Fishing Boat  : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून 26  ऑक्टोबरला मच्छिमारासाठी गेलेली एक नौका अद्याप परतलीच नाही. या नौकेवर एकूण सात जण खलाशी होते. त्यापैकी एकाचा दोन दिवसानंतर मृत्यूदेह हाती लागला. जर नौका बुडाली असती तर तिचे अवशेष का नाही सापडले. घातपात झाला असेल तर पोलिसांच्या हाती दहा दिवस उलटूनही काहीच हाती लागले नाही. नक्की काय आहे हा प्रकार यावरचा हा ग्राउंड रिपोर्ट.. 


मच्छिमार आपल्या जीभेचे नेहमीच चोचले भागवणारा. याच मच्छिमारांचे ना स्वतःचे समुद्र ना स्वतःची जागा. किनाऱ्यावर आपला बस्ता मांडून समुद्रातील मासळी पकडून त्यावर आपला उदारनिर्वाह करणारा. निसर्ग निर्मीत वादळे. आपत्ती यासारख्या येणाऱ्या अनेक संकटांना सामोरं जात जीवाची पर्वा न करता किनाऱ्यावर राहून आपले संपूर्ण आयुष्य मासळीतच घालवतो. रोजच्याप्रमाणे गुहागर तालुक्यातील साखरी आगारमधील दत्तात्रय तांडेल आपले सहकारी अनिल आंबेकर, गोकुळ नाटेकर, दगडू तांडेल, सुरेश कांबळे, दत्तात्रेय पोवार, अमोल जाधव यांच्यासह मच्छिमारीसाठी जयगड बंदरावर गेले. नासिर संसारे यांच्या मालकीची ‘नावेद‘ ही मच्छीमारी बोट गेल्या 26 ऑक्टोबरला पहाटे जयगड बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाली. ही बोट 28 ऑक्टोबरपर्यंत जयगड बंदरात येणे अपेक्षित होते. मात्र 30 ऑक्टोबरपर्यंत ही नौका जयगड बंदरात परत आली नाही. नौकेशी संपर्क साधण्याचाही तटरक्षक दलाकडून प्रयत्न करण्यात आला. पण संपर्क काही होत नव्हता. बेपत्ता झालेल्या नौकेचा शोध घेण्यासाठी मत्स्य विभागाची नौका, तटरक्षक दल,पोलिसांची यंत्रणा सुरु होती. दोन दिवसानंतर एकाचा मृत्यूदेह शोध पथकाला हाती लागला. 


दोन आठवडे उलटूनही बेपत्ता असलेल्या खलाश्यांचा पत्ता लागलेला नाही त्यामुळे गावातील कोळी बांधव चांगलेच संतापले..जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन पुन्हां एकदा चर्चेला आली.
- मारुती होडेकर, रहिवासी साखरी आगार गुहागर


समुद्र शांत असतांना आमची नौका बुडालीच कशी..आमची नौका वाऱ्यावादळाने बुडालेली नसून जिंदाल कंपनीच्या बोटीने तीचा अपघात केलेला असावा असा आमचा संशय आहे.. 
- बशीर होडेकर,  जयगड मच्छिमार सोसायटी संचालक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha