Maharashtra News LIVE Updates :  विरारमधील अनियमित पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण, बविआकडून आयुक्तांना निवेदन 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Feb 2023 07:55 PM
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार 

 नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु.) येथील एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार काल दुपारी घडलाय.  या प्रकरणी आज पोस्को अंतर्गत अर्धापूर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल संजय इंगोले ( वय 20 ) असे संशयिताचे नाव आहे.    


इंगोले याने सहा वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केलाय. चिमुकलीला गावातील बस स्टॅन्डकडे जाणाऱ्या रोडवरील पुलाखालील पाईपमध्ये नेऊन मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर अतिप्रसंग केलाय. 

पथपेडीच्या जाचाला कंटाळून बीडमध्ये मुख्याध्यापकाची आत्महत्या

पथपडीकडून कर्ज परत करण्यासाठी तगादा लावल्याने बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील असरडोह येथे एका मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नितीन पाटोळे असे या मुख्याध्यापकाचं नाव असून त्यांनी माजलगाव येथील मंगलनाथ पतसंस्थेकडून कर्ज घेतलं होतं. मात्र काही कारणास्तव कर्जाचे हप्ते थकल्यामुळे पथपेडीकडून वारंवार त्यांच्याकडे कर्ज फेडण्याचा तगादा लावण्यात येत होता. याच विवंचनेतून नितीन पाटोळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

Vasai Virar: विरारमधील अनियमित पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण, बविआकडून आयुक्तांना निवेदन 

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत सध्या अनियमीत पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना आता पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत आहे. विरारच्या मनवेल पाडा परिसरात होत असलेला अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आज बविआने पालिकेवर मोर्चा काढून आयुक्ताना निवेदन दिलं.


विरारच्या मनवेलपाडा या भागात मागील एका वर्षापासून अनियमीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले होते.  पाण्यासारखी अत्यावश्यक गरज पूर्ण होत नाही, सातत्याने अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या संतापाचा आज कडेलोट झाला. बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आज वसई विरार शहर महानगरपालिका कार्यालयावर तेथील नागरिकांनी आंदोलन केलं होतं. सध्या वसई विरारमध्ये एक दिवसआड पाणी पुरवठा होत आहे. तर कधी पाण्याची लाईन फुटणे, पाईप लाईन दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा थांबवणे असे प्रकार घडतात. त्यामुळे पाणी टंचाईच सावट सध्या वसई विरारमध्ये कायमस्वरुपी जाणवत आहे. आज नागरिकांनी पालिकेच्या आयुक्तांना पाणी पुरवठा नियमित करण्यासंदर्भात निवेदन देवून, चर्चा केली. पाणी पुरवठा नियमित न झाल्यास बविआतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

 वर्धा येथील हिंगणघाटच्या खारडी-भारडी घाटावर अवैध रेती उपशावर मोठी कारवाई, 29 टिप्पर आणि 6 बोटींसह 3 पोकलॅन्ड जप्त

 वर्धा येथील हिंगणघाटच्या खारडी-भारडी घाटावर अवैध रेती उपशावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 29 टिप्पर आणि 6 बोटींसह 3 पोकलॅन्ड जप्त करण्यता आले आहेत. वर्ध्यात रेती घाटावर महसूल प्रशासन आणि पोलिस विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे.  

महाराष्ट्रतील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली; दिवसभरात ठाकरे गटाकडून युक्तिवाद, उर्वरित युक्तिवाद उद्या होणार 

महाराष्ट्रतील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली; दिवसभरात ठाकरे गटाकडून युक्तिवाद, उर्वरित युक्तिवाद उद्या होणार 

केंद्र सरकारची पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करणार, राज्यात आदर्श शाळांची निर्मिती होणार

केंद्र सरकारची पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करणार


महाराष्ट्रातील आदर्श शाळांची निर्मिती करून या शाळांचं पूर्ण स्वरूपच बदलणार


प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात मंत्री मंडळ बैठकीत चर्चा


योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांमध्ये खलबत


केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये योजनेची घोषणा केली


देशात 14 हजार 597 शाळा सुरु करणार


आदर्श शाळा म्हणून या शाळा ओळखल्या जातील


देशातील 18 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार

Chandrapur : बल्लारपूर विधानसभेची जागा लढवण्याचे शिवसेनेचे संकेत, भाजपचे सुधीर मुनगंटीवार करतायेत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व

Chandrapur : बल्लारपूर विधानसभा जागा शिवसेना लढवणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट संकेत आहेत. सध्या ही जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे. सध्या भाजपचे सुधीर मुनगंटीवार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आगामी काळात या जागेवर दावा करण्याचा आणि संघटनात्मक बांधणीसाठी 288 मतदारसंघात शिवसेना कार्यरत राहणार असल्याचं अंबादास दानवे यांचं वक्तव्य. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आज बल्लारपूर येथे होता कार्यकर्ता मेळावा, राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मेळाव्याला उपस्थिती

Satara News : फलटण येथील 12 जणांवर मोकांतर्गत कारवाई 

Satara News : फलटण येथील 12 जणांवर मोकांतर्गत कारवाई 


दरोडा जबरी चोरीसह अने गंभीर गुन्ह्यातील आरोपी  


सुरज बोडरे यांच्यासह 12 जणांवर कारवाई


सातारा जिल्हापोलिस प्रमुखांच्या आदेशावरून कारवाई

माध्यमांच्या कार्यालयावर धाड, हे कोणत्या लोकशाहीत बसतं? उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray:  बीबीसीच्या कार्यालयावर धाड पडली आहे हे कोणत्या लोकशाहीत बसतं? आवाज उठवला तर चिरडून टाकू, ही पाशवी वृत्ती थांबवावी लागेल. भारतमाता गुलाम करण्याचा प्रयत्न आहे ते रोखायला एकत्र यायला हवं, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Nawab Malik : नवाब मलिक खरंच आजारी आहेत हे पटवून द्या : हायकोर्ट

Nawab Malik : नवाब मलिक खरंच आजारी आहेत हे पटवून द्या - हायकोर्ट


जामीनावर तातडीच्या सुनावणीसाठी आलेल्या मलिकांना कोर्टाचे निर्देश


नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब


तर मलिकांना कोणताही गंभीर आजार नसल्याचा तपासयंत्रणेचा हायकोर्टाच दावा


नवाब मलिकांची जामीनासाठीची याचिका फेटाळून लावण्याची मागणी


21 फेब्रुवारीच्या सुनावणीत मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर युक्तिवाद करण्याचे वकिलांना निर्देश

Amravati Crime : 25 हजारांच्या दागिण्यासाठी अज्ञात चोरट्यांनी वृद्धाची केली हत्या

Amravati Crime News : 25 हजाराच्या दागिण्यासाठी अज्ञात चोरट्यांनी वृद्धाची शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील करजगाव येथे  घडली. वरुड तालुक्यातील करजगाव येथील शंकरराव अढाऊ (वय 82) आणि पत्नी सुलोचना अढाऊ हे दोघेही घरात असताना रात्री तीन अज्ञात चोरटे घरात शिरले आणि सुलोचना अढाऊ यांचा चेहरा आणि डोळे दाबून गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील बिरी दोन्ही 25 हजारांची जबरदस्तीने चोरून नेले. यावेळी घरात झोपलेले शंकरराव अढाऊ यांच्यावर झोपेत शस्त्राने चेहऱ्यावर वार करून जीवानिशी ठार केले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू


Palghar Accident : पालघमधील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी एशियन पेट्रोल पंप येथे दुचाकी आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावर असलेल्या अनधिकृत कटामुळं तिघांचा बळी गेला आहे.  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 29 ब्लॅक स्पॉट आहेत यापैकी चारोटी येथील एशियन पेट्रोल पंप जवळ असलेल्या अनधिकृत कटमुळे ट्रिपल सीट बाईकवर असलेल्याना भरदार ट्रेलर खाली बाईक स्वार आल्याने बाईक वरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. कासा पोलीस घटनास्थळी दाखल असून अधिक तपास करत आहेत.

Maharashtra Political Crisis: ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद 

Maharashtra Political Crisis: राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे  सुनावणी सुरु. दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद सुरु आहे.   ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तीवाद  यांनी केला


कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद



  • पदमुक्तीची नोटीस  दिल्यानंतर अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत

  • या निर्णयामुळे अध्यक्षांचा निवाडा करण्याचा अधिकार जातो

  • त्याचे परिणाम म्हणून इथे नवं सरकार, नवे मुख्यमंत्री नवे अध्यक्ष आले

  • अध्यक्ष कायम त्यांच्या राजकीय पक्षाला प्राधान्य देतात

  • अध्यक्षांनी कधीही पक्षपाती असू नये

Maharashtra Political Crisis:  शिंदे, ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाचा आज महत्त्वाचा दिवस, सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

Maharashtra Political Crisis:  महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण सत्तासंघर्षातल्या महत्वाच्या सुनावणीला  सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे

अंगणवाडी सेविकेच्या आत्महत्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Nandurbar News : अंगणवाडी सेविकेच्या आत्महत्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तोरणमाळ विभागाच्या महिला बाल विकास अधिकाऱ्याचाही समावेश आहे. 

Sanjay Raut : फडणवीस जगातलं 10 आश्चर्य, वैफल्यातून त्यांची खोटी वक्तव्य : संजय राऊत

Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जगातलं 10 आश्चर्य असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. विधानपरिषदेच्या पराभवातून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य आले आहे. आमच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी ते खोटी वक्तव्य करत आहेत. ते आणखी पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडले नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

Maharashtra Politicis : महाराष्ट्र सत्तासंघर्ष, सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय होणार?

Maharashtra Politicis :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सध्या हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आहे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी आहे. घटना पीठासमोरचे जे आठ मुद्दे आहेत. त्यापैकी केवळ एका मुद्द्यावर म्हणजे अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना पिठासीन अधिकारी अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतात की नाही या मुद्द्यावर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्याकडे देण्याची मागणी आहे. सध्या अरुणाचल प्रदेशच्या नबाम रेबिया केसनुसार अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाहीत असा कोर्टाचा निकाल. महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशच्या केस मधली परिमाणं आणि संदर्भ वेगळे असल्याने याबाबत फेरविचार करण्याची ठाकरे गटाची मागणी. प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेलं तर याचा अर्थ याबाबत फेरविचाराला तयार आहे कोर्ट

Mumbai Fire News : मुंबईत आगीच सत्र सुरूच, सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन परिसरात आग

Mumbai Fire News : प्रभादेवी येथील नव्याने होणाऱ्या सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन परिसरात आग. शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल झाल्या आहेत.

Wardha News : नागपूर-मुंबई महामार्गवरील कवठा झोपडी येथे नागरिकांचा रास्ता रोको

Wardha News : नागपूर-मुंबई महामार्गवरील कवठा झोपडी येथे नागरिकांचा रास्ता रोको


मध्यरात्रीपासून गावाकऱ्यांनी केला रास्ता रोको


गावातील दारुविक्रेत्यांच्या त्रासामुळे नागरिकांचे आंदोलन 


गावातील दारूबंदी करावी या मागणीसाठी आंदोलन


रात्री काही दारुविक्रेत्याच्या बाहेरून येणाऱ्या सहकाऱ्यांनी गावात तोडफोड केल्याने नागरिक संतप्त


दारुविक्रेती महिला आणि गुंडगिरी करणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मागणी


दारूबंदी असतांनाही गावात होत होती दारुविक्री


रात्रीपासून रास्ता रोको असल्याने वाहनाच्या रांगा


जिल्हा पोलीस अधीक्षक येई पर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याची नागरिकांची माहिती 


पुलगाव पोलीस विरोधात नागरिकांची घोषणाबाजी

Aurangabad News : औरंगाबादच्या बिडकीन शासकीय रुग्णालयातील स्लॅबचा भाग कोसळला 


Aurangabad News : औरंगाबादच्या बिडकीन शासकीय रुग्णालयातील स्लॅबचा भाग कोसळला 


उपचार घेणारे रुग्ण थोडक्यात बचावल


बेडवर रुग्ण नसल्याने मोठी दुर्घटना टळली

Aurangabad News : औरंगाबादच्या बिडकीन शासकीय रुग्णालयातील स्लॅबचा भाग कोसळला 


Aurangabad News : औरंगाबादच्या बिडकीन शासकीय रुग्णालयातील स्लॅबचा भाग कोसळला 


उपचार घेणारे रुग्ण थोडक्यात बचावल


बेडवर रुग्ण नसल्याने मोठी दुर्घटना टळली

Indapur News : इंदापूर तालुक्यात सापडली बॉम्ब सदृश वस्तू

Indapur : इंदापूर तालुक्यात बॉम्ब सदृश वस्तू सापडली.


इंदापूर तालुक्यातील टनु गावातील शेतकऱ्याला सापडली बाॅम्ब सदृश वस्तt. BDDS चे पथक टणू गावात दाखल


Bdds चे पथक तपास करीत आहे 


घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, पाच महिलांचा मृत्यू

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्ग ओलांडताना एका चार चाकी गाडीनं ठोकर दिल्यानं ही घटना घडली आहे. एका लग्न कार्यात काम करण्यासाठी 17 ते 18 महिला स्वारगेटवरुन पीएमपीएमएल बसने खेड तालुक्यात आल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ त्या उतरल्या. मात्र, अंधारात त्यांना महामार्ग ओलांडायचा होता. वयस्कर आठ महिला चाचपतडत होत्या. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने आलेल्या चारचाकीने आधी एका महिलेला धडक दिली. त्यानंतर गाडीवरचा ताबा सुटला अन इतर सात महिलांनाही त्याने ठोकर दिली. यात काही महिलांचा जागेवर तर काहींच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन महिलांवर उपचार सुरू आहेत. चालक मात्र, पुन्हा पुण्याच्या दिशेने पसार झाला आहे. खेड पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

खेळता खेळता डास पळवण्याच्या मशीनमधील लिक्विड गेले चिमुकलीच्या तोंडात, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू

Nagpur News : डास पळवण्यासाठी लावलेली मशीनमधील लिक्विड खेळता खेळता तोंडात गेल्यानं एका दिड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आशीर्वाद नगरमध्ये घडली. रिद्धी चौधरी असे या चिमुकलीचे नाव आहे. रविवार खेळता खेळात रिद्धीच्या हाती डास पळवण्याची मशीन लागली. नकळत त्या मशीनचे लिक्विड रिद्धीच्या तोंडात गेले. त्यानंतर तिची प्रकुर्ती खराब झाल्यानं आईवडिलांनी तिला रुग्णालयात भरती केले असता, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


14 February Headlines : सुप्रीम कोर्टात आज राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट कोणते निर्देश देणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सर्वोच्च बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राज्यासह देशभरात व्हेलेंटाइन डे निमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सतर्क असणार आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. 
READ MORE


दिल्ली 
- महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार असून राज्याच्यादृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या सुनावणीत हे प्रकरण पाच ऐवजी सात न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे सोपवलं जाणार का? आजच्या सुनावणीत हे प्रकरण 'डे टु डे' सुनावणीसाठी घेणार का यावर निर्णयाची शक्यता आहे. 


मुंबई 
- राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक  होणार आहे. महत्त्वाच्या तीन विकास आराखड्यांचाही सादरीकरण केले जाणार आहे. त्याशिवाय, मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णयही अपेक्षित आहेत. 


- साल 2002 च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी ख्वाजा युनूसच्या कोठडी मृत्यूप्रकरणी त्या चार पोलिसांना पुन्हा आरोपी करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका करण्यात आली आहे. युनूसची आई आसिया बेगमच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर आज सुनावणीची शक्यता आहे. 



- जमीन जिहाद विरोधात आज चेंबूर येथे भाजपचे आणि सकल हिंदू समाज चेंबूरच्यावतीने आज आंदोलन होणार आहे. आमदार नितेश राणे हे या आंदोलनात मुख्य वक्ते असणार आहेत.


- दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते “महिम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-शिवाजी पार्क जिमखाना” आयोजित महिलांच्या टी-20 क्रिक्रेट सामन्याचे उद्घाटन होणार आहे 


- आज प्रेमाचा दिवस... हा दिवस जगभरात व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. राज्यभरातही आज दिवसभर अनेक ठिकाणी विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर काही ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसही सतर्क असणार आहेत.



ठाणे 
- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन भाजप करणार आहे. 


पुणे 
- कसबा आणि चिंचवड निवडणूकीत आता रंग येऊ लागला आहे. दोन्ही पक्षांकडून प्रचारांचा धडाका सुरू आहे. चिंचवड आणि कसब्यात महाविकास आघाडीचे नेते तळ ठोकून आहेत. काही दिवसांपूर्वी एकमेकांबद्दल बोलणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यानिमित्तानं प्रचारात एकत्र फिरताना दिसत आहेत.


रत्नागिरी 
- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणात रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेणार आहेत.


 


नाशिक 
-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. संजय राऊत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. 


नागपूर 
- बजरंग दल, नागपूर महानगरच्या वतीने व्हॅलेंटाइन डे च्या विरोधात चेतावनी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली छावणी दुर्गा माता मंदिर, काटोल रोड इथून निघणार आहे


पालघर 
- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज वसई तालुक्यात येत असून विविध ठिकाणी त्यांचा दौरा आहे.


चंद्रपूर 
- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला दानवे संबोधित करणार आहेत. 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.