Mumbai University Exams Postponed :  मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) 30 जानेवारी रोजी होणाऱ्या एकूण 30 परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचे मतदान 30 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे रोजी मुंबई विद्यापीठाने नियोजित केलेल्या या परीक्षा आता 7 फेब्रुवारी 2023 रोजी होतील, असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. 


 


7 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा घेण्यात येणार, विद्यापीठाकडून जाहीर


मुंबई विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमाच्या एकूण 30 परीक्षा या 30 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार होत्या. ज्यामध्ये विधि (Law), अभियांत्रिकी (Engineering), विज्ञान शाखेचे (M.Sc) चौथे सत्र, वाणिज्य (Commerce) आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश होता. तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी (MA- Sem II, Sem IV) सत्र तिसरे आणि चौथे, विधि अभ्यासक्रमाचे (Law : LLM : Sem III, BBA -LLB Sem III) सत्र तिसरे, अभियांत्रिकी (Engineering : SE Sem III) अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या (Science : M.Sc Sem IV, M.Sc Part II) एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य (Commerce: M.Com Part II) शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा 30 जानेवारी रोजी नियोजित होत्या. मात्र आता त्या 7 फेब्रुवारी 2023 पासून घेण्यात येणार आहेत असे विद्यापीठाने जाहीर केले आहे.


 


एकूण 30 परीक्षा पुढे ढकलल्या


1. Humanities : MA Sem III, MA Sem II, Sem IV 
2. Law : LLM : Sem III, BBA -LLB Sem III
3. Engineering : SE Sem III
4. Science : M.Sc Sem IV, M.Sc Part II.
5. Commerce: M.Com Part II


 


निवडणूक आणि मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा एकाच दिवशी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून येत्या 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आणि मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


 


विद्यार्थ्यांनी बदलेल्या तारखांची नोंद घ्यावी
विद्यार्थ्यांनी बदलेल्या तारखांची नोंद घ्यावी असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. तर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Headlines 24 January : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  दिल्ली दौऱ्यावर, केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक; जाणून घ्या आज दिवसभरातील घडामोडी