Chhagan Bhujbal : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवायांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. त्यावरुन वारंवार विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. केंद्रात सत्ता असलेलं भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (ED) जप्त केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा तसेच राज ठाकरे यांच्यावर आरोप करत निशाणा साधला आहे. काय म्हणाले भुजबळ?
आमच्या पुर्वजांनी घेतलेल्या प्रॉपट्याही ईडीने जोडल्या
ईडी अटक करताच जामीन मिळणं कठीण असतं, ईडीचा कायदा हा राक्षसी कायदा आहे, आधी राज्य सरकारच्या चुका दाखवा, वैयक्तिक आरोप कशासाठी? असा सवाल भुजबळांनी केलाय.भाजपकडून (BJP) ईडीचा दुरुपयोग होत असून आमच्या पुर्वजांनी घेतलेल्या प्रॉपट्याही ईडीने जोडल्या आहेत. भारतात अशी असंख्य प्रकरणं, केसेस पूर्ण झाल्याचं नाही आणि प्रॉपर्टी अटँच राहतात. भाजपविरोधात बोललात, की काहीना काही शोधून कारवाई करायचीचं, असं ठरवून कारवाई केली जाते. यात अनेक नेते भरडले जातायत, हे नाकारता येत नाही. घोटाळ्यांशी संबंध असलेले अनेक नेते भाजपच्या गेले आणि त्यांच्यावरची कारवाई थांबली. अनेक नेते भाजप विरोधात बोलायचे ते आता भाजपची प्रशंसा करायला लागले. ईडीचा प्रताप सर्वांना भोगावा लागतोय, जिथे जिथे भाजप विरुद्ध राज्य, त्या राज्यांना खिळखिळे करण्यासाठी या सगळ्या गोष्टी होतायत. निवडणुकीला आता 2 वर्षे राहिली, तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडणुकीत उभे राहा, मग कळेल लोक कुणाच्या बाजूने, पुन्हा राज्य मिळावे, हे सरकार पडलं पाहिजे म्हणून असं जबरदस्तीने करणं योग्य आहे असं वाटत नाही
आम्ही कारवाई केली की जामीन मिळतो. ईडीन कारवाई केली की जामीन मिळत नाही.
भुजबळ म्हणाले, आम्ही कारवाई केली की जामीन मिळतो. ईडीन कारवाई केली की जामीन मिळत नाही. तुम्ही भाजपच्या विरोधात बोललात की कारवाई होते, तुम्ही विरुद्ध बोलणार नाही तोपर्यंत काही कारवाई होणार नाही, जे विरुद्ध बोलत नाही त्यांनी काही काळजी करण्याचं कारण नाही.
राज ठाकरेंच्या भूमिकेवर छगन भुजबळ यांचं मोठ वक्तव्य
राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केला. शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादींवर टीकास्त्र सोडलं. यावर ईडीची नोटीस मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी ट्रॅक बदलला, राज ठाकरेंच्या भूमिकेवर छगन भुजबळ यांनी मोठ वक्तव्य केलंय.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
1999 ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लिहिला म्हणून त्यांना जातीवरून सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. ते काही म्हणाले की ते ब्राम्हण आहेत, असं म्हणत त्यांच्यावर टीका व्हायची, असेही राज ठाकरे म्हणाले.