नांदेड : हरियाणात अटक करण्यात आलेल्या चार अतिरेक्यांचा म्होरक्या हरविंदरसिंग रिंदा याच्या नांदेडमधील साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरू करण्यात आलंय. नांदेड पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशानुसार संशयितांच्या घरी झडतीची मोहीम राबवली जातेय. काल हरियाणातील कर्नाल चेक पोस्टवर चार अतिरेक्यांना अटक केली होती. यावेळी चौघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी जप्त करण्यात आला होता.. नांदेड आणि आदीलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.
दरम्यान नांदेड शहरात मागील काही वर्षापासून हरविंदरसिंग रिंदा या कुख्यात गुन्हेगाराची मोठ्या प्रमाणात दहशत असून त्याने यापूर्वी अनेक व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमक्या देऊन खंडणी वसूल केलीय. नांदेड पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेला आणि महाराष्ट्र, नांदेड,पंजाब या राज्यात तब्बल 28 गंभीर गुन्हे दाखल असणारा हरविंदरसिंग रिंदा नांदेड येथे दोघांना गोळ्या घालून खून करत तो नांदेडहून पसार झाला आहे.तो सध्या पाकिस्तानमध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे. दरम्यान त्याने नांदेड येथे मोठी दहशतवादी कारवाई करण्यासाठी पाकिस्तानमध्ये बसून ड्रोनच्या साह्याने फिरोजपूर येथे हत्यारे पाठवून आपल्या चार साथीदारांच्या मदतीने अनुचित प्रकार घडविण्यासाठी त्याची यंत्रणा सज्ज झाली होती. परंतु गस्तीवर असलेल्या हरियाणा पोलिसांच्या पथकाने बस्ताडा टोल नाका परिसरात एका इनोव्हा गाडीला ताब्यात घेऊन गाडीतील गुप्ती,अमनदीप, परमिंदर आणि भूमिंदर या 20 ते 25 वयोगटातील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसेच त्यांच्या कडील ईनोवा गाडीची रोबोटच्या साह्याने तपासणी करत एक देशी पिस्तूल, 31 जिवंत काडतूस, तीन अडीच किलो वजनाच्या लोखंडी कंटेनर असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. हे चारही जण नांदेडमध्ये मोठी कारवाई करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये दबा धरुन बसलेला हरविंदरसिंग रिंदा याच्या सांगण्यावरून नांदेडकडे येत असल्याचे पोलिस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
एकंदरीत या प्रकरणावरून नांदेडचे दहशतवादी कनेक्शन उघड झाले आहे.या घटनेमुळे नांदेड पोलीस अलर्ट झाले आहेत तर दुसरीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेची माहिती IG निसार तांबोळी व पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे हे हरियाणा पोलिसांकडून घेत असून नांदेडचे पोलीस पथक पाठवून सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.दरम्यान यापूर्वीचे कन्साईनमेंट कुठे आले, कुणासाठी आले, कशासाठी पाठवले याचा शोध नांदेड पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली आहे.
दरम्यान या घटनेनंतर हरियाणात पकडलेल्या चार अतिरेक्यांचा मोहरक्या असणाऱ्या कुख्यात गुंड, रिंदाच्या नांदेडातील साथीदारांच्या घरी पोलिसांचे धाड सत्र सुरू केलेय.काल हरियाणातील करनाल चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणात स्फोटके घेऊन नांदेड मध्ये येत असलेल्या चार अतिरेक्यांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली होती.सदर अतिरेक्यांकडून या घातक स्फोटकांच्या आधारे नांदेड व तेलंगणात आदीलाबाद येथे मोठा घातपात करण्याचा कट असल्याचे पोलीस तपासात उघड झालंय.दरम्यान या चार जणांचा मोहरक्या कुख्यात गुंड हरविंदरसिंग रिंदा असल्याचे स्पष्ट झाल्याने यात नादेंडचे नाव समोर आले.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेड पोलिस दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी गांभीर्याने पोलिस अधीक्षकांना सुचना देत हरविंदर सिंघ उर्फ रिंदा याचे नांदेड येथील टोळीतील साथीदार तथा सदस्य असणाऱ्या गुन्हेगारांच्या घरांची झडती घेऊन तपासणी करण्याचे धाड सत्र सुरू केले आहे. या मोहिमेत एस.आय .टी.पथकातील पोलिस अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, डी बी पथक, स्थानिक गुन्हे शाखा असे तिन पोलिस पथकां मार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्वतः पोलिस अधीक्षकांसह पोलिस कर्मचारी हे रात्री व दिवसा अचानक गुन्हेगांराचे व रिंधा यांच्या साथीदारांचे घरी झडत्या घेऊन तपासणी करीत आहेत.