मुंबई : ज्या बुडीत जिल्हा बँका नवीन पीककर्ज देण्यास असमर्थ ठरतील त्या जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज देण्यास परवानगी मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने 16 जिल्हे निश्चित केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि बँक प्रतिनिधींच्या बैठकीत यासंबंधीत निर्णय होणार आहे. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. 'त्या' 16 बँका कोणत्या?
  1. नाशिक
  2. धुळे
  3. नंदूरबार
  4. जळगाव
  5. सोलापूर
  6. परभणी
  7. हिंगोली
  8. जालना
  9. बीड
  10. उस्मानाबाद
  11. नांदेड
  12. यवतमाळ
  13. अमरावती
  14. बुलडाणा
  15. नागपूर
  16. वर्धा
सध्या युद्धपातळीवर बैठका सुरु आहेत, त्या यासाठीच सुरु आहेत. त्यावर काम चालू आहे. पाच एकरपर्यंतचे शेतकरी आहेत, त्यांना कर्जमाफी झाली, असं समजून लगेच कर्ज देण्यात येईल. याबाबतीतला निर्णय दोन दिवसात बँकांना कळवण्यात येईल, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलं होतं. मुंबईत काल झालेल्या बैठकीत सुकाणू समिती आणि सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य करण्यात आली आहे.