Maharashtra Breaking News LIVE Updates : भाजप नेते किरीट सोमय्या यांना बीड दौऱ्यापूर्वी धमकी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये
भाजपच्या मुलुंड येथील नगरसेविका रजनी केणी यांच्या मुलांसह तिघांवर नवघर पोलीस ठाण्यात खंडणी आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या एका कंत्राटदराने हा गुन्हा दाखल केला आहे. केणी यांच्या विभागात असलेले एक काम ऑनलाइन टेंडर मध्ये त्या कंत्राटदारला लागले होते. मात्र हे टेंडर त्याने मागे घ्यावे म्हणून केणी यांचा मुलगा नमित केणी याने त्या कंत्राटदारला कार्यालयात बोलावून धमकावले आणि टेंडर मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर मनोज जाधव आणि गोविंद जाधव यांच्या मदतीने त्याला बळजबरीने पालिका टी विभागात नेण्यात आले आणि तिथे कंत्राटमागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप या कंत्राटदारने त्याच्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी आता नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नवघर पोलीस करीत आहेत.
अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं शिकार केल्यामुळे घबराट पसरली आहे. अंबरनाथ शहरालगतच्या वसत गाव परिसरात महिनाभरात तिसऱ्यांदा बिबट्याने दर्शन दिलं असून स्थानिक ग्रामस्थांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. त्यामुळे या परिसरात मोठी घबराट पसरली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाबाबत काढलेला अध्यादेश रद्द केला. यानंतर हा निर्णय अतिश दुर्देवी असून ओबीसीसह इतर मागासवर्गीय समुदायावर अन्याय करणारा आहे. तसंच केंद्र सरकारने इंपेरिकल डाटा न दिल्यामुळे ही स्थिती उद्भवली. आता काहीही करू पण आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
अमरावती शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथे एटीएस पथकांनी दोघांना गांजा विकताना ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्यांच्याकडून 53 किलो गांजा ज्याची किंमत साडे पाच लाख रुपये इतकी आहे. अमरावती पोलीसांना याची काहीही कल्पना न देता केलेल्या या कारवाईने शहर पोलिसात चांगलीच चर्चा सुरू आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांना व्हॉट्सअप मेसेजवर धमकी देण्यात आली आहे. उद्या किरीट सोमय्या हे बीड जिल्हयात जाण्याआधीच त्यांना धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडे सोमय्यांनी तक्रार केली आहे.
मागील 24 तासांत मुंबईत 238 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 7 लाख 45 हजार 200 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. ज्यामुळे आता एकूण सक्रिय रुग्ण 1 हजार 797 इतके झाले आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 2 हजार 514 दिवसांवर पोहोचला असून रुग्ण वाढीचा दर 0.03 टक्के इतका झाला आहे.
भिवंडी कल्याण या दोन शहरांना जोडणाऱ्या कल्याण रोड वरील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर बुधवारी दुपारी एका चालत्या अॅक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतला .
प्रसंगावधान बाळगत चालकाने उडी मारल्याने ते बचावले असून संपूर्ण ऍक्टिव्हा आगीत जळून खाक झाली आहे .या घटनेची महिती कळताच वाहतूक व स्थानिक शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षात आणलेल्या पाण्याच्या मदतीने आग विझविली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनावर मेस्मा लावण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. बैठकीत कायदेशीर बाबी तपासून घेतली जात असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. मेस्मा लावण्याबाबत थोड्याच वेळात परिवहन विभागाकडून खुलासा होण्याची शक्यता आहे.
भाजपला बदनाम करण्यासाठी हा डाव रचला गेला आहे. आयुक्तांना राजकीय पक्षांसाठी काम करायचे असेल तर त्यांनी एखाद्या पक्षाचे तिकीट घेऊन निवडणुकीला उभं रहावं. असा आरोप महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनी केला आहे.
राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरु थेट राज्यपाल नियुक्त करू शकणार नाहीत. राज्य सरकारच्या शिफारशीनुसारच कुलगुरु नियुक्त केले जाणार आहेत. कायद्यात बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी.
कोकणातील पूरपरिस्थिती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बैठक पार पडली आहे. वशिष्ठ नदीतील गाळ काढण्याच्या कामाला उद्यापासून होणार सुरुवात होणार आहे. तीन टप्प्यात कोकणातील सर्व नद्यांमधील गाळ काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. गाळ काढल्यानंतर पूर रेषा निश्चित केली जाईल. या कामांसाठी लागणारा निधी तात्काळ जलसंपदा विभाग उपलब्ध करणार आहे. कोकणातील पूर परिस्थितीनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
बैलगाडी शर्यती संदर्भात उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आज पूर्ण तर उद्या पेटा आपली बाजू मांडणार आहे. उद्या सकाळच्या सत्रात सुनावणीला सुरुवात होणार आहे. पेटाच्या युक्तिवादानंतर निकाल अपेक्षित आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत, राज्य सरकारनं दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होतेय. मात्र सुनावणीपूर्वी केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करत राज्य सरकारला झटका दिलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.कारण नव्यानं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही इम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिलाय. एकीकडे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचं घोडं इम्पिरिकल डेटाअभावी अडलंय. अशात पुन्हा एकदा केंद्र सरकारनं नकारघंटा वाजवल्यानं महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात कोणती बाजू मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानं ओबीसी आरक्षित जागा वगळून अन्य वॉर्डातील निवडणुका होत आहेत. सरकारनं या निवडणुका एकतर एकत्र घ्याव्यात किंवा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केलीय.
अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. त्यांना ईडीने 17 डिसेंबरला चौकशीसाठी मुंबईइथं बोलावलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रींग प्रकरणात जी. श्रीधर यांचे नाव आहे. तर 17 डिसेंबरच्या ईडी चौकशीला श्रीधर उपस्थित राहणार आहेत.
राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला'. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार सध्या चर्चा आहे.
पार्श्वभूमी
आनंदवार्ता! नव्या वर्षात सिडकोच्या पाच हजार घरांसाठी लॉटरी निघणार
परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी आदी ठिकाणी ही घरे असणार आहेत. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांची ‘महागृहनिर्माण’योजना आहे. या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठीच्या लॉटरीची प्रक्रिया जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
विनामास्क फिरणाऱ्या आमदाराला 200 रुपयांचा दंड, मंत्रालय पोलिसांची कारवाई
राज्यात दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही, लोकप्रतिनिधींना त्या वास्तवाचा सोयीस्कर विसर पडत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क फिरणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर तर कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आहेत. मंत्रालयातून बाहेर पडताना त्यांनी मास्क परिधान केलेला नसल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी 200 रुपयांचा दंड ठोठावला. त्या पार्श्वभूमीवर, आमदारांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांचं मंत्रालयात कौतुक होत आहे. महाविकास आघाडी महावसुली करत असल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रावर ओमायक्रॉनचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.भारतातील नागरिक आता मास्कचा वापर करणे कमी करत आहेत. खासकरून ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनी मास्कचा वापर करणे कमी केलं आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. जगभरातली परिस्थिती पाहून तरी भारतीय लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचं निती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -