यवतमाळ : फुलसावंगी येथील एका ध्येयवेड्या रँचोने मनात असलेले ध्येय पूर्ण करता करता त्यातच त्याचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला.शेख इस्माईल उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर शेख इब्राहिम वय 28 वर्षे या नावाने परिसरात प्रसिद्ध असलेल्या ध्येयवेड्या तरुणाने मागील तीन चार वर्षापासून तो सिंगल सिट हेलिकॉप्टर तयार करण्याचे ध्येय उराशी बाळगून आपले कुटुंब चालवण्यासाठी दिवस भर स्वतःच्या वेल्डिंगच्या दुकानात कुटुंब चालवण्यासाठी काम करायचा व रात्रीला आपले जे ध्येय आहे.
ते पूर्ण करण्यासाठी तो हेलिकॉप्टर तयार करण्याचे काम करत होता. त्याचे शिक्षण हे फक्त नववी पर्यंत झालेले होते. आपल्या कल्पना शक्ती व अजोड कलेच्या भरोशावर तो हेलिकॉप्टर तयार करण्याचे धाडस त्याने केले होतो. मुन्नाने हेलिकॉप्टरमध्ये मारुती 800 चे इंजिन वापरुन सिंगल सिट हेलिकॉप्टर बनवून पूर्णत्वासही नेले होते.
हेलिकॉप्टर बनविण्यासाठी त्याला साधारणपणे दोन लाख रुपयांचा खर्च आला होता. विजेत्या 15 ऑगस्ट रोजी प्रात्यक्षिक घेऊन "पेटेंट" करायची त्याची तयारी झाली होती. परंतु नियतीला हे मंजुर नव्हते काल रात्री दोनच्या सुमारास एकदा त्याने बनवलेल्या हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक घेण्याचे त्याने ठरवले आणि प्रात्यक्षिक घेत असतांनाच हेलिकॉप्टरच्या मागच्या पंख्यात बिघाड येऊन तो पंखा तुटुन वरच्या फिरणाऱ्या मोठ्या फ्लॅन आदळला आणि येथेच सर्व खेळ बिघाड होऊन नियतीने घात केला. मागचा पंखा मोठ्या पात्यावर आदळल्याने ते पाते तुटुन त्याचा समतोल बिघडून ते मोठे पाते कॅबिनमध्ये बसलेल्या शेख इस्माईल उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर याच्या डोक्यावर जोरदार आदळले. यामध्ये त्याच्या डोक्याला मोठी इजा झाल्याने त्याला उपचारासाठी पुसदला असतांनाच दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे आपले ध्येय पूर्ण करता करताच ध्येय वेड्या शेख इस्माईलचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात वडिल, आई, एक भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.