Maharashtra News LIVE Updates : बीड: विद्यार्थ्यांच अपहरण करून 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना चार तासात पोलिसांनी केली अटक
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Thane: ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांनी आणखीन एक पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 90 दिवसांत तपास करून हे चौथं पुरवणी आरोपपत्र ठाणे पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केलं आहे. 5 एप्रिल 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मंत्री असताना त्यांचा बाबतीत आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर करमुसे यांच्या अकाऊंटवरून टाकले होते.
Nanded News: नांदेडच्या नायगाव तालुक्यातील पळसगावात मागील एका महिन्यापासून विद्युत पुरवठा नाही. संपूर्ण गाव अंधारात असून विद्युत पुरवठा नसल्याने अनेक अडचणीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतोय. महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका या गावकऱ्यांना बसत आहे. विद्युत पुरवठा खंडित असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रात्र जागून काढावी लगत आहे.अनेक वेळा महावितरण कंपनीकडे तक्रारी करण्यात आल्या. पण महावितरण कंपनीने पळसगाव येथील विद्युत पुरवठा अद्याप तरी सुरळीत केला नाही.त्यामुळे या गावातील नागरिक हैराण झाले आहेत.
Beed News: बीडमध्ये एका विद्यार्थ्यांच अपहरण करून त्याच्याकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपीला बीड पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये अटक केली आहे. मनीष क्षीरसागर आणि संतोष गिरी अस या दोन आरोपीचे नाव असून त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून एका विद्यार्थ्यांचं अपहरण केलं. त्याला आज्ञास्थळावर नेऊन बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडे वीस लाख रुपयांची मागणी केली. यावेळी या विद्यार्थ्याच्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण देखील करण्यात आली. आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर विद्यार्थ्यांने थेट पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासात दोन आरोपींना अटक केली असून त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
11.30 लाखांच्या MD (मेफेड्रोन) सह दोघांना सायन परिसरातून अटक
अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटची कारवाई
फिलिप जगले (36) आणि अय्युब अब्दुल सय्यद (32) नावाच्या दोघांना अटक
सायन मिडास टॉवर जवळ गस्ती दरम्यान दोघे संशयस्पदरीत्या फिरताना आढळून आले
झडती दरम्यान 58 ग्रॅम MD जप्त
न्यायालयात हजर केले असता 26 मेपर्यंत पोलीस कोठडी
HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
Arvind Kejrival : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातोश्रीवर दाखल झाले आहेत उद्या ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत
Arvind Kejrival : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दुपारी साडे बारा वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. धिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिल्ली सरकारला मिळाला खरा, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला. हा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवाल यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. त्याचाच भाग म्हणून ते ठाकरेशी चर्चा करणार आहेत.
Maharashtra News: बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडांवर अकृषिक अर्थात एनए परवानगीची गरज असणार नाही. बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच बी.पी.एम.एस अंतर्गत करवसुली होणार आहे.याआधी दोन प्राधिकरणांकडे कागदपत्रांसह अर्ज करावे लागत होते. परंतू आता एकाच प्राधिकरणातून परवानगी घेता येणार यामुळे बांधकाम आणि विकसन परवानगी प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची आशा आहे.
Pune News : पुणे शहर आणि जिल्ह्यात आज हेल्मेट वापराच्या जनजागृतीसाठी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येत आहे. दुचाकीस्वार सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यालयात येताना आणि कार्यालयातून घरी परत जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असणार आहे. हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी, कर्मचाऱ्यांची हेल्मेट परिधान करण्याची ही कृती ही जनतेस मार्गदर्शक ठरावी आणि प्रत्येकामध्ये स्वतःबरोबरच सहप्रवाशाच्या सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या लाक्षणिक हेल्मेट दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.
Pune News : पुणे शहर काँग्रेसचे विश्रांतवाडी ब्लॉक अध्यक्ष विकास टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी कार्यालयात गळफास घेतला. नेहमीप्रमाणे टिंगरे हे त्यांच्या कार्यालयात आले होते. ते दुपारी जेवले नसल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन पाहिल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. पुण्यातील पोरवाल रोड धानोरी येथील त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात आत्महत्या केली. विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात रवाना केला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.
Washim News : नागपूरवरुन पुणे जाण्यासाठी निघालेली पर्पल ट्रॅव्हल्स बस समृद्धी महामार्ग कारंजाजवळ लोकेशन 164 जवळ चालत्या ट्रकला मागून धडक दिल्याने 12 जण गंभीर जखमी झाले. तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले. रात्रीच्या बाराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर घडली. अपघाताची माहिती मिळताच श्री गुरमंदिर रुग्णवाहिका सेवाचे रुग्णक्षेवक रमेश देशमुख हे सर्व रुग्णवाहिका घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा इथे दाखल केले. तो अपघात एवढा जबरदस्त होता की ट्रॅव्हल्स चा चालक हा टँकर आणि ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये अडकून होता. अत्यंत विचित्र अपघात झाल्यामुळे ट्रॅव्हल्समधले काही प्रवासी वरच्या बर्थवरुन खालच्या बर्थवर पडले. त्यामुळे बऱ्याच रुग्णाचे पाय आणि हात फॅक्चर झाले होते. सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले.
Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सेंट्रल व्हिस्टा कार्यक्रमावर बहिष्कार
सेंट्रल विस्टाच्या उद्घटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित राहणार नाहीत
विरोधी पक्षाच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठींबा
28 मे रोजी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टाच उद्घटन
Maharashtra News: राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये 1 जून 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीमध्ये मासेमारी करण्यास बंदी लागू करण्याचे आदेश मत्सव्यवसाय विभागाने दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे की मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जीवीत आणि वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 च्या कलम 4 च्या पोटकलम 1द्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करुन 1 जून ते 31 जुलै राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आलेली आहे..
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्ताने सांगलीच्या जत शहरात भव्य रॅली काढण्यात आली आहे. या निमित्ताने खरीप हंगाम पीक स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय आणि विभागीय स्तरावर विजेते पद मिळवणाऱ्या दुष्काळी जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. रॅलीच्या निमित्ताने विजेत्या शेतकऱ्याची बैलगाडीतून जत शहरांमधून मिरवणूक काढण्यात आली. तब्बल 33 शेतकऱ्यांची बैलगाडीतून अनोख्या पद्धतीने मिरवणूक काढत त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला आहे. विजेत्या शेतकऱ्यांचा आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते खते व बियाणे देऊन गौरव करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस
त्यानिमित्ताने शिवतीर्थसमोर अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सची गर्दी
सोबतच मंत्रमुग्ध ढोल-ताशा पथकाचं उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता करण्यात येणार
यावेळी ढोल-ताशांचा गजर शिवतीर्थबाहेर धुमणार
दादरच्या मनसेच्या विभागीय विद्यार्थी सेनेच्या वतीने आज शिवतीर्थवर येणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना स्नॅक्स बाॅक्स देण्यात येणार आहेत.
Beed News : बीडमध्ये एका गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या तरुणाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातच अंगावर डिझेल ओतून पेटून घेतल्याची घटना घडली. यामध्ये हा तरुण गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संदीप पिंपळे असा या आरोपी तरुणाच नाव असून त्याच्यावर बीडच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून संबंधित गुन्ह्यात माझा काही संबंध नसल्याचे सांगत या तरुणांना थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवरच अंगावर डिझेल ओतून पेटून घेतलं. यावेळी पोलिसांनी त्याला तात्काळ पुढच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आला आहे.
Beed News : धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर जीप आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चौसाळा बायपास रोडवर हा अपघात झाला असून या अपघातात अजित भैरट आणि अमोल बोडके या दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही आपल्या दुचाकीवरुन बीडहून उस्मानाबादकडे जात होते. त्यावेळी एका जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला
Pune News : पुण्यातील खराडी बायपास इथे एका बुलेटस्वाराने मोटार चालकाच्या डोक्यात आरसा मारल्यामुळे तो जखमी झाल्याची घटना घडली. मोटार चालक सुनील ओमप्रकाश राणा (वय 38 वर्षे) यांनी विमानतळ पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, सुनिल हे चिंबळी फाटा इथे कामानिमत्त जात होतो. जनक दर्गा येथे सिग्नल असल्याने ते थांबले होते. मोटारीसमोर पांढऱ्या रंगाची बुलेट एक मुलगा आणि मुलगी बसलेले होते. युवक मोटार सायकल पुढे मागे करत असल्यामुळे सुनील यांनी हॉर्न वाजवला. त्याच्या पाठीमागे बसलेल्या मुलीला राग आल्यामुळे तिने शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याचा जाब विचारताचत्या मुलाने सुनील यांना त्याच्या मोटारसायकलचा आरसा काढून डोक्यात घातला.
धुळे : धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर जीप आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौसाळा बायपास रोडवर हा अपघात झाला असून या अपघातात अजित भैरट आणि अमोल बोडके या दोघांचा या भागामध्ये मृत्यू झाला आहे. हे दोघेही आपल्या दुचाकीवरून बीडहून उस्मानाबादकडे जात असताना एका जीपने त्यांच्या दुचाकीला जोराचे धडक दिली आणि यामध्येच हा अपघात झाला
Chandrapur News: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावरील गोळीबार प्रकरणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जिल्हाध्यक्ष राजवीर यादव आणि त्याचा भाऊ अमर यादव याला पोलिसांनी अटक केलीये. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये नोकरी लावून देण्यासाठी आरोपी राजवीर यादवने संतोष रावत यांना ६ लाख दिले होते आणि हे पैसे परत न केल्याने हा हल्ला केल्याची कबुली आरोपीने दिलीये.
Gyanvapi Gauri Case: ज्ञानवापी खटल्याशी संबंधित सात याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वाराणसी कोर्टाने (Varanasi court) घेतला आहे. सातही याचिकांची एकत्रित सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. (वाचा सविस्तर)
RTE: आरटीई प्रवेश निवड यादीत स्थान मिळूनही तब्बल 30 हजार 911 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यानं विद्यार्थ्यांच्या पालकांचं प्रवेश निश्चिती करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
Mumbai News : गेली पाच वर्षे रखडलेल्या लोअर परळ रेल्वे स्थानकावरील डिलाइल रोड उड्डाणपुलाची गणपतराव कदम मार्गाकडील बाजू मे अखेर सुरू करण्यात येणार आहे. तर संपूर्ण पूल जुलैमध्ये सुरू होणार आहे. दरम्यान, पुलावर पदपथ नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर या पुलाला सरकते जिने जोडण्याबाबत चाचपणी करण्याचा विचार मुंबई महानगरपालिका प्रशासन करीत आहे.
राज्य कार्यकारिणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अॅक्शन मोडवर
सर्व जिल्हा समन्वयकांना पक्ष विस्तारासाठी काम करण्याचे आदेश
आज दुपारी प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक
या बैठकीत पक्ष वाढीसाठी कसे काम करायचे याच्या सूचना देणार
जिल्ह्याची बांधणी कशी सुरू आहे याचा घेणार आढावा
याच सोबत येत्या काळात जिल्हा अध्यक्ष देखील बदलायचे आहेत याचाही आढावा घेतला जाणार
राज्य कार्यकारिणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अॅक्शन मोडवर
सर्व जिल्हा समन्वयकांना पक्ष विस्तारासाठी काम करण्याचे आदेश
आज दुपारी प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक
या बैठकीत पक्ष वाढीसाठी कसे काम करायचे याच्या सूचना देणार
जिल्ह्याची बांधणी कशी सुरू आहे याचा घेणार आढावा
याच सोबत येत्या काळात जिल्हा अध्यक्ष देखील बदलायचे आहेत याचाही आढावा घेतला जाणार
Mumbai News: मुंबई पारबंदर किमी प्रकल्पातील 21.81 लांबीच्या सागरी सेतूचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या सेतूवरून आता मालवाहतूक करणारी वाहने, बांधकाम साहित्याची ने-आण करणे शक्य होणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाची पाहणी करणार आहेत.
Buldhana Rain: बुलढाणा जिल्ह्यातही मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे मलकापूर - बुलढाणा मार्गावर अनेक ठिकाणी झाडं कोसळली. यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. अनेक भागांमधला वीजपुरवठा देखील खंडित झाला होता..
Nashik Rain: नाशिकच्या सटाणा तालुक्याला मंगळवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपले.. गेल्या दोन महिन्यांपासून या भागात सातत्याने गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.. मंगळवारी सटाणा तालुक्यातील जुनी शेमळी, आराई ब्राम्हणगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला.. या भागातील गोरख बाबाजी शेलार यांच्यासह अनेक घरांचे पत्रे उडाले. अनेक झाडं उन्मळून पडली, विजेचे उभे पोल देखील या पावसाने कोसळले.. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
दिल्लीचे मुख्यमंत्री दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
दिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये वाव देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला, हाच केंद्र सरकारचा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवालांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटीची मोहिम हाती घेतली आहे त्या अंतर्गत केजरीवाल आज उद्धव ठाकरे दुपारी 4 वाजता तर आज शरद पवारांची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत.
एकनाथ शिंदेंनी बोलावली पक्षातील खासदारांची बैठक
उद्धव ठाकरे लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढाव घेत आहेत. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित केलाय.
रात्री 8 वाजता वर्षा निवास्थानी होणाऱ्या बैठकीत शिंदे लोकसभा निहाय कामाचा आढावा घेणार आहेत.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु, मनोहर जोशी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार, जोशींची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
समीर वानखेडेंची आज पुन्हा सीबीआय चौकशी.
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांना सीबीआयनं आज बीकेसीतील मुख्यालयात पुन्हा हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांच्या बरोबर द्विपक्षिय चर्चा करतील. दोन्ही नेत्यामधली ही एका वर्षातली पाचवी भेट असेल. आज ते ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल डेव्हिड जॉन हर्ले आणि विरोधी पक्ष नेते पीटर डेटन यांची भेट घेतील.
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पत्रकार परिषद
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पत्रकार परिषद घेणार आहेत, सकाळी 11.30 वाजता. यावेळी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि अनुराग ठाकूर उपस्थित असतील.
मुक्ताई पादुका आणि विठ्ठल मूर्ती दर्शन सोहळ्याचे आयोजन श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. अनेक वर्षापूर्वी संत सखाराम महाराज यांना मुक्ताई पादुका भेट म्हणून मिळाल्या होत्या. या संत मुक्ताबाई यांच्या पादुका आणि विठ्ठल मूर्ती दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी मोठ्या संख्येने जुने श्रीराम मंदिर येथे गर्दी करणार आहेत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -