Maharashtra Breaking News LIVE Updates : केंद्र सरकारने केंद्रीय कृषी कायदे रद्द, राज्य सरकारही प्रस्तावित केलेले कायदे मागे घेणार

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 14 Dec 2021 07:25 PM
रुपाली पाटील ठोंबरेंचा मनसेला राजीनामा

मनसेच्या माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर असतानाच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे.  

वसई, विरार महापालिका हद्दीत अखेर ओमायक्रॉनचा शिरकाव

वसई, विरार महापालिका हद्दीत अखेर ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून आज नालासोपाऱ्यात  एक रुग्ण सापडला आहे. बाधित रुग्ण हा सध्या  होम कोरोनटाईन असून, त्याला कोणतेही लक्षण नाहीत.  नालासोपारा ते मुंबई असा तो प्रवाशी असून, कामाला जाण्यासाठी त्याने टेस्ट केली असता, त्याचा  ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  वसई विरार महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय कृषी कायदे रद्द, राज्य सरकारही प्रस्तावित केलेले कायदे मागे घेणार

केंद्र सरकारनं केंद्रीय कृषी कायदे रद्द केल्यानंतर राज्य सरकारही प्रस्तावित केलेले कायदे मागे घेणार आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत राज्य सरकारने काही बदल करत नविन कृषी कायदे आणणार होते. मात्र, केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकारही हे प्रस्तावित कायदे मागे घेणार आहे. 


 


 

गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्विकारल्यानंतर अमित शाह  यांची ही पहिली सहकार परिषद आहे. 18 डिसेंबर अमित शाह अहमदनगरला परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. या वेळी सहकार क्षेत्रातील अनेक व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

मलाडच्या अथर्व महाविद्यालयात आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना

मलाडच्या अथर्व महाविद्यालयात आग लागली आहे. महाविद्यालयात विद्यार्थी आहे की नाही याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत 

प्रशासनाची चिंता वाढली, दक्षिण आफ्रिकेतून नाशिकमध्ये आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

पश्चिम आफ्रिकेच्या माली देशातून नाशिकमध्ये आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तीन दिवसांपूर्वी तीन नागरिक आफ्रिकन नागरिक कामानिमित्त नाशिकमध्ये दाखल झाले होते. यापैकी एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या 12 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. 
 

महाराष्ट्रातल्या बारा आमदारांच्या निलंबनाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार; पुढची सुनावणी 11 जानेवारीला होणार

महाराष्ट्रातल्या बारा आमदारांच्या निलंबनाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार दिला आहे. पुढची सुनावणी 11 जानेवारीला होणार असून आजच्या सुनावणीनंतर राज्य सरकारला नोटीस मात्र तूर्तास कुठलाही आदेश नाही.


 





अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र; पत्रात जीवे मारण्याच्या धमकीसह कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याची धमकी

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र मिळाले आहे. या पत्रात जीवे मारण्याच्या धमकीसह कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्र लिहिणाऱ्याने स्वतःला नौदलात कर्नल असल्याचं केलं नमूद केलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप केल्याने आपण पत्र लिहीत असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे.  जर समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही तर कार्यकर्त्यांसह मलिक यांच्या घरावर हल्ला करणार असल्याचा इशारा या पत्रातून दिला गेला आहे.मंत्री नवाब मलिक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून तपास करण्याची मागणी करणार आहेत. 





राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील सभेसाठीची याचिका मागे

राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील सभेसाठीची याचिका मागे . राज्य सरकारकडून उत्तर न मिळाल्यानं मुंबई काँग्रेसनं हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी बिनाशर्त  याचिका मागे घेतली. राहुल गांधी यांचा मुंबईत 28 डिसेंबरला मेळावा आयोजित केला आहे. 





पार्श्वभूमी

राहुल गांधींचा मुंबई दौरा; शिवाजी पार्कवरील सभेसाठी काँग्रेसची हायकोर्टात धाव; आज याचिकेवर सुनावणी


आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होत आहे. 28 डिंसेबरला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मात्र राहुल गांधीच्या सभेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसकडून राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या शिवाजीपार्क येथील सभेला अजूनही राज्य सरकारकडून काँग्रेसला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज (मंगळवारी) या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे. येत्या 28 डिसेंबरला कॉंग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर (Shivaji Park, Dadar) सभा घेणार आहेत. शिवाजी पार्कवर होणारी ही काँग्रेसची पहिली सभा नसली तरी राहुल गांधींची मात्र पहिलीच सभा आहे. यापूर्वी 2003 आणि 2006 मध्ये काँग्रेसची सभा सोनिया गांधींच्या नेतृत्वात झाली होती. त्यानंतर 2018  मध्ये राहुल गांधींच्या सभेकरता या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली गेली. मात्र, ती नाकारली गेली होती.


नागपूरमध्ये चमत्कार होणार का? विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतमोजणी


नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत या दोन्ही जागांवर होणार आहे. या निवडणुकीत काही चमत्कार होणार की अपेक्षित निकाल लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषत: नागपूरच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काही वेळेत या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचा पाठिंबा मिळालेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात सामना आहे. तर अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचं आव्हान आहे. बाजोरिया यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. तर, त्यांचे वर्चस्व मोडण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर, महाविकास आघाडीने बाजोरिया यांच्या विजयाचा दावा केला आहे.  हा मतदारसंघ 1998 पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत शिवसेनेकडे मतदारांचं बहूमत नसतांनाही त्यांनी विजयाचा 'चमत्कार' घडवून आणला आहे. यातील तीन टर्म शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता यावेळी गोपीकिशन बाजोरिया हे सलग चौथ्यांदा विजयासाठी प्रयत्नशील आहेत.


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.