असून आजपासून सकाळसह रोज संध्याकाळीही रुग्णांच्या हजारो नातेवाईकांना दीनदयाळ थाळीचा लाभ घेता येणार आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत उपस्थित राहणार आहेत. गेली पाच वर्षे शासकीय वैद्यकीय रुग्णालय परिसरात दहा रुपयात दीनदयाळ थाळीच्या माध्यमातून तीन पोळ्या, भाजी, भात असे अन्न गरजूंना उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यामुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात विदर्भातील कानाकोपऱ्यातून आलेल्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळतो आहे.
Hingoli News: हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल सोळा हजार हळदीच्या खट्ट्यांची आवक झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सांगलीनंतर सर्वात जास्त हळदीची विक्री हिंगोलीतील संत नामदेव मार्केटयार्डमध्ये होत असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये आणली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अमरावती यवतमाळ अकोला वाशिम जळगाव या भागातील हळद मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी दाखल झाली आहे. पुढील पाच दिवस बाजार समितीचा निवडणूक प्रक्रियेमुळे हळद विक्री बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीसाठी गर्दी केली होती.
Dhule News: महापालिकेची मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची देयक एकत्रित देण्याचे नियोजन बिघडले असून शहरात मालमत्ता कराप्रमाणेच पाणीपट्टीची थकबाकी देखील कोट्यावधी रुपयांवर गेली आहे. सन 2023 24 आर्थिक वर्ष 57 हजार 996 धारकांकडे 10 कोटी 49 हजार रुपये चालू मागणी असताना थकबाकीचा आकडा हा 32 कोटी रुपयांवर गेला आहे यामुळे आता महापालिकेची पाणीपट्टी 42 कोटी 90 लाख थकीत असून पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि प्रत्यक्षात होणारी वसूल यात मोठी तफावत असल्याने महापालिकेला मोठी त्रूट सहन करावी लागत आहे. यामुळे पाणीपट्टीच्या वसुलीसाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.
Nagpur News : नागपुरात आज सरसंघचालक मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात सोबत असणार आहे. श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या वतीने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय परिसरात सुरु असलेल्या दीनदयाल थाळीच्या प्रकल्पाला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता या उपक्रमाचे विस्तार केला जात असून आजपासून सकाळसह रोज संध्याकाळीही रुग्णांच्या हजारो नातेवाईकांना दीनदयाळ थाळीचा लाभ घेता येणार आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत उपस्थित राहणार आहेत. गेली पाच वर्षे शासकीय वैद्यकीय रुग्णालय परिसरात दहा रुपयात दीनदयाळ थाळीच्या माध्यमातून तीन पोळ्या, भाजी, भात असे अन्न गरजूंना उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यामुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात विदर्भातील कानाकोपऱ्यातून आलेल्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळतो आहे.
Mumbai News : मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाची 13 तासात अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका करण्यात आली. काल दुपारी तीन वाजता अंधेरी कुर्ला रोडवर फिल्मी स्टाईलने एअर गनने गोळीबार करुन आणि धमकी देत हॉटेल व्यावसायिक अनुप शेट्टी यांचे अपहरण केले होते. खंडणी मागण्यासाठी हे अपहरण करण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे हॉटेल व्यावसायिक अनुप शेट्टी यांचा पार्टनर असलेल्या विजय ओखरीकर याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अपहरण केले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तपासासाठी 12 पथके तयार करुन आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर अवघ्या 13 तासात ठाण्यातील शहापूर इथून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या सात जणांना अटक केली आहे.
Baramati News : विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील होळ येथील प्रसिद्ध ढगाई मंदिर परिसरात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी अजित पवारांनी केली. पाहणीनंतर ढगाई मंदिरात अजित पवारांनी आरती केली. गेल्या काही दिवसांपासून नीरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. होळ गावातील प्रदूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले होते. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडलं जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्याने मासे मृत झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. त्यानंतर आज अजित पवारांनी नीरा नदीची पाहणी केली. अजित पवार सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बारामतीत कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.
Nagpur News : लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत असलेले नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांचे निलंबन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी हे निलंबनाचे आदेश काढले आहेत. राजेंद्र यांनी सुरुवातीला स्वत: हनीट्रॅप असल्याची तक्रार केली. मात्र पोलीस तपासात राजेंद्र उचके हेच दोषी असल्याचे पुढे आलं. त्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
Buldhana News : विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चिखली तालुक्यातील अमडापूर येथील एका महिलेवर ती घरी एकटी असताना शाम जुमडे आणि प्रताक कौसे या दोघांनी तिला घरात बांधून तिच्यावर 30 मे 2017 रोजी अत्याचार केले होते. यात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी काल बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यात विशेष म्हणजे पीडितेने घडलेली घटना न्यायालयासमोर सांगितली. मात्र नंतर उलट तपासणीत आपला जबाब बदलून घटना घडली नसल्याचं सांगितलं होतं. परंतु पीडितेच्या भावाचा आणि काकांनी हे प्रकरण बाहेर आपसात मिटवल्याची कबुली दिली होती. मात्र न्यायालयाने डॉक्टर, तपास अधिकारी आणि पीडितेने सुरुवातीला दिलेला 164 सीआरपीसी नुसार दिलेला जबाब ग्राह्य धरत न्यायालयाने दोघा आरोपींना आजन्म करावसाची शिक्षा सुनावली आहे.
Mumbai Local News: मुंबई लोकल ट्रेनच्या रुळांवर कचरा टाकल्याने अनेक वेळा अपघात घडले आहेत.. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये जे तांत्रिक बिघाड झाले आहेत, ते देखील याच कचऱ्यामुळे झाल्याचं समोर आलंय. हा कचरा रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत किंवा ट्रॅकमध्ये अडकल्याने तांत्रिक बिघाड होऊन रेल्वेला फटका बसतो, आणि लोकल खोळंबतात. त्यामुळे रुळांवर कचरा टाकणाऱ्या लोकांवर प्रतिबंध आणावा, आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेनं केलीये.. मुख्यमंत्री शिंदेंना त्यांनी याबद्दल पत्र लिहिलं आहे.
Andheri News: मुंबईच्या अंधेरी-कुर्ला रोडवर गोळीबार करुन हॉटेल मालकाचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी हॉटेल मालकाला जखमी अवस्थेतच गाडीत घालून पळवून नेलं.
Chandrapur News: चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील बीबी शेतशिवारात वीज पडून तब्बल 36 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. काल दुपारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरु असताना ही घटना घडली... जब्बार कुरेशी यांच्या मालकीच्या या मेंढ्या असून त्यांचं जवळपास पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय...
Kalyan News: कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसात संघटित गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे..या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कल्याण आणि डोंबिवली पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत..डोंबिवली मधील राम नगर,टिळक नगर , मानपाडा,विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करायला सुरुवात केली आहे.
Buldhana News: चिखली तालुक्यातील अमडापुर येथील एका महिलेवर ती घरी एकटी असताना शाम जुमडे व प्रताक कौसे या दोघांनी तिला घरात बांधून तिच्यावर 30 मे 2017 रोजी अत्याचार केले होते. यात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी काल बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यात विशेष म्हणजे पिडीतेने घडलेली घटना न्यायालयासमोर सांगितली मात्र नंतर उलट तपासणीत आपला जवाब बदलवून घटना घडली नसल्याचं सांगितलं मात्र न्यायालयाने पीडितेच्या भावाचा व काकांचा जवाब ग्राह्य धरत हे प्रकरण बाहेर आपसात मिटविल्याची कबुली दिली होती. मात्र न्यायालयाने डॉक्टर व तपास अधिकारी व पिडितेने सुरुवातीला दिलेला १६४ सीआरपिसी नुसार दिलेला जवाब ग्राह्य धरत न्यायालयाने दोघा आरोपींना आजन्म करावसाची शिक्षा सुनावली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आज आणि उद्या फडणवीस कर्नाटक निवडणूक प्रचारात फडणवीस सहभागी होणार
रत्नागिरी – कोकणातल्या बारसू सोलगाव रिफायनरीचा सर्वे आजपासून प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच पोलीस उपाधीक्षक, 1800 पोलीस अंमलदार असा पाऊस फाटा जिल्ह्यात तैनात झाले आहेत. आजचा आंदोलकांचा एकंदरीत पवित्रा पाहता आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.
मुंबई - मुंबई लोकल ट्रेनच्या रुळांवर कचरा टाकल्याने अनेक वेळा अपघात घडले आहेत, मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये जे तांत्रिक बिघाड झाले ते देखील याच कचऱ्यामुळे झाल्याचे पुढे आले आहे... हा कचरा रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत किंवा ट्रॅक मध्ये अडकल्याने तांत्रिक विभाग होतो आणि रेल्वे सेवेला फटका बसतो. याच कारणास्तव आता मुंबई उपनगरीय रेल्वे संघटनेने या विरोधात पाऊल उचलले असून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रेल्वे रुळांवर कचरा टाकणाऱ्या लोकांवर प्रतिबंध आणावा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यांनी केली आहे....
राज्यात पुढील चार दिवस पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे... विदर्भात विजांच्या गडगडाटासह जोरदार गारपिटीची शक्यता... 25 एप्रिल रोजी काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे... आज नागपूर व गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट असेल असा इशारा नागपूर वेध शाळेने दिला आहे... सोबतच पुढील चार दिवस मेघगर्जनांसह अवकाळी पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी वर्तवण्यात आलाय. मराठवाड्यात 26 आणि 27 एप्रिल रोजी काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलाय... त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि फळ बागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे..
कोल्हापूर – छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कुणाचा कंडका पडणार याचा फैसला आज होणार आहे.. चुरशीने 91 टक्के मतदान झाल्यानंतर आज रमणमळा याठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे... महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गट यांच्या समर्थकांना पोलिसांनी थांबण्यासाठी वेगवेगळ्या जागा निश्चित करून दिल्या आहेत... त्यामुळे दोन्ही गट एकत्र येणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतलीय... माजी मंत्री सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नाशिक - स्मार्ट सिटी अंतर्गत साकारतोय गोदापार्क... साडेतीन किलोमीटर पैकी दीड किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण... ग्रीन झोन स्पिरीच्युअल, ओपन असे वेगवेगळे झोन करण्यात आले आहेत, यांपैकी धार्मिक नागरी अशी ओळख असणाऱ्या नाशिकमध्ये स्पिरीच्युअल झोन 85 टक्के या आधीही गोदावरीच्या काठावर राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून गोदा पार्क साकारण्यात आला होता, मात्र गोदावरीच्या पुरात उध्वस्त झाल्यानं नवा गोदापार्क टिकणार का हा प्रश्न आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -