Maharashtra Monsoon Session : राज्य सरकारचे सुरु असलेलं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) हे शेवटचं असणार आहे. त्यामुळे विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व सदस्यांना विधिमंडळाच्या प्रांगणात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, 12 जुलै रोजी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून हॉटेल पॉलिटिक्स जोरात सुरू आहे. त्यामुळे आमदारांची शाही बडदास्त पंचतारांकित हॉटेलवर ठेवण्यात आल्याने या कार्यक्रमाला ते येतील की नाही, याबाबत साशंकता आहे.


विधिमंडळ सचिवालयाकडून आमदारांसाठी जय्यत तयारी


दरम्यान, विधिमंडळ सचिवालयाकडून आमदारांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या आमदारांच्या स्नेहभोजनासाठी आलिशान असा शाही मंडप उभारण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूने विधिमंडळ सचिवालयाकडून आमदारांच्या स्नेहभोजनासाठी जय्यत तयारी केली जात असतानाच त्या कार्यक्रमाला मात्र येतील की नाही? याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे, विधानसभेचे पावसाळी अधिवेशन हे कमालीचे वादळी ठरलं आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकरी मदत, सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या घोषणा आणि त्यावरून आलेल्या खोच प्रतिक्रिया आदी मुद्यांवरून अधिवेशन चांगलेच चर्चेत राहिलं आहे. 


ठाकरे गटातील आमदारांचे स्नेहभोजन


दुसरीकडे, विधानपरिषद निवडणूक तोंडावर असल्याने ठाकरे गटाकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज या आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं आहे. या स्नेहभोजनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मुंबई पदवीधर आमदार अनिल परब निवडून आल्याने त्यांनी हे स्नेहभजन आयोजित केल्याची माहिती आहे. 12 जुलै रोजी विधान परिषदेसाठी मतदान होत असल्याने या सर्व आमदारांना हॉटेलमध्येच ठेवले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आजपासून ठाकरे गटाच्या आमदारांचा मुक्काम 12 जुलैपर्यंत हॉटेल आयटीसी ग्रँडमध्येच असणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या