Aurangabad Crime News: पुण्यात कुत्र्यापाठोपाठ वासराशी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच असाच काही प्रकार औरंगाबादमध्ये सुद्धा समोर आला आहे. पाळीव श्वानावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला. पेट लव्हर्स असोसिएशनच्या पुढाकाराने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पराग पावटेकर (रा. अंगुरीबाग, मोती कारंजा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड बायपासवरील क्लाऊड नाईन या हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी हॉटेलचालक प्रताप सोनी यांच्यासोबत काही तरुणांनी वाद घालत, भांडण केले होते. वाद एवढ्या विकोपाला गेला त्यांच्यात हाणामारी झाली होती. दरम्यान वाद घालणाऱ्या तरुणांपैकी एकाचा मोबाईल हॉटेलमध्ये राहायला होता. दुसऱ्या दिवशी हॉटेल चालकाने त्या मोबाईलमधील फोटो गॅलरी उघडून पाहिली असता त्यांना धक्काच बसला. कारण त्यात एक तरुण श्वानावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ त्यांना दिसला.
मोबाईलमधील व्हिडिओ पाहिल्यावर हॉटेलचालक प्रतीक किरीट सोनी यांनी मोबाईलधारक तरुणाचा शोध घेतला. तेव्हा त्याने हा व्हिडिओ पराग पावटेकर याचा असल्याचे सांगितले. तर त्याचा मित्र यशराज रामटेके याच्या पाळीव कुत्र्यासोबत पराग पावटेकर याने हे कृत्य केल्याचे देखील यावेळी समोर आले. त्यामुळे हॉटेलचालक प्रतीक किरीट सोनी यांनी तो व्हिडिओ आपल्या मोबाईल घेऊन मोबाईल परत देऊन टाकला.
अखेर गुन्हा दाखल...
पाळीव श्वानावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ पाहून हॉटेलचालक प्रताप सोनी यांना धक्काच बसला होता. त्यामुळे सोनी यांनी प्राणिमित्र म्हणून श्वानावरील अत्याचाराची तक्रार पेट लव्हर्स असोसिएशनकडे दिली. व्हिडिओ पाहिल्यावर असोसिएशनच्या अध्यक्षा बेरील सांचीस व पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची भेट घेऊन, घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अखेर सातारा पोलिसात पराग पावटेकरविरोधात भादंवि कलम 377 (अनैसर्गिक कृत्य करणे), प्राण्यांचे छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राण्यांवर अत्याचार करणे गुन्हा...
कोणत्याही प्राण्यांवर अत्याचार करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असताना देखील अशा अनेक घटना रोज कुठे ना कुठे घडत असल्याचे सतत पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कुठेही अशाप्रकारे प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर त्याची माहिती पोलिसांना किंवा पेट लव्हर्स असोसिएशनकडे करण्याचे आवाहन सोसिएशनच्या अध्यक्षा बेरील सांचीस यांनी केले आहे.