Maharashtra Cabinet Expansion: शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तत्पूर्वी औरंगाबाद येथील काही आमदार मंत्रिपद मिळावे म्हणून, हजारो कार्यकर्ते घेऊन शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मुंबईकडे निघाले आहे. यावरूनच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रिपद मागण्यासाठी आमदारांचे कार्यकर्ते मारामाऱ्या करतील अशी टीका खैरे यांनी केली आहे. तर एकदा मंत्रीमंडळ विस्तार होऊ द्या त्यांनतर शिंदे गट फुटेल असेही खैरे म्हणाले. 


आमदार संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला मंत्रीपद मिळावे म्हणून, मुंबईत जाऊन शक्तिप्रदर्शन करणार आहे. यावर बोलतांना खैरे म्हणाले की, आमदारांचे शक्तिप्रदर्शन फक्त मंत्रिपदासाठी सुरु आहे. बरे झाले या दोघांमध्ये आपापसात स्पर्धा चालू आहे. अब्दुल सत्तार जोरात आहेत, संजय शिरसाट सुद्धा जोरात आहे. दोघांच्या एसी बस मुंबईकडे निघाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आमच्या नेत्याला मंत्री करा म्हणून दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामाऱ्या होण्याची शक्यता असल्याचं खैरे म्हणाले. 


शिंदे गट फुटणार... 


काही दिवसांत बंडखोरी करणाऱ्यांमध्ये जबरदस्त वैचारिक मारामाऱ्या होतील. त्यांनतर उगाच इकडे आलो म्हणत शिंदे गट फुटेल, असे खैरे म्हणाले. काही दिवसांतच अशी अवस्था असणार आहे. दोन्ही गट एकमेकांपेक्षा कोण वरचढ आहे, यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे हे काही जास्त दिवस चालणार नाही. तुम्ही पुढे पहा काय होते, मंत्रिपद मिळाले नाही म्हणून अनेकजण फुटणार आहे. 50 आमदारांपैकी 13 लोकांना मंत्रिपद मिळणार आहे. आजकल सगळे सत्तेचे भुकेले आहेत,त्यामुळे नाराजीमुळे अनेकजण फुटतील असा दावा खैरे यांनी केला आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?


Abdul Sattar: महाराष्ट्राला 18 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले: अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंना टोला