Mumbai Police : सध्या राज्यासह देशातील परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. मुंबई पोलिसांनी चार महिन्यांत एकूण 12,800 सोशल मीडिया पोस्ट हटवल्या आहेत. या अशा पोस्ट आहेत, ज्या समाजात हिंसाचार पसरवू शकतात किंवा लोकांपर्यंत हिंसा पसरवण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांवर टाकल्या गेल्या आहेत.

Continues below advertisement

जातीय तेढ पसरवणाऱ्या एकूण 12,800 सोशल मीडिया पोस्ट हटवल्यामुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने जानेवारीत 5 हजार 754, फेब्रुवारीत 4 हजार 252, मार्चमध्ये 3 हजार 958 पोस्ट हटवली आहेत. या अशा पोस्ट आहेत ज्या समाजात हिंसाचार पसरवू शकतात किंवा लोकांपर्यंत हिंसा पसरवण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांवर टाकल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी महाराष्ट्र एसआयडीची टीम दररोज 30 ते 35 अशा पोस्ट हटवत असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या काळात अशा पोस्टच्या प्रमाणात वाढकोविडपासून सोशल मीडियावर लोकांची अॅक्टिव्हिटी खूप वाढली आहे, त्यामुळे अशा पोस्टची संख्याही वाढत आहे. सूत्रांनी सांगितले की, राजकीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य येताच सोशल मीडियावर पोस्टची संख्या वाढू लागते. महाराष्ट्र पोलिस सोशल मीडियावरील सर्व पोस्टवर लक्ष ठेवून आहेत आणि विशेषत: समाजात कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण करू शकतात.

Continues below advertisement

'सोशल मीडिया लॅब' सक्रिय मुंबई पोलिसांनी सोमवारी सांगितले की, मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे. यामुळए आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजित तेढ निर्माण करण्यांना आता चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येतेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे 3000 पोस्ट डिलीट केल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

New Army Chief : भारतीय लष्कराला लाभले पाठोपाठ दोन मराठमोळे लष्करप्रमुख! देशाचे पुढील लष्करप्रमुखही मराठीच, जाणून घ्या

Beed News : पाटोद्यात गावकऱ्यांकडून सर्वधर्म समभावतेचा संदेश, अखंड हरिनाम सप्ताहातच मुस्लिम बांधवांसाठी पंगत

​​​​NPC Recruitment 2022 : सरकारी नोकरी हवीये? प्रति माह 25 ते 50 हजार कमावण्याची संधी, बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक

Coronavirus : दिल्लीमध्ये कोरोनाचा आलेख वाढताच, नव्या रुग्णांची संख्या 500 पार