Aurangabad News: औरंगाबाद दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागात पोहचले आहे. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी जाणून घेतली. तर याचवेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली आहेt. तर गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी मी स्वतःरस्त्यावर उतरेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री म्हणाले की पाऊस किती पडावा महापलिका ठरवत नाही. अस्मानी संकट आपल्या हातात नसतात. पण घोषणाची अतिवृतिष्टी सुरु आहे. भावनांचा दुष्काळ या सरकारमध्ये आहे. हे ऊत्सव मग्न सरकार आहे. उत्सव साजरे करा पण आपली प्रजा ही सुखी, समाधानी आहे का? हे देखील पहिले पाहिजे. हे सरकार बेदकरपने सांगत की, ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्थिती नाही. त्यामुळे आता मंत्र्यांना चिखलात बुडवलं पाहिजे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
तर माझा हा दौरा प्रतिकात्मक केला आहे. शिधा वाटपात घोटाळा झाला की, नाही हे पुढे समोर येईल. मी जे म्हणतोय ते शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवाळी सजारी करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही का?. ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर झालं पाहिजे होतं. पण भावनांचा दुष्काळ आहे. हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळाली पाहिजे ही मागणी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
घर सोडून फिरतायेत, त्यांना शेतकऱ्यांचं दु:ख काय कळणार
उद्धव ठाकरे 24 मिनिटांत काय पाहणी करणार अशी टीका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना घरामध्ये सर्वकाही देऊन देखील ते घर सोडून बाहेर फिरतायत त्यांना शेतकऱ्यांच्या घरामध्ये काय दुःख आहे हे कसे कळणार असा टोला ठाकरे यांनी लगावला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात जो आसूड आहे, त्याची ताकद त्याने दाखवली पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मंत्र्यांना चिखलात बुचकळून ओला दुष्काळ दाखवायचं का?
दोन प्रकारच्या अपत्या असतात, जिथे पाऊस पडत नाही त्याला आपण कोरडा दुष्काळ म्हणतो. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान होते. आत्ता देखील पिकाचे मातीमोल झाले आहे. त्यामुळे आता ओला दुष्काळाचा निकष लावतांना या मंत्र्यांना चिखलात बुचकळून काढायचे का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भावनेचा कोरडा दुष्काळ आहे. दगडाला पाझर फुटतो सरकारला पाझर का फुटत नाही?, त्यामुळे सरकराने आता सरकारला घाम फोडला पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.