Aurangabad News: औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने येणार आहे. दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून शिंदे यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र याचवेळी श्रीकांत शिंदेंच्या सभेच्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्र लावण्यात आले आहे. ज्यात सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी नमस्कार करताना पाहायला मिळत आहे. (Aaditya Thackeray Cartoon On Shrikant Shinde Sabha) 


अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात श्रीकांत शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र याचवेळी सभेच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या मंडपाच्या परद्यांवर आदित्य ठाकरे यांचं व्यंगचित्र लावण्यात आला आहे. ज्यातून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधतांना सत्ता असताना आणि सत्ता नसताना असे चित्र या व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे. या व्यंगचित्रात सत्ता असताना सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे आणि सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधणारे आदित्य ठाकरे दाखवण्यात आले आहे.


यामुळे लावले व्यंगचित्र...


याबाबत बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, खरे म्हणजे आदित्य ठाकरे यांनी सभा रद्द केल्याचे मला कळाले होते. त्यांची सभा रद्द झाल्याने किमान त्यांचे व्यंगचित्र तरी आमच्या सभेत लोकांना पाहायला मिळाला पाहिजे. सत्तेत असताना कशाप्रकारे झोपले होते आणि सत्ता जाताच आता शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहे. विशेष म्हणजे पाऊस गेला, सोगणी झाली असून, शेतात आता पिकांचे धसकट उरली आहे. त्यामुळे शेतं खाली झाल्यावर आणि कापसाच्या पिकांचे नकट्या राहिल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर येत असतील तर धन्य आहे, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. तर विरोधकांची आता एक कार्यशाळा घेण्याची गरज असून, विरोध कधी करायचा याबाबत तरी त्यांना यातून कळेल असेही सत्तार म्हणाले. 


नुकसानभरपाईचं श्रेय घेण्याचा प्रयत्न...


ज्यावेळी आदित्य ठाकरे सत्तेत होते त्यावेळी त्यांना कळले नाही कधी आणि कुठे जावेत. त्यामुळे पप्पू टू म्हणण्याचा अर्थच हे आहे की, त्यांनी व्यंगचित्रमध्ये दिसत असल्यासारखी परिस्थिती केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर नक्कीच जावे, मात्र शेतात काहीच नसल्यावर जाऊन काय फायदा होणार आहे. त्यांना आता माहित आहे की, सर्व पंचनामे झाले असून, 24 लाख हेक्टरचे पैसे देण्याची कबुली तत्त्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईचं श्रेय घेण्यासाठी त्यांना जाग आली असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहे. 


Aurangabad: 'सत्तार सरड्यासारखा, भुमरे चिल्लर'; आम्हीच ओरिजीनल असल्याचं म्हणत खैरेंची टीका