Maharashtra Breaking News LIVE Updates : आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नको, नाना पटोलेंची मागणी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 07 Dec 2021 04:07 PM
सोयाबीन आयातीचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे विचाराधीन नाही

सोयाबीन आयातीचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे विचाराधीन नाही, वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची ट्विट करून स्पष्टोक्ती


भारतातील पोल्ट्री उद्योगासाठी खाद्य म्हणून वापरली जाणारी सोया पेंड आयात करण्याचा कोणताही विचार नाही. महाराष्ट्राच्या कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी त्यांची भेट घेतली त्यानंतर गोयल यांनी हा निर्णय जाहीर केला. सोया पेंडच्या आयातीमुळे देशातील सोयाबीनचे दर पडणार असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.

लातूरमधील आरोग्य विभागाचा पेपरफुटी प्रकरणात वरिष्ठ कर्मचारी

लातूरमध्ये आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या आधीच पेपर फोडण्यात आला होता. या प्रकरणी विभागाचे काही कर्मचारी जबाबदार असल्याचे समोर आले आहे. आरोपींना सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राऊत उद्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. 

पनवेलकरांचा पहिला डोस १०० टक्के पुर्ण दुसरा डोसचे ६७ टक्के लोकांना टिकाकरण

पनवेल मध्ये लसीकरणाचा पहिला  महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे . पनवेलकरांनी पहिला डोस १०० टक्के घेतला असून दुसरा डोस ६७ टक्के लोकांनी घेतला आहे. दुसर्या डोस घेण्याचा वेग वाढला असल्याने येत्या काही दिवसात दोन्ही डोस पुर्ण करणारे शहरांच्या यादीत पनवेल जावून बसणार आहे. पहिला डोस सर्वांना लागला  असल्याने  सुरक्षाकवच पुर्ण  झाल्याचे पनवेल प्रशासनाने जाहीर केले आहे. पहिला डोस घेणारे शहरातील पाच लाख ९८ हजार ५६५ नागरिक आहेत. तर दुसरा डोस घेणारे आतापर्यंत पालिका क्षेत्रातील ४ लाख ९५४ जण आहेत. हे प्रमाण ६७ टक्के इतके आहे. .पहिल्या लस मात्रा मधील चार लाख 18 हजार डोस  सरकारी आरोग्य केंद्रातून लस घेतल्या गेल्या आहेत. त्यामुळे पनवेलकरांनी सरकारी रूग्णालयास जास्त पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे.

ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांविरोधात हायकोर्टात तक्रार

प्रकरण कोर्टात असताना वानखेडेंबाबत कोणतंही विधान करणार नाही, अशी हमी देऊनही मलिकांची टिका टिप्पणी सुरूच असल्याने समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडें यांनी नवाब मलिकांविरोधात हायकोर्टात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान कोर्टाच्या आदेशानंतरही अवमान केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना विचारला असून शुक्रवारपर्यंत मलिकांना उत्तर देण्याचे निर्देशही दिले आहेत.

आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नको, नाना पटोलेंची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. राज्यातील कुठलीही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ द्यायची नाही असं सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. 

राज्यसभेत 12 निलंबित खासदारांच्या धरणं आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार संसद आवारात

राज्यसभेत 12 निलंबित खासदारांच्या धरणं आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार संसद आवारात. सोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती.

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल, अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी चौकशी

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. 

मुंबई: सांताक्रूझ ते गिरगाव चौपाटी मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता, पर्यायी मार्ग वापरण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन

मुंबई: सांताक्रूझ ते गिरगाव चौपाटी मार्गावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासामुळे सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांना वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे. 


 





पार्श्वभूमी

ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांविरोधात पुन्हा हायकोर्टात धाव, आज सुनावणी


नवाब मलिकांची वानखेडेंबाबतची विधानं सुरूच आहेत. कोर्टाचा अवमान केल्याबद्दल दाद मागण्याची शक्यता. हायकोर्टाचा निकाल लागेपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही विधान करणार नाही अशी मलिकांनी हमी दिली होती. अंबरनाथच्या प्राध्यापकांची आगरी समाजावर पीएचडी; पीएचडी मिळाल्यानंतर गावकऱ्यांकडून जंगी स्वागत


अंबरनाथच्या प्राध्यापकांची आगरी समाजावर पीएचडी; पीएचडी मिळाल्यानंतर गावकऱ्यांकडून जंगी स्वागत


अंबरनाथ तालुक्यातल्या एका प्राध्यापकांनी आगरी समाज या विषयावर पीएचडी मिळवली. यानंतर त्यांचं कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. मनसे आमदार राजू पाटील यांचे वर्गमित्र असलेल्या या प्राध्यापकांच्या कौतुकासाठी स्वतः राजू पाटील यांच्यासह अनेक वर्गमित्रही उपस्थित राहिले.  सुरेश तुकाराम मढवी असं या प्राध्यापकांचं नाव असून ते अंबरनाथ तालुक्यातल्या उंबार्ली गावात राहतात. गेल्या  23 वर्षांपासून मढवी हे कल्याणच्या के. एम. अगरवाल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. स्वतः आगरी समाजात जन्मलेल्या सुरेश मढवी यांनी  2014 सालापासून आगरी समाजाचा अभ्यास सुरू केला. यानंतर "ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास" या विषयावर त्यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. आगरी समाजात शिक्षणाची सुरुवात  1960 पासून झाली, त्यामुळे त्यापूर्वीचे कोणतेही लेखी संदर्भ उपलब्ध नसताना गावोगाव फिरून माहिती गोळा करत सुरेश मढवी यांनी या विषयाचा अभ्यास केला. आगरी कोळी समाज आद्यनिवासी असूनही विकासापासून वंचित असून आगरी समाजाचा परिचय इतर समाजांना व्हावा, या हेतूनं आपण हा विषय निवडल्याचं सुरेश मढवी यांनी सांगितलं.


Omicron Variant : काळजी घ्या, मास्क वापरा! राज्याची चिंता वाढली, ओमायक्रॉनबाधितांची संख्या 10 वर


जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं आता देशासह राज्याचीही चिंता वाढवली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या (Omicron Varient) आता 10 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकार अलर्टवर आहे. लहान मुलांचं लसीकरण आणि बुस्टर डोससाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं आहे. जिनोम सिक्वेन्सिंग तपासणीची औरंगाबाद आणि नागपूरमध्ये नवीन लॅब तयार करणार असल्याचं टोपेंनी यावेळी सांगितलं. 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.