मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस आणि भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांमुळे मुंबईत अशा जैन आणि गुजराती सहकारी गृहनिर्माण संस्था तयार झाल्या. त्यात मराठी माणसाला घर नाकारलं जात असेल तर खपवून घेणार नाही असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. तसेच मुलुंडमधील मराठी महिलेला जागा नाकारल्यानंतर या सगळ्या संदर्भात कडक कायदा करा अशी मागणी करणारे पत्र देखील मनसेने (MNS) मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याची माहिती संदिप देशपांडे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात असं पुन्हा घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला
काय आहे मागणी?
संदीप देशपांडे म्हणाले, जे लोक भाषेच्या ,धर्माच्या, जातीच्या आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत भेदभाव करून जागा नाकरत असतील तर त्यावर कडक कारवाई व्हायला हवी. खरंतर या जैन गुजराती सोसायटी राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजप यांच्यामुळे तयार झाल्या आहेत. जेणेकरून त्यांना एकत्रित मत या सोसायटी मधून मिळतील. आता ज्याप्रकारे मराठी माणसाला तिथे जागा किंवा घर नाकारले जाते हे चुकीच आहे. 2016 मध्ये मुंबई महापालिकेने जे लोक भाषेच्या धर्माच्या जातीच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत भेदभाव करतात त्यांच्या विरोधात एक प्रस्ताव मंजूर केला होता. यामध्ये अशा ठिकाणच्या इमारतीला ओसी रद्द करण्यात यावा. आता हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर करावे. धर्म, जात, खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे अशा प्रकारचे प्रकार कुठल्या सोसायटीमध्ये घडले तर त्या ठिकाणी त्या सोसायटीचा डी रजिस्ट्रेशन करून तिथे प्रशासक नेमावा. तसेच विकासकांना सुद्धा भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये.
पंकजा मुंडे यांनी स्वतःला एकटं समजू नये
मुंबईमध्ये जागा नाकारल्याचा अनुभव पंकजा मुंडेंना देखील आला आहे, असा दावा त्यांनी स्वतः केला आहे. मुंबईच्या मुलुंड परिसरात एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. त्या महिलेचा व्हिडीओ पाहिल्यावर पंकजा मुंडेंनी आपल्या भावनांना वाट करून दिली.यावर संदीर देशपांडे म्हणाले. पंकजा मुंडे यांना मराठी म्हणून घर नाकारलं हे त्यांनी खूप उशिरा सांगितलं त्यांनी त्यावेळी सांगितलं असतं तर आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत असतो. आता देखील पंकजा मुंडे यांनी स्वतःला एकटं समजू नये. पक्ष बाजूला ठेवून या सगळ्या प्रकरणात आम्ही साथ देऊ आणि त्यांना जिथे हवे तिथे घर मिळवून देऊ
हे ही वाचा:
तृप्ती देवरुखकर शर्मिला ठाकरेंच्या भेटीला, राज ठाकरेही म्हणाले, वळ उठणारच; मनसेने प्रकरण हाती घेतलं!