संजय पांडे यांची ईडी चौकशी


Sanjay Pande : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे.  संजय पांडे यांना ईडीने आज चौकशीसाठी बोलवले आहे. 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.


'या' प्रकणात संजय पांडे यांच्यावर ईडी कारवाई करु शकते,


संजय पांडे ज्यावेळी DG होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच NSE सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात संजय पांडे यांच्यावर ईडी कारवाई करु शकते, असे म्हटले जातेय.  


संजय पांडे यांनी 2001 मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती, त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलिस सेवेत आले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केले. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते परंतु त्या कालावधीत त्याने कोणतेही उल्लंघन केले नाही आणि अशा प्रकारे CBI ने फर्मची चौकशी सुरू केली आणि आता ED देखील फर्मची चौकशी करत आहे.


संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द




 










- 1986 च्या बॅचमधील IPS अधिकारी


- सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात


- मग मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी बनले


- 1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना


- 1992-93 दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात आहे 
 
- मुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशन मिळून झोन 8 बनवलं, याचे पहिले डीसीपी संजय पांडे बनले. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला


- 1993 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला.


- 1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला
 
- 1997 इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला.


- 1998 मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं.


- 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते


- 2001 मध्ये  राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं.


- 2005 मध्ये सेवेत पुन्हा आले आणि कारकीर्दीतील 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण ती पूर्ण झाली नाही.


- कोर्टातील लढ्यानंतर 2011 मध्ये पुन्हे सेवेत रुजू झाले.


- 2014-15 लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली.


- 2015 मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले आणि याच पदावर राहून महासंचालकही झाले.


- अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं.


- 9 एप्रिल रोजी संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.


- 30 जून 2022 रोजी संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले.