Agricultural Compensation: एकीकडे राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असतानाच,दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांनाही बाप्पा पावला आहे. कारण शिंदे सरकारने राज्यातील सुमारे 19 लाख शेतकऱ्यांना 3 हजार 501 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ज्यात मराठवाडा विभागाला 1 हजार 8 कोटींची भरपाई मिळणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत नुकसानभरपाईचे वाटप केले जाणार असल्याची माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती मदत...
जिल्हा | मदत | बाधित क्षेत्र |
जालना | 3 कोटी 71,84,000 | 2,311.79 |
परभणी | 1 कोटी 60,34,000 | 1,179 |
हिंगोली | 157 कोटी 4,52,000 | 1,13,620 |
नांदेड | 717 कोटी 88,92,000 | 5,27,491 |
लातूर | 37 कोटी 30,83 | 27.425 |
उस्मानाबाद | 90 कोटी 74,36,000 | 66,723 |
एकूण |
दोन दिवसांत मदत मिळणार: कृषिमंत्री
नुकसानभरपाईची घोषणा करतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकरी आसमानी संकटात सापडला होता. त्याच्या मदतीसाठी नुकसानभरपाईचा जीआर काढण्यात आला आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहे.