सातारा : ईडीच्या नोटिशीमुळे चर्चेत आलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाप्रकरणी उदयनराजेंनी मागितलेली माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं नाकारली. त्यात जरंडेश्वर कारखान्याला दिलेल्या कर्जाप्रकरणाची कागदपत्रं आणि ईडीच्या नोटिसाबाबत माहिती मागितली होती. याबाबत बँकेने संबंधित माहिती गोपनीय असून ती देता येत नसल्याचे लेखी स्वरुपात उदयनराजेंना कळवले आहे. त्यानंतर उदयनराजेंनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्याधिकारी बँकेतच न आल्यानं उदयनराजे संतापले. 


सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील हाय होल्टेज ड्राम्यानंतर उदयनराजे भोसले यांनी बँकेच्या आवारातच पत्रकारांशी संवाद साधताना गोपनीयतेच्या आधारावर जिल्हा बँकेने माहिती देण्यास नकार दिल्याच्या कारणास्तव ते संतप्त झाले होते. उदयनराजेंनी जरंडेश्वर कारखान्याला दिलेल्या कर्ज आणि ईडीने या कर्ज प्रकरणावर जी नोटिस दिली होती त्यात ईडीला नेमकी काय माहिती दिली या बाबत माहिती मागितली होती. यावर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनी बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी तुम्हाला माझी जिरवायची असेल तर जिरवा परंतु तुम्ही बँकेला बुडवू नका अशी हात जोडून विनंती केली. उदयनराजे यांनी आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी ही सर्व माहिती मागत असल्याचेही सांगितले. 


Exclusive: जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण: अजित पवारांना क्लिनचीट देणारा 'तो' अहवाल 'एबीपी माझा' च्या हाती 


काय आहे प्रकरण?


पश्चिम महाराष्ट्रातील  जरंडेश्वर साखर कारखाना सध्या चर्चेत आहे. हा कारखाना लिलावात घेताना बेकायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवून केल्याच्या आरोपातून हा कारखाना अंमलबजावणी संचालनालयानेने सिल केला आहे. सध्या हे प्रकरण ताजे असताना आता इडीने आपली नजर या कारखान्यांना कर्ज पुरवणाऱ्या बँकांवर वळवली आहे. यामध्ये साताऱ्यातील नावाजलेली जिल्हा मध्यवर्ती बँकेही आहे. इडीने या कर्ज प्रकरणाची सर्व कागदपत्रे मागवली आहेत. इडीने ही कागद पत्रे मागवल्यामुळे सहकार क्षेत्राबरोबर शेतकरी सभासदांमध्ये मोठी चर्चा सुरु झाली आहेच. शिवाय या बँकेच्या प्रशासकीय मंडळाबरोबर सर्व संचालक मंडळाचीही चांगलीच तंतरली आहे. या बँकेचा इतिहास तपासला जात असताना या कारखान्याच्या नावे नव्याने घेतलेले कर्ज हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. कारण ज्या बँकानी कर्ज दिले त्या बँकावर वर्चस्व हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे होते. तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सर्व सदस्य हे राष्ट्रवादीचे होते. दरम्यान या बँकेचे अध्यक्ष म्हणूनही आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची निवड करण्यात आली होती. सध्या ते भाजपमध्ये असले तरी अद्यापही तेच या बँकेचे अध्यक्ष आहेत.


Shivendra Raje Bhosale: जरंडेश्वरला कर्ज दिलं तेव्हा उदयनराजे भोसले यांची हजेरी : शिवेंद्रराजे भोसले