Maharashtra Live Updates : दोन गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या चार आरोपींना अटक, बीड पोलिसांची कारवाई
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
बीड शहरातील चांदणी चौक कंकालेश्वर मंदिर त्याचबरोबर शाहूनगर येथून दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आयपीएस धीरज कुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बीड शहरातील काही तरुणांकडे गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कंकालेश्वर मंदिर परिसर त्याचबरोबर चांदनी चौक आणि शाहूनगरमध्ये जाऊन या चार आरोपींना अटक केली.
Nashik : बाजार समितीच्या निवडणुकीवरुन राजकिय वातावरण तापलं
काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकी दिल्याचा आरोप
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे उमेदवार शिवाजी चुंबळे आणि त्यांच्या मुलाकडून धमकी आल्याचा खोसकर यांचा आरोप
खोसकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल
हिरामण खोसकर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या पॅनलच्या प्रचार करत असताना प्रचार करू नका अशी आली धमकी
एबीपी माझ्याशी बोलताना खोसकर यांना अश्रू अनावर. माझ्या जीवाचे बरे वाईट झाले तर काय करणार
मी प्रचार करणार नाही, दुसऱ्या कार्यक्रमांना जाणार खोसकर यांची एबीपी माझाला माहिती.
पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
जळगाव – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच जळगाव रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत... पाचोऱ्यात होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी संजय राऊत जळगावात, तर गुलाबराव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून संजय राऊतांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न... झेंडे दाखवणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात
पुणे - 14 वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू... वेदांत धामणगावकर असे या तरुणाचे नाव असून पुण्यातील हडपसर भागातील दुर्दैवी घटना... उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता त्यावेळी त्याच्या छातीत दुखायला लागल होतं
मुंबई - लवकरच राज्यातील ग्रामीण भागात ज्युनियर केजी आणि सिनियर केजी सुरू केले जाणार आहे... नव्या शैक्षणिक धोरणाच्या राज्यात अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून अंगणवाडी चे रूपांतर नर्सरी मध्ये होणार असून त्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाचा अभ्यास सुरू आहे... ग्रामीण भागातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी हा मोठा निर्णय लवकरच घेतला जाईल
मुंबई : मुंबई विद्यापीठ एलएलबी सत्र सहाच्या परीक्षा या तीन मे पासून मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये घेतल्या जाणार आहेत... मात्र अवघ्या बारा दिवसांवर परीक्षा असताना अद्यापही मुंबई विद्यापीठाने परीक्षेचे अर्ज भरून घेतले नाही, शिवाय हॉल तिकीट सुद्धा विद्यार्थ्यांना दिलेले नाही... दुसरीकडे वेळापत्रक या परीक्षेचा जाहीर केला आहे त्यामुळे विद्यार्थी पुन्हा एकदा गोंधळात सापडले आहेत... आता विद्यार्थ्यांचे अर्ज कधी भरून घेतले जाणार आणि कधी हॉल तिकीट विद्यार्थ्यांना मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे...
यवतमाळ - खरीप हंगामात केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेले कपाशीचे htbt हे बियाणे (चोर बीटी) विक्रीचे मोठे रॅकेट राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यात सक्रिय आहे ?? या बियाण्यावर तणनाशक फवारणी करता येत असल्याने शेतकरी ही याची खरेदी करतात. हे बियाणे आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या राज्यातून सीमावर्ती जिल्यातून यवतमाळ सह विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्हात पोहचते. अंदाजे एकट्या यवतमाळ जिल्ह्यात दीड लाख चोर बीटी पाकिटे पोहोचतात.. ज्यांची किंमत जवळपास 11 ते 12 कोटींचे असते. तर राज्यातील कापूस उत्पादक 14 जिल्ह्यात 110 कोटींचे हे चोर बीटी बियाणे रॅकेट मार्फत पोहोचतात. मात्र, या बनावट htbt बियाण्याची उगवन क्षमता नसल्याने शेतकऱ्यांना दुबार, तिबार लागवड करावी लागते. तसेच तण नाशकाच्या फवारणीमुळे जमिनीची पोत खराब होते. एक तर केंद्र शासनाने htbt अधिकृत बियाणे पुरवावे अथवा या चोरट्या मार्गाने येणाऱ्या नकली बियाण्यांच्या माध्यमातून होणारी शेतकऱ्यांनाची फसवणूक टाळावी अशी मागणी होत आहे.
अकोला - बाळापूर मतदारसंघातील 69 गावांच्या पाणीप्रश्नावरचं राजकारण काही करता थांबण्याचं नाव घेत नाही. कारण, या प्रश्नावर पाणी आरक्षण स्थगित केल्याचा निषेधार्थ ठाकरे गटाचे आमदार यांनी पदयात्रा काढत मोठं रान उठवलं होतं. बाळापूर मतदारसंघातील 69 गावांच्या पाणी योजनेसाठी तेल्हारा तालूक्यातील वान प्रकल्पातील 3.65 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आलं आहे. आता तेल्हारा तालूक्यातील लोकजागरन मंचाचे नेते अनिल गावंडे यांनी थेट पाणी आरक्षित केलेल्या वारी येथील वान प्रकल्पाच्या भिंतीवर शेतकर्यांसह आमरण उपोषण सुरू केलंय. बाळापूरसाठी आरक्षित केलेलं पाणी आरक्षण कायमचं रद्द करण्याची त्यांची मागणी आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -