Maharashtra Nanded Farmer Electric Bikes : अनेकदा म्हटलं जातं, की गरज ही शोधाची जननी आहे. किंबहुना याचा प्रत्यय देणारी उदाहरणंही आपल्या डोळ्यांसमोर आहेत. यातच आता आणखी एका उदाहरणाची भर पडली आहे. पेट्रोल महाग झाल्याने वाहन चालवणं परवडत नसल्यामुळे नांदेडमधील एका शेतकऱ्याने जुन्या दुचाकीपासून इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. या गाडीची नांदेड आणि परिसरता चर्चा सुरु आहे. अनेक कंपन्यांनी महागड्या इलेक्ट्रिक स्कुटी बनवल्या आहेत परंतु कमी पैसे खर्च करून सुनिल घरत यांनी बनवली इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे .
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर उमाजीराव कल्याणकर याने इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. ज्ञानेश्वरने दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने चार्जिंगवर चालणारी मोटारसायकल तयार केली आहे. इंधन दरवाढीच्या कटकटीला कायमचा रामराम करण्यासाठी या अवलियाने चक्क इलेक्ट्रॉनिक बाईक बनवलीय. पेट्रोलच्या किमतीत सतत होणार्या दरवाढीचा फटका प्रत्येकाला बसत आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसून त्याची आर्थिक घडी विस्कटलीय.
ज्ञानेश्वर हा पाच एकर जमीन असणारा अल्पभूधारक शेतकरी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची आवड व आस असणारा ज्ञानेश्वर हा फक्त दहावी शिकलेला आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देत व लहरी हवामानामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान पाहून तो फुल शेतीकडे वळाला. ज्ञानेश्वर शेतातील फुले सकाळी मोटारसायकलवर नांदेडच्या बाजार पेठेत घेऊन जातो. दरम्यान नियमित दळणवळण करण्यासाठी त्याला 150 रुपये खर्च येत होता. त्यामुळे फुल शेतीतून दळणवळणाचा खर्च निघत नसल्याने त्रस्त झाला होता. ज्ञानेश्वरने पेट्रोलवर होणार्या खर्चावर उपाय आपल्या ग्रामीण जुगाडातून इलेक्ट्रॉनिक बाईकची निर्मिती केलीय. जुन्या मोटारसायकलवर सतत दोन वर्षे प्रयोग केल्यानंतर ज्ञानेश्वरला यश मिळाले आहे.
केवळ अर्ध्या तासात चार्जिंगवर चालणारी व तीन युनिट मध्ये चार्ज होणाऱ्या या मोटारसायकलला फक्त 14 रुपयांची वीज लागते. तर एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 100 कि.मी अंतर पार करते, हेच अंतर पट्रोलने पार केल्यास 250 रु खर्च येतो. सदरील मोटर सायकल बनवण्यासाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. तर याच मोटारसाकलला 2000 व्हॅटची बॅटरी बसवल्यास फसलेले ट्रॅक्टर सुध्दा काढता येईल असा विश्वासही ज्ञानेश्वरने बोलून दाखवलाय. त्यामुळे पुढील काळात या चार्जिंग मोटारसायकलवर आणखी संशोधन करण्याचा ज्ञानेश्वरचा माणस आहे.