Maharashtra Breaking News LIVE Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक्सच्या उत्तरेला जयगडवरून गोव्याला निघालेलं कृष्णा बार्ज समुद्रात बुडालं

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 05 Dec 2021 10:29 AM
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक निंदनीय - शरद पवार

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली. दरम्यान या घटनेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना या घटनेचा निषेध करत लोकशाहीत अशी घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे 

पुण्यातील डेल्टा सबलिनिएझ या नवीन वेरियंटच्या संसर्गाचा रेट जास्त आहे

राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी आमच्या त्याविषयीची काळजी घेण्याचे काम करत आहोत पुण्यात जो नवा डेल्टा सबलिनिएझ हा नवीन वेरियंट सापडला हे खरंय त्याच्या संसर्गाचा रेटही जास्त आहे.मात्र प्राण गमावले जाण्याची शक्यता कमी आहे.मुंबई विमानतळावर बाहेर देशातून आलेल्या ३८३९ जणांचे अहवाल आलेत त्यातील ६ जण पॉसिटीव्ह आले आहेत आम्ही त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची ट्रॅकिंग करून ट्रेसिंग करत ट्रीटमेंट साठी आयसोलेट करत आहोत.घाबरण्याचे कारण नाही मात्र काळजी सर्वांना घ्यावी लागणार असल्याचे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परभणीत व्यक्त केले आहे.

साताऱ्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीच्या रथोत्सव सोहळ्याला सुरुवात

साताऱ्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीच्या रथोत्सव सोहळ्याला सुरुवात


गुलालाची उधळण करत यात्रा मैदानात आणला रथ


ही यात्रा ओमायक्राॕनच्या पार्श्वभूमीवर  प्रशासनाने रद्द केल्याच्या निषेधार्थ  ग्रामस्थ झाले होते आक्रमक


म्हसवड गावातील बाजारपेठा दुकाने सर्व बंद करून प्रशासनाचा केला होता निषेध


निषेधानंतर प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना घेऊन काही वेळेसाठी रथोत्सव साजरा करण्याची दिली होती सशर्त परवानगी.

श्रीरामपूर शहरात भरवस्तीत बिबट्या... बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी..

श्रीरामपूर शहरात भरवस्तीत बिबट्या...
बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी...
शहरातील मोरगे वस्तीत बिबट्या घुसला...
अचानक आलेल्या बिबट्याने नागरिकांची धावपळ..
बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू....
4 ही जखमींना रुग्णालयात केले दाखल...
पोलीस घटनस्थळी दाखल....

धारावीवरही ओमायक्रॉनचं सावट? 

धारावीवरही ओमायक्रॉनचं सावट? 


पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथुन आलेला एक व्यक्ती धारावी येथे वास्तव्यास आहे...


या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय...


स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला आहे...अहवाल अद्याप प्रतिक्षेत 


कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे...


या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सध्या सुरु आहे...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक्सच्या उत्तरेला जयगडवरून गोव्याला निघालेलं कृष्णा बार्ज समुद्रात बुडालं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक्सच्या उत्तरेला जयगडवरून गोव्याला निघालेलं कृष्णा बार्ज समुद्रात बुडालं. ही घटना 2 डिसेंबरची असून खराब हवामानाचा फटका या बार्जला बसला. कृष्णा बार्ज जेव्हा बुडाले तेव्हा त्यावर 10 क्रु मेंबर होते. बार्ज बुडत असल्याने १० जणांनी समुद्रात उडी मारली. त्यातील ५ जणांना वाचवण्यात गोवा तटरक्षक दलाला यश आलं तर एकाचा मृतदेह मिळाला. अद्याप चार सदस्य बेपत्ता होते. जयगड येथून गोव्यासाठी हे बार्ज वेंगुर्ला रॉक्सच्या परिसरात बुडाले . तेव्हा गोवा तटरक्षक दलाने त्यांचे हेलिकॉप्टर चेतक आणि तीन जहाजे शोध आणि बचाव कार्यासाठी पाठवली. यावेळी केरळच्या तीन वेगवेगळ्या मासेमारी नौकांनी तिघांना वाचवलं होत. सध्या गोवा तटरक्षक दल समुद्रात सर्च ऑपरेशन करत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.


Omicron Variant : दिलासादायक! ओमायक्रॉन इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक नाही... 'या' देशाची माहिती


Omicron Variant : जगभरात ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट चिंतेचा विषय बनला असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या (Corona) इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं (Singapore Health Ministry) दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरिएंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असण्याचे किंवा या व्हेरिएंटवर सध्याची कोविड लस प्रभावी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 'चॅनल न्यूज एशिया' वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मंत्रालयानं सांगितलं की, ओमायक्रॉनबद्दल अधिक माहिती आणि अभ्यास आवश्यक आहे. येत्या आठवड्यात जागतिक स्तरावर आणखी माहिती समोर येईल.


समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला दणका, 328 कोटींचा दंड भरावाच लागणार  
जालना :  जालना जिल्ह्यात महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाच अवैध उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन टप्प्यात 328 कोटींचा दंड ठोठावला होता.  समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार मॉन्टे कार्लो लि या कंपनीला ठोठावलेल्या 328 कोटी दंडाच्या विरोधातील आव्हान याचिका सर्वाच्च न्यायालयाने आज फेटाळत ही याचिका फेटाळली आहे. जालना जिल्ह्यातील जालना तालुका आणि बदनापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैध गौण खनिज उत्खनन केल्याबाबत जालन्याचे तहसीलदारांनी ठोठावलेल्या 328 कोटी  रुपयांच्या दंडाविरुद्ध कंत्राटदार संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद  खंडपीठात दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या याचिका या पूर्वीच फेटाळल्या होत्या.  दरम्यान सर्वाच्च न्यायालयाने आज कंपनी विरोधातील याचिका फेटाळल्याने कंपनीला ३२८ कोटी रुपये दंड आता भरावाच लागणार आहे. जालना जिल्ह्यात परवानगीच्या मर्यादेपेक्षा कंपनीने जास्त गौण खनिजाचे उत्खनन केल्याच्या समितीच्या अहवालावरून तहसीलदारांनी मॉन्टे कार्लो  कंपनीला 165 कोटी, 87 कोटी व 77 कोटी अशा तीन टप्प्यांत एकूण 328 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तहसीलदारांनी ठोठावलेल्या दंडाविरुद्ध  कंपनीने तीन वेगवेगळ्या याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. या तिन्ही याचिका औरंगाबाद  खंडपीठाने फेटाळल्या होत्या. 


Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर, सर्वसामान्यांना दिलासा कायम 


Petrol Diesel Price Today : सर्वसामान्यांना इंधन दरवाढीतील दिलासा कायम आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 प्रतिलीटर आणि आणि डिझेलचा दर 94.14 प्रतिलिटर रुपयांवर स्थिर आहेत. मागील काही दिवसांपासून इंधन कंपन्यांनी इंधन दरात कोणतीही वाढ झालेली नाही. जवळपास महिनाभरापासून इंधन कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहेत. 
 देशाची राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकातासह देशातील विविध शहरांमध्ये रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम राहिले आहेत. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 86.67 प्रतिलीटर आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 109.98 प्रतिलीटर आणि 94.14 प्रतिलीटरवर स्थिर आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रतिलीटर तर कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर  अनुक्रमे 101.40 रुपये आणि 91.43 रुपये आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.