Maharashtra Mumbai rains LIVE UPDATES : राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, पाहा प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स

Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Aug 2021 11:10 AM
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू

पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू,  सफाळेमध्ये भर पावसात छत्र्या घेऊन महिला लसीकरणासाठी 

मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाची रिपरिप

मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सतत सुरु आहे. अद्याप पाणी साचल्याचं कुठेही समोर आलेलं नाही.  अंधेरी, बांद्रा, दादर आणि दक्षिण मुंबईत सततधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, पनवेल परिसरात देखील सततधार पाऊस सुरु आहे.  

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय

मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईत तर काल रात्रीपासूनचं काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार मागच्या 24 तासांत मुंबईत 40-70 मिमीच्या आसपास पाऊस कोसळला आहे तर ठाणे आणि कल्याणमध्ये 80 मिमीपेक्षा सुद्धा जास्त पाऊस कोसळला आहे. आज दिवसभर मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार कायम राहणार आहे. पुढील 2 आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस असणार आहे. कोकणात जरी पावसाचा जोर कमी असला तरी राज्यभरत पडत असलेल्या या पावसाचा पिकांना फायदा होणार आहे.

राज्यातील काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा

Maharashtra Rain :  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसानं कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकरी राजा काहीसा सुखावला आहे. राज्यातील काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain : : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसानं कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकरी राजा काहीसा सुखावला आहे. राज्यातील काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईत तर काल रात्रीपासूनचं काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार मागच्या 24 तासांत मुंबईत 40-70 मिमीच्या आसपास पाऊस कोसळला आहे तर ठाणे आणि कल्याणमध्ये 80 मिमीपेक्षा सुद्धा जास्त पाऊस कोसळला आहे. आज दिवसभर मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार कायम राहणार आहे. पुढील 2 आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस असणार आहे. कोकणात जरी पावसाचा जोर कमी असला तरी राज्यभरत पडत असलेल्या या पावसाचा पिकांना फायदा होणार आहे.

मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सतत सुरु आहे. अद्याप पाणी साचल्याचं कुठेही समोर आलेलं नाही.  अंधेरी, बांद्रा, दादर आणि दक्षिण मुंबईत सततधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, पनवेल परिसरात देखील सततधार पाऊस सुरु आहे.  

पुण्यात सकाळपासून हलका पाऊस सुरु आहे.

पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. वसई विरारमध्ये रात्रभर पावसाची संततधार होती. सलग तिसऱ्या दिवशी ही वसई विरार शहरात पावसाची रिप रिप सुरु आहे. आज ढगाळ वातावरण आहे. अजून तरी शहरातील सखल भागात पाणी साचलेलं नाही.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण, पाऊस नाही.

नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे.

नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे 

रायगड जिल्ह्यात अनेक भागात ढगाळ वातावरण, रात्रीच्या सुमारास काही भागात पावसाची हजेरी, सकाळपासून पाऊस नाही.

धुळे जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाने विश्रांती घेतली असून ढगाळ वातावरण कायम आहे

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून संततधार सुरू असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे , जिल्ह्यातील मेहकर , लोणार , संग्रामपूर ,शेगाव , खामगाव तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक सखल भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यातील अनेक प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 64 टक्के पाऊस झाला असून सर्वात जास्त मेहकर तालुक्यात सरासरीच्या 110 टक्के पाऊस बरसला आहे.

चंद्रपूर : वातावरण ढगाळ आहे पण पाऊस नाही

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.