Mega Block :  मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर शनिवार ( 21 मे) आणि रविवार (22 मे)  या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरचा मेगाब्लॉक रविवारी असेल. मध्य रेल्वेवर 22  मे रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 


मुख्य मार्गावर रात्रीचा मेगा ब्लॉक


 हार्बर मार्गावर रविवार 22 मे रोजी मेगा ब्लॉक


 21 मे रोजी रात्री 11.30  ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत भायखळा- माटुंगा अप जलद मार्गावर आणि सकाळी 00.40 ते 5.40 पर्यंत भायखळा- माटुंगा दरम्यान डाऊन जलद मार्गावर.


सकाळी 5.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन जलद सेवा भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन  आपल्या वेळापत्रकानुसार थांब्यांवर थांबेल आणि 10 मिनिटे उशिराने पोहोचेल.


21 मे रोजी रात्री 10.58  ते रात्री 11.15 पर्यंत ठाण्याहून सुटणारी अप जलद सेवा माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवली जाईल, या गाड्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि गंतव्यस्थानावर 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.


  पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत  (ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित राहणार नाहीत)


पनवेल येथून सकाळी 10.30 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


पनवेल येथून सकाळी 11.02  ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून  ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या  ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत खारकोपर आणि बेलापूर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.


 ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.


 ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष उपनगरीय गाड्या धावतील.


या विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी हे विशेष ब्लॉक आवश्यक आहेत. त्यामुळे  या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनानं दिलगीरीही व्यक्त केली आहे.