पंढरपूर : गोवा वनविभागात कार्यरत असलेले अधिकारी योगेश बिटीयो वेळीप वय २८, राहणार पनसुलेमळ, कोतीगाव दक्षिण गोवा हे अचानकपणे २७ फेब्रुवारी रोजी हरवले. याबबत कानकोना पोलिस स्टेशनला ते हरवले असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर हे अधिकारी सोलापूर जिल्ह्यात असल्याची प्राथमिक माहिती पोलीस नियंञण कक्षाला मिळाली.

संबंधित अधिकारी हे सोलापूरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तपासाचे आदेश देताच पंढरपूर शहर पोलिसांनी शहरातील हॉटेल, लॉजेस आणि भक्तनिवासांमध्ये शोध मोहीम राबवली आणि केवळ एका तासात या अधिकाऱ्यांना शोधून काढले.

पोलिसांनी या शोधमोहिमेसाठी दोन टीम करीत वन अधिकाऱ्यांचा हुडकून काढलं. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी आपल्या टीम सह तांञिक विश्लेषणाचे आधार घेत त्यांचा शोध घेतला. सदर वन अधिका-यांस २ मार्च रोजी राञी दीड वाजण्याच्या सुमारास महाद्वार रोड येथील भक्त निवास येथुन ताब्यात घेतले. याचबरोबर कानकोना पोलीस स्थानकातील पोलीस निरिक्षक नाईल यांच्याशी संपर्क साधत गोवा पोलीस हवालदार दिपक गावकर आणि भाऊ दशरथ बिटीयो यांच्या ताब्यात दिले.

Web Exclusive | औरंगाबादचा तरुण शेतकरी सुनिल थोरात भारत प्रवासावर

 ताब्यात देण्यात आलेले अधिकारी पंढरपूरला कसे पोहोचले याची माहिती त्यांना सांगता आली नसली तरी पंढरपूरकडे येण्यापूर्वी त्यांनी एकविरा देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितल्याची माहिती मिळत आहे. मात्र गोवा येथून एकविरा देवीला आपण कसे गेलो किंवा सोमवारी रात्री पंढरपूरला कसे पोहोचलो हे मात्र य अधिकाऱ्याला सांगता आले नाही. दरम्यान मंगळवारी सकाळी पंढरपूर शहर पोलिसांनी या वन अधिकाऱ्यांना गोवा पोलिसांच्या ताब्यात दिलं.