Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रविवारी औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांचा हा दौरा औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर घडलेल्या एका राजकीय नाट्य घडामोडींमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, या घडामोडींमुळे एक नंबरऐवजी मुख्यमंत्र्यांची 9 नंबरला पसंती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. 


एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याने शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांकडून त्यांच्या स्वागतासाठी चिखलठाणा विमानतळावर जोरदार तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री यांना कार्यक्रमास्थळी जाण्यासाठी विमानतळावर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची 1 नंबर क्रमांकाची चॉकलेटी रंगातील 'लँड रोव्हर' आणि मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांची 'नऊ नंबर'ची पांढऱ्या रंगाची त्याच कंपनीची अशा दोन आलिशान गाड्या विमानतळावर सज्ज होत्या. पोलिसांनी दोन्ही गाड्यांना 'क्लिअरन्स' दिला होता. पण शिंदे यांनी शिरसाट यांच्या एक नंबरऐवजी भुमरेंच्या 9 नंबरला पसंती पसंती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी पुढील दौरा भुमरेंच्या 9 नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या 'लँड रोव्हर'मधून प्रवास केला. 


पुन्हा भुमरेंनी बाजी मारली...


सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्यांमध्ये औरंगाबादच्या शिवसेना आमदारांची संख्या सर्वाधिक होती. ज्यात संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, रमेश बोरनारे यांचा समावेश होता. मात्र पुढे झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारावेळी संजय शिरसाट यांचे नाव आघाडीवर असताना ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले आहे. तर संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली. त्यातच आता पुन्हा एकदा विमानतळावर शिंदे यांच्यासाठी शिरसाट यांनी आपली गाडी उभी केली असताना भूमरेंनी बाजी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. 


समागम सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती 


महाराष्ट्राचा 56 वा प्रांतीय निरंकारी संत समागम सोहळ्याचे (Maharashtra Nirankari Sant Samagam) आयोजन औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन डीएमआयसीमध्ये तब्बल 300 एकरवर करण्यात आला आहे. याच समागम सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे आशीर्वाद घेतले. तसेच यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी संवाद साधला. तसेच महाराष्ट्र ही संतांची भूमी असून समाजाला दिशा देण्याचे काम संत करत असतात. मानवजातीच्या कल्याणासाठी ते सतत कार्यरत असतात. निरंकारी मंडळातील साधक देखील आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात असे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


Nirankari Sant Samagam: रोज 50 हजार लिटर दुध अन् 72 क्विंटलचं भात; औरंगाबादमध्ये भव्यदिव्य समागम सोहळा