Maharashtra Breaking News LIVE Updates: अहमदनगर जिल्हयात भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

abp majha web team Last Updated: 16 Dec 2021 10:24 PM
अहमदनगर जिल्हयात भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

अहमदनगर जिल्हयात भीषण अपघात झाला आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून  10 जण  जखमी झाले आहेत.  राहुरी तालुक्यातील गुहा पाटाजवळ घटना  घडली आहे, 

विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सोमवारी अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता

विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. कालच केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सोमवारी संसद अधिवेशनात हे विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात अपघात, एका कामगाराचा मृत्यू 

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात चार ट्रकची एका मागून एक धडक झाल्याने अपघात घडला आहे. यामध्ये रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या कामगारांना ट्रकची ठोकर लागली आहे. ज्यामुळे पाच कामगार आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबादेत बनावट लसीकरणाचा प्रमाणपत्र देणारी टोळी गजाआड

औरंगाबादेत आणखी बनावट लसीकरणाचा प्रमाणपत्र देणारी टोळी पकडली. गुगल मधील एडिट पीडीएफ नावाच्या सॉफ्टवेअर द्वारे लसीकरणाच्या सर्टिफिकेट मधलं नाव, आधार, क्रमांक आणि वय बदलून घेत होते. आरटीओ कार्यालयाबाहेर एका ओमिनी गाडीतून सर्टिफिकेट दिले जात होते. पोलिसांचा छापा बनावट लसीकरणाचे सर्टिफिकेट देण्याचा साहित्य जप्त करून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

स्थगीत केलेल्या जागांची निवडणूक 21 डिसेंबरनंतर होणार


21 डिसेंबरला होणा-या निवडणूकीत ओबीसींच्या 27 टक्के जागांना निवडणूक आयोगाने स्थगीती दिली होती.  या स्थगीत केलेल्या सर्व जागा खुल्या प्रवर्गात निवडणूक आयोग वर्ग करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या जागांवरील निवडणूक 21 डिसेंबरनंतर होणार आहे. तर उर्वरित निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असून मतमोजणीची तारीख निवडणूक आयोग नव्याने जाहीर करणार आहे. दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे. या जागांचा नवीन निवडणूक कार्यक्रम लवकरच निवडणूक आयोग जारी करणार आहे. 

परभणी जिल्ह्यात 37 गावांच्या सरपंचांना नोटीस 

परभणी जिल्ह्यातील काही गावांत लसीकरण कमी झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टांकसाळे यांनी गावच्या सरपंचाना नोटीसा बजावल्या आहेत. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 कलम 39(1) नुसार कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. 

म्हाडा पेपर फूटप्रकरणी तुकाराम सुपे यांना चौकशीला बोलावले

महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीला बोलावले आहे. पुणे सायबरच्या कार्यालयामध्ये ही चौकशी सुरू आहे.

सेंट्रल टीईटीच्या परीक्षेत तांत्रिक अडचणी, विद्यार्थ्यांचे हाल

सेंट्रल टीईटीच्या परीक्षेत तांत्रिक अडचणी आल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. पेपर क्रंमाक 1 सुरळीत पार पडला.  सीटीईटीच्या पेपर क्रमांक 2 च्या वेळी अडचणी आल्या, संध्याकाळी 4 वाजता पेपर 2 सुरु होणार होता. यामुळं परगावातून आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. दरम्यान, परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली जात आहे. 


 

हा शेतकऱ्यांच्या लढाईचा विजय- नाना पटोले

सुप्रीम कोर्टाने बैलगाड़ी शर्यातीवरील बंदी उठविल्यानंतर हा शेतकऱ्यांच्या लढाईचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. यावेळी मंत्री सुनील केदार यांनी सतत पाठपुरावा केल्याचा उल्लेख नानांनी आवर्जून केला. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असंही नाना पटोले म्हणाले.

बैलगाडी शर्यती दरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे लवकर मागे घ्या-गोपीचंद पडळकर

न्यायालयाने बैलगाडी शर्यत सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता आता सरकारने बैलगाडी शर्यती दरम्यान शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे 8 दिवसांच्या आत मागे घ्यावेत, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला केली आहे.

चंद्रपूरात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

चंद्रपूर तालुक्यातील मोरवा परिसरात 6 महिने वयाच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला आहे. एखाद्या वयस्कर वाघाने केलेल्या हल्ल्यात या बछड्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वनविभाग आणि NTCA च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.

92 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार केल्याप्रकरणी सीजीएसटी अधिकाऱ्यांकडून सनदी लेखापालाला अटक

92 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार करून मालाच्या खऱ्या पावतीशिवाय 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त  बनावट देयक पावत्या तयार केल्याप्रकरणी  ठाणे (ग्रामीण) च्या सीजीएसटी अधिकार्‍यांनी  सनदी लेखापालाला अटक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी एका गृहिणीच्या   ओळखीचा वापर करून अंबरनाथ (ठाणे) येथे मेसर्स श्रद्धा इलेक्ट्रिकल.नावाची कंपनी तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे.


अटक करण्यात आलेल्या सनदी लेखापालासह  काही व्यक्ती माल कोणत्याही ठिकाणी न हलवता, बनावट आयटीसी तयार करण्याच्या टोळीमध्ये गुंतल्याचे आणि तो पुढे  पाठवत असल्याचे तपासातून  समोर आले आहे.अधिकाऱ्यांनी सनदी लेखापालाला   14 डिसेंबर 2021 रोजी दुपारी सीजीएसटी  कायद्याच्या कलम 69 अंतर्गत अटक केली. त्याला मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर  हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून  पुढील तपास सुरू आहे.

राहुल गांधी यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम, 18 जानेवारीपर्यंत दंडाधिकारी कोर्टातील प्रकरणाला स्थगिती

राहुल गांधी यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम, 18 जानेवारीपर्यंत दंडाधिकारी कोर्टातील प्रकरणाला स्थगिती


गिरगाव कोर्टातील खटल्यात 25 जानेवारीपर्यंत सुनावणी न घेण्याचे निर्देश


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख "चौकीदार चोर है" असा केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार

उत्तर भारतातील शीत लहरीचा महाराष्ट्रावरही परिणाम 
उत्तर भारतातील शीत लहरीचा महाराष्ट्रावरही परिणाम 

 

विदर्भ, मराठवाड्यातील अनेक ठिकाणांवरील तापमान १२-१४ अंश सेल्सिअसवर 

 

पूर्व विदर्भातील किमान सरासरी तापमान पुढील ७२ तासात आणखी खाली येणार

 

२० ते २३ डिसेंबरदरम्यान विदर्भातील अनेक भागातील तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज 

 

नागपुरात आज किमान तापमान १२.४ अंश सेल्सिअसवर, गोंदिया १२.५ तर वर्धा १२.९ अंश सेल्सिअस 

 

मराठवाड्यातही तापमान खालवलं, औरंगाबाद १३.८ अंश सेल्सिअस, परभणी १३.९, नांदेड १४.२ 

 

मुंबईतील सांताक्रुज वेधशाळेत किमान सरासरी तापमानाची १९ अंश सेल्सिअसची नोंद तर कुलाब्यातील तापमान २०.६ अंशावर
रत्नागिरी- पालकमंत्री अनिल परबांचा रामदास कदमांना धक्का
रत्नागिरी- पालकमंत्री अनिल परबांचा रामदास कदमांना धक्का

 

पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी तीन विद्यमान सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नारळ

 

कारवाई केलेले तीन्ही पदाधिकारी आमदार योगेश कदम यांच्या जवळचे

 

उपजिल्हाप्रमुख सुधिर कालेकर, तालुका प्रमुख प्रदिप सुर्वे, शहर प्रमुख राजू पेटकर यांना नारळ

 

राजू निगुडकर उपजिल्हा प्रमुख, किशोर देसाई विधानसभ क्षेत्र प्रमुख, रुषिकेश गुजर तालुका प्रमुख संदिप चव्हाण शहर प्रमुख यांची नेमणुक

 

नियुक्त केलेले तीघे जण माजी आमदार सुर्यकांत दळवींच्या जवळचे

 

दापोली आणि नंडणगड निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सेनेचा मोठा निर्णय
 61 लाखांच्या चलनी नोटा पोलिसांनी पकडल्या, दोघांना अटक 

नकली नोटा घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी बुधवारी रात्री सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आहे. कुणाला तरी फसविण्यासाठी मोठी डील होणार असल्याची माहिती खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळाल्यावरून खामगाव शहराजवळ सापळा रचून भरधाव जाणाऱ्या कारचा पाठलाग करून ही कारवाई केली. या कारवाई नकली आणि चलनी अश्या एकूण 61 लाखांच्या चलनीनोटा पकडल्या आहेत. 
 या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पोहोचल्या

मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पोहोचल्या, थोड्याच वेळात रुपाली ठोंबरे पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश


प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित

रत्नागिरी- रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्र्यांची सुरक्षा वाढवली

रत्नागिरी- रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्र्यांची सुरक्षा वाढवली, 


रत्नागिरी जिल्हा शासकीय विश्राम गृहात अनिल परब यांचा मुक्काम


मुक्कामाच्या ठिकाणाहून १०० मीटर अंतरावर एसटी आंदोलनक


परबांचा मुक्काम असलेल्या विश्राम गृहाला 50 पोलिस कर्मचाऱ्यांचे कडे


सहा वरिष्ठ पोलिस अधिकारी देखिल काल रात्रीपासून परब यांच्या सुरक्षेसाठी तैनात 


एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा किंवा इतर पर्याय यावर उद्या निर्णय

साधारणपणे 30 टक्के विद्यार्थ्यांची मुंबईतील शाळांमध्ये उपस्थिती

मुंबई महापालिका शाळेत पहिल्या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 1,80,640,  एकूण 6,53,239 विद्यार्थ्यांच्या तुलनेत फक्त साधारणपणे 30 टक्के विद्यार्थ्यांची मुंबईतील शाळांमध्ये उपस्थिती , तर फक्त 36 टक्के पालकांची संमती पत्र मुंबईतील शाळांना प्राप्त अजूनही 64% पालकांची संमती प्रतीक्षेत

निवडणुका पुढे ढकलण्याच्या संदर्भात राज्य सरकारचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोग फेटाळण्याची शक्यता

निवडणूका पुढे ढकलण्याच्या संदर्भात राज्य सरकारचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोग फेटाळण्याची शक्यता,


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई करणार असल्याचं निवडणूक आयोगाचं मतं,


उद्या पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत निवडणूक आयोगाला येण्याची शक्यता,


त्यानंतर निवडणूक आयोग आपली भूमिका घेणार ,


त्यामुळे राज्य सरकाराला पुन्हा एकदा धक्का?

कोल्हापूर शहरात पुन्हा गवा शिरला

कोल्हापूर शहरात पुन्हा गवा शिरला..


सीपीआर चौकातून गवा जयंती नाल्याच्या दिशेने जाणता दिसला


नागाळा पार्क, विवेकानंद कॉलेज परिसरात देखील आढळून आला गवा


दोन गव्यांनी शहरात प्रवेश केल्याची माहिती

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये


Pune School : पुण्यातील शाळा आजपासून सुरू, तब्बल दीड वर्षांनी शाळांची घंटा वाजणार
 
Maharashtra School Reopen Update : पुणे शहरातील शाळा आजपासून (Pune Pimpri Chinchwad School Open Updates) सुरू होणार आहेत. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून यासाठी खास तयारी केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व प्रकारच्या खबरदाऱ्या बाळगून शाळा सुरु होणार आहे.  विद्यार्थ्यांसाठी तशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळे वर्ग स्वच्छ केले आहेत. सॅनिटायझरची फवारणी सुद्धा केली गेली आहे.


पिंपरी चिंचवड शहरातील शाळाही सुरु होणार
पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आजपासून सुरू होणार. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तसं परिपत्रक काढलेलं आहे. कोरोनाच्या ओमयक्रोन व्हेरियंन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेण्याच्या सूचना ही शाळेला देण्यात आल्या आहेत.



Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष


Bullock Cart Race : Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला. त्यानंतर आज पेटा न्यायालयात बाजू मांडणार आहे. पेटाच्या युक्तिवादानंतर निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मागच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. ही बंदी आतापर्यंत कायम आहे. आता राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर काल सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाला, त्यानंतर आज पेटा आपली बाजू मांडणार आहे. 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.