Government Employees Strike Update: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील वेगवेगळ्या विभागाचे शासकीय कर्मचारी संपावर (Government Employees Strike) गेले असून, संपाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्याचे जाहीर केले असून, संप मागे घेण्याचं आवाहन केले होते. मात्र असे असताना कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस (Notice) पाठवायला सुरुवात केली आहे. दरम्यान मराठवाडा विभागातील (Marathwada Division) सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे.
संपावर (Strike) गेलेल्या मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीची नोटीस देण्यात आले आहे. त्यामुळे आता संपाबाबत प्रशासन 'अॅक्शन मोड'मध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच 'काम नाहीतर वेतनही नाही, या धोरणाचा अवलंब शासनाने केल्याचेही नोटीसमधून सांगण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील वेगवेगळ्या 78 विभागांतील 23 हजार 622 पैकी 8 हजार 722 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तसेच 14 हजार 596 कर्मचारी कामावर हजर आहे. तर मराठवाडा विभागातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूरमधील महापालिका वगळून सुमारे 80 हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे विभागात वेगवेगळ्या विभागातील 54 हजार 171 कर्मचारी संपावर असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण सव्वालाख कर्मचारी संपावर गेले आहेत.
चौथ्या दिवशीही संप सुरुच...
जुन्या पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यासह राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी (Government Employees) संपाची हाक दिली. त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर होऊ लागला आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी देखील संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. तर अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा कोलमडले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान आज चौथ्या दिवशी देखील संप कायम असून, कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत.
संपकरी आकडेवारी...
अ.क्र. | जिल्हा (कार्यालयाचे ठिकाण) | संपकऱ्यांची संख्या |
1 | विभागीय आयुक्तालय | 21 |
2 | छत्रपती संभाजीनगर | 7,738 |
3 | जालना | 4,536 |
4 | परभणी | 5,251 |
5 | हिंगोली | 3,982 |
6 | नांदेड | 10,764 |
7 | बीड | 7,430 |
8 | धाराशिव | 5,626 |
9 | लातूर | 7,826 |
एकूण | 54,171 |
इतर महत्वाच्या बातम्या :
Government Employees Strike: अखेर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात