Maharashtra Politics : शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात जाणार हे जवळपास निश्चित आहे. पण, आज ते याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करु शकतात. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर यांचा प्रवेश होणार अशी चर्चा आहे. मात्र याच चर्चाना आज पूर्णविराम मिळू शकतो. कारण, जालन्यात दाखल झालेले अर्जुन खोतकर यांनी आपण आज पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांची ही पत्रकार परिषद होणार आहे. ज्यात ते आपला अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले होते की, माझ्यावर काही संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो. संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणारच. त्यामुळे अर्जुन खोतकर लवकरच शिंदे गटात सामील होण्याचे संकेत मिळाले होते.


अर्जुन खोतकर आज भूमिका मांडणार?


जालना येथील शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यावरच बोलताना खोतकर म्हणाले आहेत की, कार्यकर्ते आणि आणि कुटुंबाशी बोलून अंतिम निर्णय घेणार आहे. खोतकर हे गेले काही दिवस दिल्लीत होते. आज ते जालन्यात परतले आहेत. जालन्यात परतल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते काल म्हणाले. 


"हीच माझ्यासाठी अत्यंत दुःख देणारी बाब"


खोतकर म्हणाले की, माझ्यासारख्या चाळीस वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती अशा पद्धतीने बोलण्याची पाळी येते, हीच माझ्यासाठी अत्यंत दुःख देणारी बाब आहे. ही माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी बाब आहे. गेली पाच दिवस मी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा आहे. काय होणार, काय नाही असे अनेक प्रश्न मला या ठिकठिकाणी ठिकाणी विचारले जात आहेत. या सर्व प्रश्नाचे उत्तर मी एकच दिले असून मी माझ्या गावात जाऊन आपल्याशी, परिवाराशी बोलून हा निर्णय करेल.


आज सकाळी पत्रकार परिषद, शिवसेनेत राहणार की शिंदे गटात सामील होणार?


दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्यापासून अर्जुन खोतकर शिंदे गटात कधी प्रवेश करणार याची चर्चा सुरु होती. यातच ते 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर यांचा प्रवेश होणार अशी चर्चा आहे. आज जालन्यात दाखल झालेले अर्जुन खोतकर यांनी उद्या आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे. आज सकाळी 11 वाजत त्यांची ही पत्रकार परिषद होणार आहे. ज्यात ते आपला अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अशातच खोतकर आता शिवसेनेत राहणार की शिंदे गटात सामील होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.