Maharashtra Breaking News LIVE Updates: एसटी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकारला मान्य

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 20 Dec 2021 08:48 PM
मुंब्र्यात नायजेरियन ड्रग पेडलरवर पोलिसांची झडप, सोबत 4 अजून पेडलर्सला देखील अटक

तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणाऱ्या इझोबियालो सुंडे या नायजेरियन ड्रग पेडलरला मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या महिला साथीदारासह आणि तीन अंमली पदार्थ तस्करांना पोलिसांनी अटक केली असून या सर्वांकडून अंदाजे 20 लाखांचे एमडी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले. शमा सय्यद, फिरोज खान, हिदायत अन्सारी, सय्यद अली उर्फ राजू असे अटक करण्यात आलेल्या इतर ड्रग्ज पेडलर्सची नावे आहेत. मुंब्रा येथील खडी मशीन परिसरात काही जण एमडी ड्रग्सची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक हर्षद कोळी यांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून इझोबियालो सुंडे याला आणि शमा सय्यद या दुकलीला अटक केली. यासोबतच दुसऱ्या गुन्हयात फिरोज खान, हिदायत अन्सारी, सय्यद अली उर्फ राजू या त्रिकुटाला अटक केली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मेट्रो सिटी म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या ठाण्यात तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणारे अनेक ड्रग्ज माफिया आपले बस्तान मांडत असल्याचे याआधीही समोर आले आहे.

एसटी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकारला मान्य

जवळपास 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाबाबत राज्य सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.  विलिनीकरणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकार या दोन्ही बाजूंना मान्य असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. 

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी जवळपास सहा तासांपासून मंत्रालयात बैठक सुरु

 आहे. बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महा व्यवस्थापक माधव काळे , संधटनेचे अजय गुजर उपस्थित आहे.

आकोल्यात मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आज मोसमातील सर्वात किमान तापमानाची नोंद करण्यात आलीय. आज कृषी विद्यापीठात परिसरात 5.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने पुढचे तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय. यामुळे पोल्ट्री चालक आणि शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका वाढल्याने जनजीवन प्रभावित झालं आहे.

नवाब मलिक चक्रव्यूह मे फसने वाला नही चक्रव्यूह तोडणे वाला आदमी है..- नवाब मलिक

ईडी वाले से नवाब मलिक डरने वाला नहीं....
देशात केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग...


नवाब मलिक चक्रव्यूह मे फसने वाला नही चक्रव्यूह तोडणे वाला आदमी है..-नवाब


अमित शहा यांच्यावर टीका- 


पहिले तुम्ही हिंमत दाखवा मग आम्ही दाखवू,आम्ही वचन देतो तुम्ही राजीनामा द्या 105 चा आकडा  55 होईल...


आपण ईडी ला घाबरत नसून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना देखील वानखेडे नादी लागल्यावर नवाब मलिक यांनी काय करून टाकलं त्यामुळे मालिकांच्या आम्ही नादी लागणार नाही अशी भावना तयार झाली असल्याचे सांगत नवाब मालिकांनी अमित शहा यांना  राज्यातील भाजप आमदारांच्या राजीनाम्या बाबत हिंमत दाखवण्याचे आव्हान दिलय,राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या 105 वरून 55 वर येईल असे नवाब मलिक म्हणाले..

लहानग्या चोरट्यानं मंदिरातली दानपेटी केली लंपास

अंबरनाथ पूर्वेला मोहन पुरम परिसर आहे. या परिसरात रिक्षा स्टँडजवळ गणपती मंदिर आहे. या मंदिरात रविवारी संध्याकाळी सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगा आला, गणपतीला नमस्कार केला आणि नंतर दानपेटीच उचलून घेऊन गेला. या दानपेटीत नेमके किती पैसे होते, याचा अंदाज लावणं कठीण आहे. ही घटना मंदिराच्या सीसीटीव्हीत कैद झाली असली, तरी याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही.

परभणीच्या पालम नगरपंचायत निवडणुकीत पैसे वाटप 

परभणीच्या पालम नगरपंचायत निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला 25 हजार रोखरक्कम आणि मतदार यादी ही जप्त करण्यात आली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांचे निधन

प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. तसेच  कला शिक्षक म्हणून त्यांनी 40 वर्ष सेवा केली आहे. 

निवडणूक सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर; आधार क्रमांक आणि मतदान ओळखपत्र लिंक होणार

निवडणूक सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. आधार क्रमांक आणि मतदान ओळखपत्र लिंक होणार आहे. 

वढु बुद्रुक येथे उभारण्यात येणार स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक; स्मारकाच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजूरी

मुंबई:- वढु बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मंजूरी दिली. छत्रपती संभाजी महाराजांचे साकारण्यात येणारे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे, भव्य दिव्य असले पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.    


मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या वढु बुद्रुक ता. हवेली, जि. पुणे येथील स्मारकाच्या उभारणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अशोक पवार, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव (व्हीसीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (व्हीसीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (व्हीसीद्वारे), पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख (व्हीसीद्वारे), वढूचे माजी सरपंच अनिल शिवले, अंकुश शिवले उपस्थित होते. 


स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी, विस्तारासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढु बुद्रुक येथे उभारण्यात यावे. हे स्मारक उभारताना त्याला ‘हेरिटेज’ टच असावा, स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तुरचनांचा आधार घ्यावा. वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी, त्यावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखो नागरिक येतात. येथे दर्शनासाठी येणाऱ्या चाहत्यांची योग्य सोय व्हावी, याची काळजी घेण्यात यावी. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचे काम, सर्वांच्या संमतीने, सर्वांना सोबत घेऊन भव्यदिव्य स्वरुपात करण्यात यावे. या स्मारकाची उभारणी भव्यदिव्य करण्यासाठी स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. या क्षेत्रातील तज्ञ मंडळी तसेच सर्वसामान्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांचे स्वागत करुन त्याचा अंतर्भाव सुधारित आराखड्यात करण्यात यावा. स्मारक उभारणीचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन सर्वांना विश्वासात घेऊनंच काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

सुकेश चंद्रशेखरमुळे शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर ईडीच्या रडारवर

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरमुळे शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर या अभिनेत्री ई़डीच्या रडारवर आहेत. सुकेशकडून महागडं गिफ्ट घेतलेल्या 15 अभिनेत्रींवर ईडीची नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेशच्या चौकशीत आणखी नावं समोर आल्याचं कळतंय. याआधी जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीची ईडीकडून चौकशी झाली होती. त्यानंतर आता आणखी अभिनेत्रींची नावं सुकेशच्या चौकशीत समोर आलीत. 

राज्य सरकारनं चंद्रपुरातील दारूबंदी उठवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका,डॉ. अभय बंग यांच्यासह अन्य चार जणांकडनं जनहित याचिका सादर

राज्य सरकारनं चंद्रपुरातील दारूबंदी उठवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका


डॉ. अभय बंग यांच्यासह अन्य चार जणांकडनं जनहित याचिका सादर


या याचिकांवर मुंबईत सुनावणी घ्यायची की नागपूरात यावर मुख्य न्यायमूर्ती प्रशासकीय पातळीवर निर्णय घेणार

11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंद विरोधात हायकोर्टात याचिका

11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंद विरोधात हायकोर्टात याचिका


लखीमपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बंद कशासाठी?, याचिकेत मुद्दा


माजी आयपीएस अधिकारी जुलिओ रिबेरो यांच्यासह अन्यकाही जणांनी दाखल केली याचिका


इतिहासात पहिल्यांदाच राज्यात सत्तेत असलेल्या पक्ष बंदमध्ये सहभागी झाले


त्या एका दिवशी राज्याचं अंदाजे 3 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा दावा

यूनियन बँक फ्रॉड केसमध्ये EDची छापेमारी, मुंबईमध्ये अनेक जागांवर धाडसत्र सुरु असल्याची माहिती 

यूनियन बँक फ्रॉड केसमध्ये EDची छापेमारी, मुंबईमध्ये अनेक जागांवर धाडसत्र सुरु असल्याची माहिती 

शेअर बाजारात घसरण सुरूच; सध्या सेन्सेक्समध्ये 1800 अंकांची घसरण

अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला, एनडीपीएस केसमध्ये अरमान कोहली ऑगस्टपासून जेलमध्येच

अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला, एनडीपीएस केसमध्ये अरमान कोहली ऑगस्टपासून जेलमध्येच


मात्र याच प्रकरणातील दोन अन्य आरोपींचा जामीन अर्ज हायकोर्टाकडनं मंजूर


करीम धनानी आणि इम्रान अन्सारी यांची सुटका करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अभाविपचे मुंबई विद्यापीठात आंदोलन
महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अभाविपचे मुंबई विद्यापीठात आंदोलन

 

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 मध्ये बदल करून राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून शिफारस केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाला मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली...

 

 कुलपतींच्या अधिकार कमी करून राज्य सरकार विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढविण्याचा डाव राज्य सरकारचा असल्याचा आरोप अभाविपने केला असून याविरोधात आज विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अभाविप कडून आंदोलन केले जात आहे

 

शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढविण्याच्या निर्णयाला मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही अभाविपने दिला आहे

 
राज्यातील दुर्गम भागात कुपोषणासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरू

राज्यातील दुर्गम भागात कुपोषणासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरू


आयपीएस अधिकारी डॉ. दोरजे यांनी न्यायालयाकडून मेळघाट परिसरात जाऊन पाहणी केली


डॉ. दोरजे यांचा परिस्थितीबाबतचा अहवालही न्यायालयात सादर

TET परीक्षा घोटाळा प्रकरण, दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखी पैशाचं घबाड

TET परीक्षा घोटाळा प्रकरण


दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखीन पैशाचं 
घबाड...


पोलिसांच्या तपासात घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने केली हस्तगत...


सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली...


मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटीहुन अधिक रक्कम आणि सोने मिळाले...


तुकाराम सुपे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत..

भाजीपाला महागला, वांग्यानी शंभरी गाठली  
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने ढगाळ वातावरणाने शेतातील पालेभाज्यांचा मोठे नुकसान झालं होतं आणि त्याचा फटका आता थेट बाजारपेठेत पडताना दिसून येतोय. बाजारपेठेमध्ये पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे सर्व पालेभाज्यांचे भाव सुद्धा वाढले आहे, वाग्यांनी तर चक्क शंभरी पार केली आहे आणि अन्य भाजीपाल्याचे सुद्धा भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे

 
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला ईडीचं समन्स; पनामा पेपर लीक प्रकरणी समन्स, सुत्रांची माहिती

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला ईडीचं समन्स; पनामा पेपर लीक प्रकरणी समन्स, सुत्रांची माहिती

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय एजन्सींचं 'ओएसडी' व्हावं तर सोमय्यांनी 'प्रवक्ता', नवाब मलिकांचा टोला 

Nawab Malik Tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी ट्वीट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना टोला लगावला आहे. सकाळी ट्वीट करत नवाब मलिक यांनी फडणवीसांचे नाव न घेता म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय एजन्सींना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात खूप रस दाखवत आहेत. मी असं सुचवतो की त्यांनी स्वत:ची नियुक्ती ओएसडी म्हणून करावी. त्यांना मुख्यमंत्री म्हणून अशा नियुक्ती करण्याचा भरपूर अनुभव आहे आणि किरीट सोमय्या प्रवक्ता म्हणून नियुक्ती करावी, असं मलिकांनी म्हटलं आहे. 


Sanjay Raut: हिंमत असेल तर 105 आमदारांनी राजीनामे द्यावेत; शिवसेनेचे अमित शाह यांना प्रतिआव्हान
Shivsena Leader Sanjay Raut  : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे भाजपातील राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेतेदेखील वैफल्यग्रस्त झाले आहेत. हिंमत असेल तर भाजपने आपल्या 105 आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी असे प्रतिआव्हान शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. शिवसेनेने हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्यावी असे आव्हान दिले होते. त्यावर संजय राऊत यांनी आज प्रतिआव्हान दिले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांनी केलेले वक्तव्य असत्याला धरून असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदूत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप नेत्यांकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे.  भाजपचे केंद्रीय नेतेदेखील वैफल्यातून त्यांचीच री ओढत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सत्ता वाटपाबाबत शिवसेना खोटं बोलत असल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शाह याच्या उपस्थितीत 50-50 टक्के सत्ता वाटप ठरले होते. पुणे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे पुण्यात तरी शाह यांनी खोटं बोलू नये असे राऊत यांनी म्हटले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.