Urfi Javed Struggle Story : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून तिच्या पोस्ट आणि हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत आहे. स्पवक्तेपणामुळे उर्फी नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वीच उर्फीने इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली आहे. अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली असली तरी तिला प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागला आहे. 

Continues below advertisement

एका मुलाखतीत उर्फी म्हणाली,"मी 11 वीत असल्यापासूनच मला अडचणींचा सामना करावा लागला आहे. एका अज्ञात व्यक्तीने माझा फोटो चुकीच्या साइटवर टाकला होता. त्यावेळी मला घरच्यांच्या पाठिंब्याची गरज होती. पण त्यांचाही पाठिंबा मला मिळाला नाही. उलट घरच्यांनी माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला". 

उर्फीचा संघर्ष (Urfi Javed Struggle) 

घरच्यांच्या छळला कंटाळून उर्फीने घर सोडलं आणि खऱ्या अर्थाने तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. घर सोडल्यानंतर उर्फीने दिल्लीतील एका पार्कात आठ दिवस काढले. जेवणासाठी पैसै नसल्याने उपाशी रहावे लागले. त्यानंतर काही मैत्रीणींच्या घरी ती काही दिवस राहिली. उर्फीला हळूहळू कामं मिळू लागली आणि तिच्या आयुष्यात सुगीचे दिवस येऊ लागले. 

Continues below advertisement

उर्फी जावेद कोण आहे?

उर्फी जावेद आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बडे भैया की दुल्हनिया' या कार्यक्रमाच्या माध्यमातून उर्फीने मनोरंजनविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने 'चंद्र नंदिनी', 'मेरी दुर्गा', 'बेपनाह', 'कसौटी जिंदगी' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. पण 2021 साली 'बिग बॉस ओटीटी'च्या (Bigg Boss OTT) माध्यमातून उर्फी घराघरांत पोहोचली. 

उर्फी जावेद कोट्यवधींची मालकीण

उर्फी जावेद मालिकेच्या एका भागासाठी 30,000 ते 40,000 मानधन घेते. मालिकांसह जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती लाखो रुपये कमावते. दर महिन्याला ती 1.5 कोटी रुपये कमावते. उर्फीची गणना छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. 

संबंधित बातम्या

Urfi Javed Income : कधी साखळी, पिन, तर कधी वायर...; 'कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल' उर्फी जावेद कोट्यवधीची मालकीण, संपत्ती ऐकून बसेल धक्का