NCP Janjagar Yatra : आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जनजागर यात्रेला (NCP Mahila Janjagar Yatra) सुरुवात होणार आहे. ही यात्रा  राज्यभर निघणार आहे. भाजप सरकारच्या (Bjp Govt) धोरणांविरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन आवाज उठवला जाणार आहे. आज ( 4 जानेवारी 2023) पुण्यात (Pune) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) हे यात्रेला झेंडा दाखवणार आहेत. 


प्रत्येक तालुक्यात जनजागर यात्रा जाणार


मोदी सरकराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली आहे. सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आजपासून राज्यभर जनजागर यात्रा काढणार आहे. गेल्या आठ वर्षापासून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेवर करत असलेल्या महागाई- बेरोजगारीच्या अन्याय अत्याचाराविरोधात ही यात्रा काढण्यात येत असल्याचं राष्ट्रावादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं.  संपूर्ण राज्यभरात महिला भगिनींकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर जागर यात्रा करण्यात येणार आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर आणि तालुक्यात जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


या मुद्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक 


गेल्या आठ वर्षात गॅस सिलेंडर, जीवनावश्यक वस्तू , पेट्रोल, डिझेल सीएनजी यांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वसामान्य लोकांच्या खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांवर आलेली कुऱ्हाड, सुशिक्षित तरुणांवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, महाराष्ट्रातून मोठमोठ्या कंपन्या इतर राज्यांमध्ये पळवण्याचे सुरू असलेले उद्योग तसेच राज्यातील लोकशाहीला घातक असणाऱ्या घडामोडी घडत राज्य सरकार पाडण्यासाठी केले गेलेली कट कारस्थाने, महिला भगिनींवर होणारे अत्याचार अशा विविध मुद्द्यांवर ही जनजागर यात्रा काढण्यात येणार आहे. 


आज दुपारी चार वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत शुभारंभ


जनतेला जाग करण्याचं काम ही जन-जागर यात्रा करणार आहे. पुणे शहरातील हॉटेल सेंट्रल पार्क इथं  खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या जनजागर यात्रेचा शुभारंभ आज दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण असे करत  महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये ही जनजागृती यात्रा जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजीया खान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, वैशालीताई नागवडे यांसह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


महत्त्वाच्या बातम्या:


Sharad Pawar : भारतात फळांचे सर्वात जास्त उत्पादन, जगाच्या बाजारात भारताचा शिक्का : शरद पवार