Maharashtra Breaking News LIVE Updates : सरकारसोबत चर्चा करण्यासाठी किसान मोर्चातर्फे पाच सदस्यांची समिती

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 04 Dec 2021 05:01 PM
सरकारसोबत चर्चा करण्यासाठी किसान मोर्चातर्फे पाच सदस्यांची समिती

सरकारसोबत उर्वरित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने पाच सदस्यीय समिती बनवली. यात महाराष्ट्रातले डावे नेते अशोक ढवळे यांचाही समावेश आहे. संघाशी पूर्वी संबंध असलेले शिवकुमार कक्का यांचाही समावेश आहे.

शेतातील वीज बंद केल्याने शेतकऱ्याचा पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न;पोलिसांमुळे अनर्थ टळला

रब्बीच्या हंगामात थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची सरसकट वीज कनेक्शन कट केली जात आहे. महावितरणाच्या या सुलतानी कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. तर औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात रोहित्र सुरू करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडकडून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू असतानाच शेख शाकिर नावाच्या शेतकऱ्यांने अचानक अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, तर याचवेळी वसंत पाथ्रीकर नावाच्या शेतकऱ्यांने खिशातील विषाची बाटली काढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनास्थळी बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील नियमात बदल

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील नियमात बदल


तासाला 1500 ऐवजी 1200 भविकांना प्रवेश दिला जाणार


कोरोनाचे संकट वाढले तर तासाला 700 पास भाविकांना दिले जातील


कोणत्याही भाविकांने मंदिराच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू नये असं देवस्थान समितीचे आवाहन


पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांची माहिती

25 दिवसानंतर लालपरी धावली,  नंदुरबार आगारातून पहिली बस धुळ्यासाठी रवाना

एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करावे या मागणीसाठी गेल्या 25 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता शासनाने 41 टक्के पगार वाढ जाहीर केली होती. नंदुरबार जिल्ह्यातील 88 कर्मचाऱ्यांनी ही पगारवाढ मान्य करत कामावर परत येण्याचा निर्णय घेतला असल्याने आजपासून काही फेऱ्या सुरू झाल्या आहेत . नंदुरबार आगारातून मोठ्या पोलीस बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस सोडण्यात  आली .जिल्ह्यातील चार ही आगारातून काही बस फेऱ्या सुरू करण्यात येत आहे.ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या लालपरी आज रस्त्यावर धावल्याने प्रवश्यानी समाधान व्यक्त केलं आहे.अनेक दिवसापासून आम्ही बस सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करत होतो आज सुरू झालेल्या काही फेऱ्यांमुळे जेष्ठ नागरिकांनी ही आभार मानले आहेत.बस फेऱ्या सुरू झाल्याने अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूकदारांना चाप बसणार आहे.

एजाज पटेलचा विश्वविक्रम, मुंबई कसोटीत घेतल्या दहा विकेट्स, अनिल कुंबळेंच्या विक्रमाशी बरोबरी

#BREAKING : एजाज पटेलचा विश्वविक्रम, मुंबई कसोटीत घेतल्या दहा विकेट्स, अनिल कुंबळेंच्या विक्रमाशी बरोबरी

विनायक मेटे यांना कोरोनाची लागण

शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मेटे यांनी सहा महिन्यापूर्वीच दोन्ही लसीचे डोस घेतले होते. मेटेंची प्रकृती ठीक असून ते  मुंबईमध्येच उपचार घेत आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली ही कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन सुद्धा मेटे यांनी केले आहे

सांगलीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बाळांना रक्तवाढीसाठी  मुदत संपलेली औषधं वाटप
सांगलीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बाळांना रक्तवाढीसाठी मुदत संपलेली 2 ते 3 बॉटल औषधे वाटप झाल्याचा प्रकार घडलाय.   पालकांनी मुलांना औषधे पाजण्याअगोदरच प्रकार लक्ष्यात आल्याने पुढील अनर्थ टळला असून मुदत संपलेली औषधें वाटप झाल्याचे लक्ष्यात येताच आरोग्य विभागाने औषधें बॉटल परत घेतल्या आहेत. नजरचुकीने मुदत संपलेली औषधें वाटप झाल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेय. नोव्हेंबरला औषधांची मुदत संपलेली असताना एक डिसेंबर रोजी बॉटलचे वाटप झाले होते. या घटनेत नोव्हेंबरची मुदत असलेल्या तीन बाटल्यांचे वाटप करण्यात आल्याचं कबुल करण्यात आलंय. या तीनही बाटल्या परत घेतल्या आहेत. आरोग्य सेविकांनी मुलांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून सर्व मुलांची प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
कांद्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी

कांद्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी , भिजलेला कांदा 5 रुपये पासून 14 रुपये पर्यंत विकला गेला तर वाळलेला कांदा 25 रुपये किलो दराने विकला . सलग तीन दिवस पाऊस सुरू असल्याने डाळिंबाची आवक कमी होऊन सुद्धा सरासरी 70 रुपयांचा भाव मिळाला . दिल्ली बाजारात गुजरातच्या डाळिंबापेक्षा दुप्पट भाव महाराष्ट्राच्या डाळिंबाला मिळत आहे

म्हसवड यात्रेसाठी नियम आणि अटी

म्हसवड यात्रेसाठी नियम आणि अटी
 
मंदिर पटांगणात येण्यासाठी दोन डोस झाले असल्यास परवानगी
48 तासात आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक
रांगेतून दर्शन घेताना किमान सहा फुटाचे अंतर असणे बंधनकारक
सॅनिटायझर आणि मास्कचा वापर बंधनकारक
सर्व धार्मिक विधी करण्यास परवानगी
ऑनलाईन दर्शन देण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे मंदिर व्यवस्थापनाला आदेश
मंदिर परिसरातील दुकांनाना कोविडचे नियम पाळून परवानगी
भाविकांना गाभाऱ्यात जाता येणार नाही
मंदीरातील मुर्ती आणि रथाचे पावित्र्य राखण्यासाठी बॅरेकेटींग लावून लांबून दर्शन, स्पर्श करण्यास मनाई
यात्रेत पाळणे, हातगाडे, मनोरंजनाची साधने यांना परवानगी नाही
परगावाहून येणाऱ्या दिंडी, पालखी, सासनकाठी इत्यादीना परवानगी नाही

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 



  • ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता, भारतात 40 ओमायक्रॉन संशयित बेपत्ता, दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

  • कर्नाटकात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर नवी नियमावली, दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मॉल,चित्रपटगृहात प्रवेश

  • मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन एसटी संपकऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा निर्णय घेणार, परिवहन मंत्र्यांचा इशारा, संपकरी कर्मचाऱ्यांना अटक होण्याची शक्यता

  • मनसे अध्यक्ष राज टाकरेंचा 10 दिवस महाराष्ट्र दौरा, 6 डिसेंबरला पुण्यापासून सुरुवात तर स्वतंत्र लढण्य़ाची कार्यकर्त्यांची भावना, संदीप देशपांडेंची माहिती

  • सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा ममता बॅनर्जींवर निशाणा, काँग्रेसला दूर ठेवून राजकारण म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळ, शिवसेनेचा घणाघात

  • नाशिकमध्ये संमेलनाध्यक्षांच्या अनुपस्थितीवर कौतिकराव ठाले पाटीलांची टीका तर ८०० वर्षांपूर्वीपासून मराठी समृद्ध असल्याचं जावेद अख्तरांचं वक्तव्य, उद्धाटनात कोरोना नियमांची पायमल्ली

  • 2024  पर्यंत मुंबईतील 50 टक्के बसेस इलेक्ट्रीक करणार, आदित्य ठाकरेंची घोषणा तर ई वाहन खरेदी केल्यास शून्य वाहन कर, एबीपी माझावरील कार्यक्रमात सुभाष देसाईंची माहिती

  • वाशी एपीएमसीत 'नो मास्क, नो एन्ट्री', कामगारांसह व्यापारी आणि ग्राहकांनाही मास्क बंधनकारक, लसीकरणाची व्यवस्थाही करणार

  • मयांक अगरवालचं मुंबई कसोटीत नाबाद शतक, टीम इंडियाची पहिल्या दिवसअखेर चार बाद 221 धावांची मजल, विराट कोहलीला बाद ठरवण्याचा निर्णय वादग्रस्त

  • पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये श्रीलंकन नागरिकाची निर्घृण हत्या, हजारो मजुरांनी मॅनेजरला जिवंत जाळलं, काळा दिवस म्हणत इम्रान खान यांच्याकडून निषेध



Cyclone Jawad: 'जोवाड' चक्रीवादळाचं संकट! 'या' राज्यांना सर्वाधिक धोका; यंत्रणा सतर्क, NDRF तैनात  
 
Cyclone Jawad: ओमायक्रॉनसोबतच (Omicron) आणखी एक संकट देशावर चाल करुन येत आहे.  'जोवाड' (Cyclone Jovad) चक्रीवादळाची बंगालच्या उपसागरात निर्मिती झाली आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या किनारपट्टी भागात धडकून पश्चिम बंगालच्या दिशेने जाणार आहे. आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात पोहोचताना वादळाभोवती फिरणाऱ्या चक्रीवादळाचा वेग ताशी 100 किलोमिटरपर्यंत असणार आहे, अशी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या असून एनडीआरएफच्या 64 टीम ओदिशामध्ये तयार असल्याची माहिती मिळाली आहे. 


महाराष्ट्राला जोवाड चक्रीवादळाचा कोणताही धोका नाही 


एनडीआरएफकडून बोटी, वृक्षतोड करणारे, दूरसंचार उपकरणे इत्यादींनी परिपूर्ण असलेले 29 चमू सज्ज ठेवले आहेत तर 33 चमूंना गरजेनुसार तयार आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाकडून मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे.  लष्कराचे हवाई दल आणि अभियंता कृती दल विभाग गरज पडल्यास तैनातीसाठी सज्ज आहे. पूर्व किनारपट्टीवर आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथके गरजेनुसार सज्ज करण्यात आली आहे. 
 
पाकिस्तानात अघोरी तालिबानी कृत्य! जमावानं श्रीलंकन मॅनेजरचे हात-पाय तोडून जिवंत जाळलं
Pakistan Mob lyanching Case :  दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या  पाकिस्तानातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात एक अघोरी असं तालिबानी कृत्य घडलंय. ते म्हणजे पाकिस्तानी मजुरांनी श्रीलंकन मॅनेजरचे हात-पाय तोडून त्याला जिवंत जाळलंय. पाकिस्तानातील सियालकोटमध्ये हा धक्कादायक प्रकार काल दुपारी घडला आहे.  पाकिस्तानी क्रिकेट टीमचं साहित्य बनवणाऱ्या कारखान्यातील मजुरांनी हे अमानवीय कृत्य केलं. याप्रकरणी 100 जणांना अटक केली आहे. जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या श्रीलंकन व्यक्तीचं प्रियांथा कुमारा असं नाव आहे. प्रियांथा यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेलं धार्मिक पोस्टर फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकलं. त्यामुळे फॅक्टरीतील मजुरांसह भडकलेल्या जमावानं हे संतापजनक कृत्य केल्याचं कळतंय. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केलाय.  


Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लोकल चालणार, जाणून घ्या वेळापत्रक 


Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Specil Local :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महिपरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे. कोरोनासंबंधित नियमांचं पालन करुन चैत्यभूमीवर येण्याची परवानगी देण्यात आली आहे.  महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता 8 उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे.  या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.