Nandurbar Accident : अपघातांचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील चरणमाळ घाटात (Charanmal Ghat) प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस (Luxury Bus Accident) पलटली.  


दोघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक


नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात झालेल्या अपघतात दोघांचा मृत्यू झाला आहे. बसचालकासह एका 18 महिन्याचा चिमुरडीचा अपघतात मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे अपघातातील 3 गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात जखमी असलेल्या पैकी बहुतांश जखमी मजूर असून ते रोजगाराच्या शोधात गुजरात मधील जुनागड येथे जात असल्याची माहिती समोर येतेय.


 बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते


नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने महाराष्ट्रातून गुजरात कडे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला असून या बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. चरणमाळ घाटात मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचत कार्यात अडचणी येत आहेत.


मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचण
चरणमाळ घाटात भीषण अपघात घडला असून प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस पलटली. दरम्यान, बस खाली अडकलेल्या चालकाला मध्यरात्रीपर्यंत बाहेर काढण्याचे काम केले जात होते, जखमींना नवापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अनेक अडचणी आल्या. 


बसमधील प्रवाशांचा एकच आक्रोश
नवापूर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत कार्य केले जात आहे. अपघातग्रस्त बसचा चालक गाडीखाली दाबला गेला असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर जखमी प्रवाशांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवाशांनी आक्रोश सुरू केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.  


छोट्या-मोठ्या अपघातांच्या मालिका सुरूच


चरणमाळ घाटातील छोट्या मोठ्या अपघातांच्या मालिका सुरूच आहेत. प्रशासनाच्या वतीने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी वेळोवेळी केली असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होताना दिसत आहे. तसेच प्रशासन आणखी किती जणांचा बळी जाण्याची वाट पाहणार? असा सवाल स्थानिक आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


JEE Advanced Result 2022 : JEE-Advance चा निकाल आज जाहीर होणार; 'असा' डाउनलोड करा निकाल, जाणून घ्या


Kartarpur Corridor : तब्बल 75 वर्षांनंतर भेटले भाऊ-बहीण, दोघांना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ