Aurangabad News: आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोणता पक्ष कोणासोबत जाणार या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान याचवेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीबाबत (Vanchit Bahujan Aaghadi & MIM Alliance) मोठं विधान केले आहे. वंचित-एमआयएमची युती होईल का? या प्रश्नाला उत्तर देतांना जलील म्हणाले की, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उत्तुंग, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे असले तरी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवता येणार नसल्याचं जलील म्हणाले. तर प्रकाश आंबेडकरांच्या भोवती आरएसएसच्या (RSS) लोकांचा वेढा असतो, असेही जलील म्हणाले. दिव्य मराठी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जलील यांनी हे वक्तव्य केले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने युती करत निवडणूक लढवली होती. त्यावेळी राज्यातून जलील यांच्या रूपाने या युतीचा पहिला खासदार निवडून आला होता. मात्र पुढे ही युती टिकली नाही. दोन्ही पक्षातील युती का तुटली याबाबत अजूनही स्पष्ट कारण समोर आले नाही. पण जेव्हा-जेव्हा राज्यात महत्वाच्या निवडणुका येतात, त्यावेळी या दोन्ही पक्षात पुन्हा युती होईल या चर्चा सुरु होतात. आता आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा अशीच काही चर्चा सुरु आहे. पण यावावर जलील यांनी केलेल्या विधानामुळे युतीची शक्यता कमीच वाटत आहे.
काय म्हणाले जलील...
यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, वंचित आणि एमआयएम यांच्यात युती होण्याची शक्यता खूपच कमी आहे. करण प्रकाश आंबेडकर हे उत्तुंग, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे असले तरी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवता येणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या भोवती आरएसएसच्या लोकांचा वेढा असतो, असेही जलील म्हणाले. त्यामुळे आता जलील यांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर काय बोलणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणूकीत 40 जागा लढवणार...
तर याच मुलाखतीत बोलतांना जलील म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम 40 जागा लढवणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद, नंदुरबार, धुळे आणि बीड जिल्ह्याबाबत आमची तयारी सुरू असल्याचं जलील म्हणाले. तर मी स्वतः पुन्हा एकदा औरंगाबाद लोकसभा लढवणार असल्याचं देखील जलील यांनी स्पष्ट केले.
Aurangabad: पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्याने फळबाग पेटवून दिली