मुंबई : राष्ट्रवादीने (NCP) सरकारसोबत निर्णय घेतला आहे . वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील नऊ वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी करत आहे. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवून आम्ही  निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री  झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


सत्तेत राष्ट्रवादी पक्ष म्हणून सहभागी : अजित पवार 


अजित पवार म्हणाले, देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे, मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. कोरोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती.  केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेणार आहे. हा निर्णय आमदारांना हा निर्णय मान्य आहे. आम्ही सत्तेत राष्ट्रवादी पक्ष म्हणून सहभागी होत असून  पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार  आहे. 


एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस संपलेले आहेत : अजित पवार 


राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात आम्ही भाजपबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहोत. एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस संपलेले आहेत. आमच्याकडे सर्व आकडा आहे. पार्टी आमच्याबरोबर आहे .वरिष्ठांना देखील आम्ही सांगितलंय. मागील 24 वर्षात अनेक निर्णय घेतले आहेत, डोक्यावरुन अनेक पाणी वाहून गेलं आहे. नवं नेतृत्व देखील पुढे आलेलं आहे  सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्याचं काम करु. 






खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुका सोबत लढवणार : अजित पवार 


 निर्णय घेताना राज्याचं आणि देशाचं हित लक्षात घेतलं आहे. मी स्पष्ट बोललो सर्वांचा पाठिंबा आहे. खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुका सोबत लढवणार आहे.  स्थानिक निवडणुकाबाबत तेथील स्थानिक लोकं निर्णय घेतील त्याबाबत मी आत्ता बोलणार नाही.   


राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालाय..वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्याची जी राजकीय स्थिती होती तेच चित्र आज पुन्हा एकदा पहायला मिळतंय. अजित पवारांसह काही आमदारांनी भाजपसोबत सत्तास्थापनेचा मार्ग निवडलाय. यानिमित्ताने जुन्या शपथविधीच्या आठवणी ताज्या झाल्यात... नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज चार वर्षांनी 2 जुलै 2023 ला पुन्हा हेच चित्र पहायला मिळतंय


हे ही वाचा :


उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा