Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाण्यातील इमारतीला आग

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 17 Dec 2021 08:53 PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची केली पहाणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री आठ वाजता विधान भवनात अचानक भेट दिली आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची पहाणी केली. त्याच बरोबर त्यांनी अधिवेशन काळात विधान भवनात कुठेही चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून डाँक्टरांच्या सल्या नुसार चालण्याचा सरावही केला. विधान भवनातील विधान सभा आणि विधान परीषदेच्या दोन्ही सभागृहात जाऊन त्यांनी तीथल्या पूर्व तयारीची पहाणी केली. तसेच विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालय तसेच समिती सभागृहात जाऊन हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची माहीती घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातील अचानक भेटीमुळे विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचीही तारांबळ उडाली असल्याची माहीती सूत्रांनी दिलींय.

ठाण्यातील इमारतीला आग


ठाण्यातील इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने इमारत रिकामी  केली. आग मोठी नसली तरी धूर असल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे एमपीएससीची परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थीने आत्महत्या केल्याची दुदैवी  घटना घडली आहे.  मल्हारी नामदेव बारवकर असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मल्हारी हा 25 वर्षांचा होता. मल्हारी हा एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तयारी करत होता. या आधी दोन तीन पूर्व परीक्षेचे पेपर ही दिले. मात्र, त्यात यश आलं नाही. आज त्याने नैराश्यात जाऊन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं मल्हारीच्या घरच्यांची सांगितले आहे. मल्हारी हा गरीब घरातील मुलगा होता. मल्हारीचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात मैलकोली आहेत. 

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण, तुकाराम सुपे यांना 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना पुणे न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

मध्य रेल्वेवर रविवारी 18 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, 60 लोकल गाड्या होणार रद्द

एम आर व्ही सी घेत असलेल्या रेल्वे ब्लॉकला मंजुरी  देण्यात आली आहे. मध्य रेल्वेवर 18 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक  घेण्यात येणार आहे. दिवा ते ठाणे स्थानाकादरम्यान धीम्या मार्गिकेवर  हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  मात्र जलद मार्गिकेवर लोकल गाड्या सुरू राहणार, ज्या कळवा, मुंब्रा स्थानकांवर थांबणार नाहीत. 19 तारखेला असणार जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी ब्लॉक दरम्यान 160 लोकल गाड्या होणार रद्द होणार आहे. 

द्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा उद्या दुपारी मुंबईत

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा उद्या दुपारी मुंबईत येणार आहेत. उद्या प्रवरानगर येथील सहकार परिषदेचा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी पावणे चार वाजता मुंबईला येणार आहे.  संध्याकाळी सहा वाजता अमित शहा यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण (corporate governance) होणार आहे. हॉटेल ताज येथे संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत अमित शहा यांचा कार्यक्रम आहे. त्यानंतर शनिवारी अमित शहा यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे.

 आरक्षणासाठी शहरातीलरस्त्यावर भीक मागत OBC चे भीक मागो आंदोलन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार OBC चे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करावा या मागणीसाठी नांदेडमध्ये आज अभिनव असे भीक मांगो आंदोलन करण्यात आले. ओबीसी समन्वय समितीच्या वतीने भीक मागून जमा झालेली रक्कम सरकारला मदत म्हणून पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारने अश्याच प्रकारे निधी गोळा करून ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा जमा करून आरक्षण पूर्ववत करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.तर काही आंदोलकांनी आपण OBC असल्याचे स्वतः च्या छातीवर व अंगभर गोंदलंय . ओबीसीची नेमकी आकडेवारी किती आहे यासाठी येणारा खर्च करण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व सामान्याकडून पैसे जमा करून ते मदतीसाठी आम्ही शासनाला पाठवीत आहोत, असे ओबीसी समनवय समितीच्या वतीने सांगण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, स्थगित जागांची निवडणूक 18 जानेवारीला होणार, तर मतमोजणी 19 जानेवारीला होणार

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, स्थगित जागांची निवडणूक 18 जानेवारीला होणार, तर मतमोजणी 19 जानेवारीला होणार

नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ,महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये खडाजंगी

नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ,महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये खडाजंगी, स्मार्ट सिटी कामावरून महासभेत गोंधळ, स्मार्ट सिटी संदर्भात सुरू असलेल्या कामांवर खुद्द  महापौर  केली टीका, टीका काय करतात करावाई करा, शिवसेनेची मागणी, या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवा  केली, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते महापौर सतिश कुलकर्णी यांच्यात शाब्दिक चकमक 

अकोल्याचे पोलीस अधीक्षक श्रीधर गोविंदराजन आज ईडीसमोर सकाळी 11 वाजता चौकशीला होणार हजर





अकोल्याचे पोलीस अधीक्षक श्रीधर गोविंदराजन आज ईडीसमोर सकाळी 11 वाजता चौकशीला होणार हजर

अनिल देशमुख  प्रकरणात श्रीधर गोविंद राजन यांना चौकशीसाठी ईडीने बोलावलं आहे..

तर अनिल देशमुख प्रकरणातच काल पुणे ग्रामीणचे वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची सुद्धा ईडी कडून काल चौकशी करण्यात आली होती..


 

 



 


महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे कामकाज सूरू; कामकाज सूरू करण्यासाठी काल बैठक

महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचे कामकाज सूरू. कामकाज सूरू करण्यासाठी काल बैठक झाली. मागास आयोगाला 5 कोटींचा निधी 9 डिसेंबरला मिळाला होता. त्यातले 50 लाख रुपये कंत्राट पध्दतीने 15 कर्मचारी भरणार. परंतु पदाला मंजूरी मिळालेली नाही.


काल पुन्हा आयोगाचे ठराव घेतले. ते असे-


१) पैसे दिले परंतु पद मजुंरीला मान्यता मंजूरी द्या 
२) सॅाफ्टवेअर द्या
३) कार्यालयासाठी पुण्यात जागा मागितली
४) ५ हजार स्क्वेअर फुट जागा मागितली 
५) उर्वरित निधी द्या


उर्वरित साडे चार कोटी बाकीच्या साधन सामुग्रीसाठी दिले आहेत. 

एसटीची सेवा त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर; कोल्हापूर जिल्ह्यातील कळे गावात विद्यार्थ्यांचे आंदोलन

एसटीची सेवा त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर, कोल्हापूर जिल्ह्यातील कळे गावात विद्यार्थ्यांचे आंदोलन, ज्येष्ठ नागरिकांनी देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात घेतला सहभाग





महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक; टीईटी परीक्षेत घोटाळा केल्याचा आरोप

महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक. टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत अपात्र झालेल्या उदवारांना सुपेंनी पैसै घेऊन पास केल्याच पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांची कारवाई. 

पार्श्वभूमी

बेस्टचे सुपर सेव्हर प्लान; एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन शक्य


मुंबईत तुम्हाला रोजचा बस प्रवास करण्यासाठी आता मोबाईलच्या रिचार्जप्रमाणे प्लान निवडता येणार आहे. कारण बेस्ट प्रशासनानं प्रवाशी संख्या वाढवण्यासाठी प्रवासाचे 72 सुपर सेव्हर प्लॅन (BEST Super Saver Plan) जाहीर केले आहेत. दररोजच्या प्रवासाची गरज पाहून प्रवाशांना हे प्लान निवडता येतील. त्यामुळे प्रवास खर्चात मोठी बचत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. बेस्टच्या या नव्या नियोजनानुसार, प्रवाशांना एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन करता येणार आहे. बेस्टने प्रवाशांसाठी पैसे बचत करणारे आणि हव्या त्या मार्गांवर प्रवास करण्याची मुभा देणारे 72 प्रकारचे वेगवेगळे प्लॅन आणले आहेत. ही योजना बेस्टकडून लवकरच लागू होणार आहे. आपल्या प्रवासाच्या गरजा पाहून दररोज प्रवास करायचा आहे की, थोड्या दिवसांसाठी प्रवास करायचा आहे. याप्रमाणे आपला हवा तो प्लॅन आता निवडता येणार आहे. बेस्टचे मोबाईल अॅप आणि स्मार्टकार्डवरही योजना लवकरच लागू होणार आहे.बेस्टच्या या योजनेत पैशाची बचत होणार असून एका फेरीसाठी अवघे 1.99 रुपये लागणार आहेत. या योजनेत बेस्टच्या नेटवर्कवर कुठेही प्रवास हवा तसा प्रवास करण्याची किंवा निवडक भाडे टप्प्यात एसी किंवा नॉन-एसी बसनं प्रवास करण्याची मूभा राहणार आहे. यात प्रवाशांना एका दिवसाच्या प्लॅनपासून 84 दिवसांच्या प्लॅनची निवड करता येणार आहे.


दहावी-बारावीचं वेळापत्रक जाहीर, चार मार्चपासून परीक्षा; निकालाची तारीखही ठरली


उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर वेळापत्रक तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. चार मार्च 2022 ते सात एप्रिल 2022 या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर  15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 यादरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. कोरोना महामारीमुळे 25 टक्केंचा अभ्यास याआधीच कपात करण्यात आला आहे.  उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.