Ketaki Chitale Live Update : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale)अडचणीत वाढ झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 May 2022 02:46 PM

पार्श्वभूमी

Ketaki Chitale Issue :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीवर आतापर्यंत नऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...More

संत तुकाराम महाराज संस्थानकडून केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

संत तुकाराम महाराज संस्थानकडून केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 


केतकी चितळेच्या अडचणीत वाढ. आता संत तुकाराम महाराज संस्थानने देखील केतकीवर गुन्हा दाखल करायची मागणी केलीये. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे विश्वस्तांनी तसा तक्रारी अर्ज दिलाय. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात जी कविता फेसबुकवर पोस्ट केली, त्यात 'तुका म्हणे' असा उल्लेख करण्यात आलाय. 'तुका म्हणे' या शब्दांचा उल्लेख करून, वादग्रस्त आणी विटंबनात्मक लेखन करण्यात आलंय. 'तुका म्हणे' ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून, महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. तेंव्हा कोणत्याच संताचा वापर अशा पद्धतीने केला गेला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळं पुढं अशी कोणीच चुक करू नये म्हणून केतकी चितळेवर गुन्हा दाखल करावा. असा तक्रारी अर्ज संत तुकाराम महाराज संस्थानने करत कायदेशीर कारवाईची मागणी केलीये.