स्मार्ट बुलेटिन | 12 नोव्हेंबर 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
१. राज्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता, विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला अलर्ट
२. कामावर परतू इच्छिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची भाजपकडून अडवणूक, परिवहन मंत्री परबांचा आरोप, नाशिकामधील दगडफेकीच्या घटनांसह काही ठिकाणी संपाला हिंसक वळण
ST Workers Strike : गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे एसटी महामंडळानं शिवनेरी बसद्वारे पुणे आणि नाशिकमधून सेवा सुरू केली आहे. शिवनेरी बसवर खासगी चालकांची ड्युटी लावून बस नाशिकवरून पुणे, मुंबईसाठी रवाना करण्यात आल्या. संपात फूट पाडण्यासाठी शिवनेरी सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच शिवनेरी बसेसवरील एसटी महामंडळाचा लोगो काढण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणखी किती दिवस सुरु राहणार?
एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणखी किती दिवस सुरु राहणार? प्रवाशांचे होणारे हाल कधी थांबणार? सहा दिवस झाले पण या प्रश्नांची उत्तर कुणालाच शोधता आलेली नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सहावा दिवस आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणीवर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तर न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. अशातच काल नाशिकमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली.
३. मानेचं दुखणं बळावल्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रियेला सुरुवात, ज्येष्ठ ऑर्थो सर्जन शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया
४. बूस्टर डोससंदर्भात लवकरच धोरण जाहीर करणार, केंद्रीय कोविड टास्क फोर्सची माहिती, नोंदणीशिवाय तिसरा डोस न घेण्याचं सर्वांना आवाहन
५. वक्फ बोर्डाप्रकरणी ईडीनं सुरु केलेल्या कारवाईला घाबरत नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल, तर आजपासून मलिकांविरोधात हाजी अराफत यांच्या पत्रकार परिषदांचा सिलसिला
६. स्वातंत्र्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगनावर सर्व स्तरातून टीकेची झोड, वरुण गांधींकडून खरपूस समाचार, पद्मश्री परत घेण्याची काँग्रेसची मागणी
७. मुंबईत दोन ठिकाणी आगीच्या घटना, मानखुर्दमध्ये लेव्हल तीनची भीषण आग
८. राज्यात गुरुवारी 997 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 28 जणांचा मृत्यू, वाशिम जिल्हा कोरोनामुक्त
९. नव्या अवतारात पबजीची भारतात एंट्री, दोनशे देशांमध्ये पबजी न्यू स्टेट लॉन्च, गेममध्ये 2051 सालचा सेटअप
१०. पाकिस्तानला नमवत ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत, रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं विजय