पुणे : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल आज (13 जून) रोजी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. 91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51 आहे. बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागातील 96.18 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका 24 जून रोजी दुपारी 3 वाजता शाळेत मिळेल, असं बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी सांगितलं. Maharastra SSC Class 10 Results कुठे पाहाल निकाल?http://mahresult.nic.in/या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
कसा पाहाल निकाल? दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.