ST Bus : 22 जानेवारीला अयोध्येत (Ayodhya) राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण जगभरातून भाविकांची अयोध्येच्या दिशेने गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. मिळेल त्या वाहनाने भाविक अयोध्या येथे जात असून लाखो भाविक दररोज अयोध्येत दर्शन घेत आहेत. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या लाल परीने भाविकांचा प्रवास व्हावा या उद्देशाने धुळे परिवहन महामंडळाने राज्यातील पहिलीच धुळे ते अयोध्या बस सेवा सुरू केली असून आज पहाटे पाच वाजता ही बस आयोध्याच्या दिशेने रवाना झाली.
परिवहन महामंडळाकडून पहिल्यांदाच उपक्रम
आयोध्या येथे रामललाच्या दर्शनासाठी संपूर्ण जगभरातून भाविक विविध मार्गाने जात आहेत. मात्र धुळे परिवहन महामंडळाने पहिल्यांदाच धुळे ते अयोध्या बस सुरू केली असून आज पहाटे पाच वाजता पहिली बस अयोध्येच्या दिशेने रवाना झाली. या बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वीस तास, सोळाशे किलोमीटरचा प्रवास
तब्बल वीस तास आणि तब्बल सोळाशे किलोमीटरचा प्रवास ही बस करणार असून पहिल्यांदाच निघालेल्या या बसला भाविकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले. चार हजार रुपये इतके भाडे भाविकांकडून परिवहन महामंडळाने आकारले असून विविध सोयी सुविधा बसमध्ये देण्यात आले आहेत या सोबतच दोन चालक आणि परिवहन महामंडळाचे दोन अधिकारी देखील या बस मध्ये असणार आहेत. भाविकांचा मोठा प्रतिसाद धुळे परिवहन महामंडळाला या अयोध्या बसला मिळाला असून चार ते पाच दिवसांचा हा प्रवास असणार आहे.
खान्देशातील प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण
धुळे आगाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येला जाण्यासाठी प्रवाशांना 4 हजार 545 रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे आता खान्देशातील रामभक्तांना धुळ्यातून थेट अयोध्येतील रामलल्लांचं दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे खान्देशातील प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
असा असेल लाल परीचा प्रवास
धुळ्याहून अयोध्येला जाणारी ही बस 10 फेब्रुवारीला पहाटे चार वाजता धुळ्यातून निघाली. 12 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता अयोध्येत पोहचेल. त्यानंतर बारा तारखेला अयोध्यातून वाराणसीला जाईल. वाराणसी येथे प्रयागराज मुक्कामी असेल. त्यानंतर पुन्हा सकाळी धुळ्याकडे बस प्रस्थान करेल. अशी माहिती धुळे परिवहन विभागातर्फे देण्यात आली आहे.
हेही वाचा>>>
Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; दोन जण जखमी