Maharashtra News Updates 10th April 2023 : आरेतील मेट्रो कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; 17 एप्रिलला होणार सुनावणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Apr 2023 11:02 PM
Mumbai News: रश्मी उद्धव ठाकरे 19 बंगलो घोटाळा प्रकरणी अलिबागमधील कोर्लई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांना पोलिसांकडून अटक; भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांची माहिती

Mumbai News:  रश्मी उद्धव ठाकरे 19 बंगलो घोटाळा प्रकरणी अलिबागमधील कोर्लई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांना पोलिसांनी आज अटक केली; भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांची माहिती 

Yavatmal News : यवतमाळ: 25 टन साखरेसह ट्रकवर दरोडा; चालक, क्लिनरला केली मारहाण, करळगाव घाटातील घटना

Yavatmal News : दरोडेखोरांनी 25 टन साखरेसह ट्रकवर दरोडा टाकला. यावेळी ट्रक चालक व क्लिनरला मारहाण करून साखरेसह ट्रक घेवून पोबारा केला. ही पहाटे चार वाजताच्या सुमारास करगाव घाटात घडली. दरम्यान पोलिसांनी जलद गतीने तपासचक्र फिरवीत तीन संशयित आरोपींना अटक केली. तर चोरी गेलेला ट्रक वणी येथे पकडलेला आहे

Beed News: अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयातील लिपिकाला 37 हजार रुपयांची लाच घेताना अटक

Beed News: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयातील एका लिपिकास 37 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अशोक नाईकवाडे असं या लिपिकाचे नाव असून मयत कर्मचाऱ्यांच्या जागेवर अनुकंप तत्वावर त्याच्या पत्नीला नोकरीत नियुक्त करण्याची ऑर्डर काढून देण्यासाठी नाईकवाडे यांनी तक्रारदाराकडे 80 हजाराची लाच मागितली होती. यामधीलच 37 हजार रुपये घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशोक नाईकवाडे या लिपीकाला अटक केली आहे. 

Mumbai News:  आरेतील मेट्रो कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; एमएमआरसीएलच्या प्रतिज्ञापत्रावर सोमवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश 17 एप्रिलला होणार सुनावणी

Mumbai News:  आरेतील मेट्रो कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात


याचिकाकर्त्यांना एमएमआरसीएलच्या प्रतिज्ञापत्रावर सोमवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश


17 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी


मात्र याचिकेमुळे मेट्रो प्रकल्पाला उशिर होत असून दिवसाला 5.6 कोटींचं नुकसान होत असल्याचा अैडव्होकेट जनरल तुषार मेहतांचा दावा


हा खर्च याचिकाकर्त्यांकडून वसूल करण्याची सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयानं नाकारली

Mumbai News: बॉलीवूड गायक मिका सिंगची  मुंबई उच्च न्यायालयात धाव; 17 वर्षे जुना एफआयआर रद्द करण्याची मिकाची याचिकेतून मागणी

Mumbai News:  बॉलीवूड गायक मिका सिंगची  मुंबई उच्च न्यायालयात धाव


राखी सावंतच बळजबरीनं चुंबन घेतल्याबद्दल मिका सिंहविरोधात दाखल गुन्ह्याचं प्रकरण


17 वर्षे जुना एफआयआर रद्द करण्याची मिकाची याचिकेतून मागणी 


याप्रकरणी राखी सावंतला आपलं प्रतिज्ञापत्र दाखल करत भूमिका करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश 


मिकाच्या याचिकेवर पुढील आठवड्यात पुन्हा होणार सुनावणी 


न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी

Mumbai News: बॉलीवूड गायक मिका सिंगची  मुंबई उच्च न्यायालयात धाव; 17 वर्षे जुना एफआयआर रद्द करण्याची मिकाची याचिकेतून मागणी

Mumbai News:  बॉलीवूड गायक मिका सिंगची  मुंबई उच्च न्यायालयात धाव


राखी सावंतच बळजबरीनं चुंबन घेतल्याबद्दल मिका सिंहविरोधात दाखल गुन्ह्याचं प्रकरण


17 वर्षे जुना एफआयआर रद्द करण्याची मिकाची याचिकेतून मागणी 


याप्रकरणी राखी सावंतला आपलं प्रतिज्ञापत्र दाखल करत भूमिका करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश 


मिकाच्या याचिकेवर पुढील आठवड्यात पुन्हा होणार सुनावणी 


न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी

Mumbai- Nashik Highway Accident: मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर नऊ जण जखमी

Mumbai- Nashik Highway Accident: ॲमेझॉन कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहाटेच्या सुमारास घेऊन जाणारी मिनी बस मुंबई नाशिक महामार्गावर   अचानक बसचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे.   महामार्गावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध  दिशेने गेल्याने समोरून येणाऱ्या कंटेनर आणि मिनी बसची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात  बस क्लीनरचा  मृत्यू झाला असून त्याच्या मृतदेहाला शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेय  तर बस मध्ये बसलेले नऊ जण गंभीर जखमी झाले असून  त्यांना उपचारासाठी कल्याण रोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Ratnagiri News: रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल नाका उद्यापासून सुरू होणार

Ratnagiri News: रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल नाका उद्यापासून सुरू होणार


उद्या सकाळपासून हातिवले टोल नाक्यावर टोल वसुलीला होणार सुरुवात

 

मुंबई - गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने सर्वपक्षीयांनी टोल सुरू करण्यास केला होता विरोध

 

भाजप नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झाले होते सर्वपक्षीय आंदोलन

 

पण, आता NHAI नं परवानगी दिल्यामुळे उद्यापासून टोल वसूलला होणार सुरुवात
राज्यात पुन्हा पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज 

राज्यात पुन्हा पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज 


मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस अवकाळीचा अंदाज 


विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता 


13 आणि 15 एप्रिल रोजी काही ठिकाणी गारपिटीची शक्यता 


विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज, कुठेही गारपिटीची शक्यता नाही

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार; शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची माहिती

Maharashtra News: स्कायमेटकडून यंदाचा मान्सून 94 टक्के (+/- 5 टक्के) राहण्याचा अंदाज 

स्कायमेटकडून यंदाचा मान्सून 94 टक्के (+/- 5 टक्के) राहण्याचा अंदाज 


यंदाचा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याचा स्कायमेटचा अंदाज 


देशात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या दीर्घ कालावधीसाठी 868.6 मिमी सरासरी राहण्याची शक्यता 


देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज 


गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत अपुरा पाऊसाचा अंदाज 


पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता

Maharashtra News: सिंधुदुर्गातील आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावी यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच आमदार नितेश राणेंना साकड

Maharashtra News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यामध्ये जुन्या आणि नवीन कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठ्या प्रमाणात तफावत असून नवीन कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जुन्या कर्मचाऱ्यांना कमी मानधन आहे. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे या कर्मचाऱ्यांना दोन दोन उपकेंद्रे सांभाळावी लागत आहेत. त्यामुळे रिक्त पदे लवकरात लवकर भरावी. या मागण्या प्रामुख्याने सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे आमदार नितेश राणे यांच्याजवळ करण्यात आल्या. यावर आरोग्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले. 

शिंदे सरकार हे शेतकऱ्यांबद्दल गतिमान, रामाचं दर्शन घेतल्यावर महागतिमान होतील : महादेव जानकर

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्याबद्दल गतिमान आहे, ते आता रामाचं दर्शन घेतल्यावर अजून महागतिमान होतील अशी टीका महाराष्ट्र राज्य माजी मंत्री महादेव जानकर यांनी लगावला आहे.


राष्ट्रीय समाज पक्षाचा ठाणे जिल्हा कार्यकर्ता मेळावा बदलापूरच्या संजीवनी हॉलमध्ये पार पडला, यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री महादेवजी जानकर यांना पत्रकारांनी शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न केला असता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांबद्दल गतिमान आहेत आता रामाचं दर्शन घेतल्यानंतर महागतिमान होतील. तसेच आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पर्यायी व्यवसाय करण्याचा विचार केला पाहिजे, 1932 मिरचीचा दर हे 32 रुपये किलो होता आणि सोन्याचा दर हा 500 रुपये तोळा होता. आता सोन्याचा भाव जवळजवळ 60 हजार रुपये तोळा झालेला आहे आणि मिरचीचे दर फक्त चाळीस रुपये इतकेच आहे. तसेच शेतकऱ्याच्या मुलांना उद्योगपती होण्यासाठी देखील सरकारने प्रयत्न केल पाहीजेल, असं व्यक्तव महाराष्ट्र राज्य माजी मंत्री महादेव जानकर केलं आहे. 


 

Maharashtra Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात समावेश

Maharashtra Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  (Maharashtra Local Body Election) निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तारीख पे तारीख चा सिलसिला सुरू असलेल्या या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात समावेश करण्यात आला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आज तरी सुनावणी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

India Covid-19 Mock Drill: देशभरात आज आणि उद्या 'कोरोना मॉकड्रील'

India Covid-19 Mock Drill: कोरोनाच्या (Coronavirus Updates) तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रील (Mock Drill) केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही? याची खात्री केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) मॉकड्रिलची पाहणी करण्यासाठी झज्जरच्या एम्स रूग्णालयात उपस्थित राहणार आहेत. तर मुंबईत आज सकाळी 11 वाजता जे. जे. रुग्णालयात, दुपारी 12 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय तर दुपारी 1 वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉकड्रील होणार आहे.  


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Akola News: अकोल्यातील पारस गावात झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू, अनेक भाविक जखमी

Akola News: अकोला जिल्ह्यातील पारस गावात मंदिरावर लिबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 20 ते 25 जण जखमी आहेत. बाबूजी महाराज मंदिरात ही दुर्घटना घडली. रविवारी रात्री 9च्या सुमाराला मंदिरात 50 ते 60 भाविक होते. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होते. बहुधा या वाऱ्यामुळेच लिंबाचं मोठं झाड शेडवर कोसळलं. पाऊस रात्रभर सुरू असल्यानं मदतकार्यात प्रचंड अडथळे येत होते. तरीही प्रशासन आणि ग्रामस्थांकडून शक्य तितक्या वेगानं मदतकार्य सुरू होतं. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रील केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..


देशभर मॉकड्रील केले जाणार 


मुंबई/दिल्ली – कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रील केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही याची खात्री केली जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता जे जे रुग्णालयात, दुपारी 12 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय तर दुपारी 1 वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉकड्रील होणार आहे.  
 
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज पुढची तारीख मिळण्याची शक्यता आहे. आज कोर्टाच्या कामकाजात 39 नंबर वर प्रकरण आहे.गेल्या आठ महिने या प्रकरणावर सुप्रिम कोर्टात सुनावणी नाही. प्रकरण कामकाजाच्या यादीत पण प्रत्यक्ष सुनावणी होणार का याबद्दल पुन्हा चर्चा.


नितीन देशमुख आंदोलनाच्या पवित्र्यात 


अकोला – बाळापुरचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणीप्रश्नावरून पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आपासून 21 एप्रिल पर्यंत अकोला ते नागपूर पदयात्रा काढणार आहेत. अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून यात्रेला सुरूवात करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत ही पदयात्रा असणार आहे. 21 एप्रिलला ही पदयात्रा नागपुरात पोहचेल. ते दररोज सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात दररोज 25 किलोमीटर अंतर पार करणार आहेत. त्यांच्यासोबत मतदारसंघातील जवळपास एक हजार लोक पदयात्रेत सहभागी आहेत. या पदयात्रेत एका टँकरमध्ये फडणवीसांची आंघोळ घालण्यासाठी या 69 गावातील जमा केलेल्या पाण्याचा टँकर ते सोबत घेणार आहेत.  
 
मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्याला ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. कारण लवकरच ठाकरे गटाकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौरे करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कदाचित आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे या दौऱ्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे यांना याबाबत सूचक विधान केलं आहे. 
 


ठाणे – आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधीच्या महाराष्ट्रातील सभेची तारीख आणि स्थळ निश्चित केलं जाणार आहे. या बैठकीत प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी, राज्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, सकाळी 11 वाजता, राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे. रिपोर्टर – राजू (सकाळी 8.30 वाजता अल्पेश करकरे लाईव्ह)


फडणवीस अमरावती दौऱ्यावर 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित पुष्पांजली आणि अभिवादन कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर स्वातंत्र्य पूर्वकाळापासून शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या आणि वऱ्हाडाचे भूषण ठरलेल्या शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेला यंदा 100 वर्षे पूर्ण होतायत त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दुपारी 12.30 वाजता सहभागी होणार आहेत. त्यानंतर रिद्धपुर येथे होणाऱ्या मराठी विद्यापीठाची पाहणी करतील.



मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विमुक्त जाती भटक्या जमातीचे आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व भटक्या जाती विमुक्त जमाती सेलचे जिल्हाध्यक्षांना बोलवलं आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित असतील तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दुपारी 1.30 वाजता बैठकीत सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. 


मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयानं तिघांना ईडीच्या कारवाईपासून दिलंल तूर्तास अंतरिम संरक्षण आहे कायम. मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्टात हसन मुश्रीफ यांची 3 मुलं, साजिद, आबीद आणि नाविद या तिघांनी केलाय अटकपूर्व जामीन अर्ज.



वर्धा – जिल्ह्यातील अल्लीपूर नजीकच्या मनसावली या गावात एका पीठ गिरणीने गावातील नागरिकांसाठी अनोखी योजना सुरू केलीये. ही पीठ गिरणी ग्राम पंचायतच्या मालकीची आहे. येथे ग्राम पंचायतीचा कर भरणाऱ्यास मोफत दळण दिले जाते. 100 टक्के कर भरा आणि दळण मोफत मिळवा. 


 
राजस्थान – राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या पत्रकार परिषदेनंतर कॉग्रेस नेतृत्व सतर्क झालेय. प्रभार सुखजिंदर सिंह रंधावा राजस्थान मध्ये पोहचणार आहेत. यावेळी ते सचिन पायलट आणि मुख्यमंत्री गहलोत यांच्या बरोबर चर्चा करणार आहेत.


दिल्ली – गोधरा हत्याकांडीतील दोषींच्या जामिनावर सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत कोर्टाने गुजरात सरकारला दोषी प्रत्येक व्यक्तीची गुन्ह्यातील भुमिका स्पष्ट करायला सांगितली आहे.


-        किरिट सोमय्या पुण्यातील जंबो कोवीड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पुन्हा एकदा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विजय पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत.


परभणी – कारखाने बंद होण्याआधी उसाचे बिल द्या, 2021-22 पीक विमा, अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आमरण उपोषण केले जाणार आहे.



 मुंबई – मराठा क्रांती मोर्चा महामुंबईचं आंदोलन. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर मराठा समाजाच्या लाभधारक लोकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यांसाठी, तसेच महामंडळा तर्फे चालेल्या ढिसळ कारभारामुळे मराठा समाजाच्या उद्योजकांवर होणाऱ्या नुकसानाची जवाबदारी निश्चित करण्यासाठी, व्याज परतावे वेळेवर मिळावेत आणि कर्ज सुलभ होण्यासाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम पुर्णपणे लागू करण्यासाठी, आणि मराठा समाजच्याच मुलानं महामंडळाच्या नोकरीत समविष्ट करण्यासाठी तसेच निधी परत जाणार असेल तर ती कुणाची चुक? सरकारला दोष देण्यापेक्षा दिलेल्या सवलती का देण्यात येत नाही या सर्व मागण्यांसाठी, दुपारी 1 वाजता, किल्ला कोर्टाच्या पाठीमागे महामंडळाचे ऑफीस समोर. 


 बॉलिवूड स्टार नवाझऊद्दीन सिद्धिकीनं आपली पत्नी झैनाबविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सुनावणीत नवाझ आणि त्याच्या पत्नीनं आपापसातले वाद सांमज्यानं मिटवण्याचं कोर्टापुढे मान्य केलं होते. त्याबाबत आज हायकोर्टात आपले निर्देश जारी करणार.


-  मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्ंयाची समस्या आणि उघड्या मैनहोल्स संदर्भात दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी.


-        खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांनी सामना पेपरा बातमी छापून, मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत मागील तारखेस कोर्टात हजर न झाल्यानं, न्यायालयानं त्यांना ठोठावला होता एक हजार रुपये दंड. मात्र आज संजय राऊत शिवडी कोर्टात हजर राहण्याची शक्यता.


- मुंबई सत्र न्यायालयात सदानंद कदम याच्या जामीन अर्जावर सुनावणी. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम याना ईडीनं केली आहे अटक. मात्र कदम सध्या न्यायालयीन कोठडीत. मुंबई सत्र न्यायालयात कदम यांनी दाखल केलाय जामिनासाठी अर्ज. सदानंद कदम हे आमदार माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय.


आयपीएलमध्ये आरसीबी आणि लखनौ यांच्यामध्ये आज सामना होत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.