Maharashtra Breaking News LIVE Updates : सावरकर नगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 34 जणांना चावा
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
खासदार राहुल रमेश शेवाळे साहेब यांचे वडील श्री.रमेश शेवाळे यांचे आज सायं.७.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना.
आष्टी तालुक्यातही देवस्थान जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्या नंतर आता या प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एन्ट्री केली आहे. एसआयटीकडे केवळ विशिष्ट प्रकरनेच न देता बीड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी वक्फ आणि देवस्थान जमिनीचे हस्तांतरण झाले आहे, त्या सर्व प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी तसे पत्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून यात तब्बल ३२ जमिनींचा उल्लेख करण्यात आला आहे.
ठाण्यातील सावरकर नगर, म्हाडा आणि पाटीलवाडी भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने सकाळ पासून सुमारे 34 जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. यात तीन ते चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. या कुत्र्याला पकडण्यासाठी आरोग्य विभागाची गाडी पाचरण करण्यात आली असली तरी देखील तो सांयकाळपर्यंत सापडला नव्हता. ठाणे महानगरपालिकेच्या पशु विभागाला तक्रार देऊन डॉग व्हॅन आणण्यात आली होती. मात्र तरीही कुत्रा त्यांच्या जाळ्यात सापडत नव्हता. अखेर संध्याकाळी साडे सातनंतर या कुत्र्याला पकडण्यात यश आले. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने देखील प्रयत्न केले. या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहेत.
राज ठाकरे औरंगाबादेत दाखल.. मनसैनिकांनी केले ढोल ताशांच्या गजरात स्वागत .उद्या दिवसभर राज ठाकरे आहेत औरंगाबाद दौऱ्यावर.मराठवाड्यातील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार.21 महिन्यानंतर राज्य औरंगाबादेत..
राज ठाकरेंचे स्वागत अन् शहरवासीयांना मनस्ताप..
औरंगाबादेत महावीर चौकात सायंकाळी पाच वाजेपासूनच मनसैनिक राज ठाकरे यांच्या स्वागताला उपस्थित होते. ढोल, ताश्यासह चौकाचा एक कोपरा व्यापला होता. वाळूज औद्योगिक वसाहतीकडून येणाऱ्या कामगार वर्गाची मात्र मोठी कोंडी झाली. याचवेळी वाहतुक सिग्नल बंद असल्याने पोलिसांवर मोठा ताण निर्माण झाला. तब्बल जवळपास अडीच तास शहरवासीयांना हा मनस्थाप सहन करावा लागला..
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरची कारवाई आज टळली आहे. तीन दिवसात कामावर हजर न झाल्यास कडक कारवाई करण्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी इशारा दिला होता. आज या अल्टीमेटमची मुदत संपत आहे. मात्र आज कडक कारवाईबाबत कोणताही निर्णय नाही.
ज्या व्यक्तींनी लसीकरणाचा एकही डोस घेतलेला नाही किंवा एक डोस घेऊन पुढील डोस घेण्याची तारीख होऊन गेल्यावरही दुसरा डोस घेतलेला नाही, अशा व्यक्तींना ५०० रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार.... दंडामधील जमा झालेली ५० टक्के रक्कम ही पोलीस प्रशासन व 50 टक्के रक्कम मनपा फंडात जमा करण्यात येणार.... 15 तारखेपासून नियम लागू होणार आहे, असा निर्णय ओरंगाबाद महानगरपालिकाने घेतलाय.
आजपासून (13 डिसेंबर) लसीकरणाची वेळ वाढवण्यात आली आहे. आता लसीकरण संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत लसीकरण होणार आहे. कामावरून घरी येणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे, विशेषत: रेल्वे स्थानकाच्या नजीक ही लसीकरण केंद्रे असणार आहेत. या मुळे चाकरमान्यांना याचा फायदा होणार आहे
अंधेरीतल्या गुंदवली परिसरात लिफ्ट कोसळून अपघात झाला. या घटनेत 4 ते 5 जण जखमी झालेत. दुपारी 12 च्या सुमारास महाकाली दर्शन सोसायटीत ही लिफ्ट कोसळल्याची घटना घडली.. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
कोल्हापुरात ओमायक्रॉनचा पहिला संशयित रुग्ण आढळला
ऑस्ट्रेलियामधून आलेल्या 45 वर्षीय नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
एकूण 5 जण ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आले होते
4 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह
संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवले पुण्याला, अहवालाच्या प्रतीक्षेत
ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून जिल्ह्यात एकूण 432 आलेत त्यापैकी 330 यांची तपासणी पूर्ण
300 जण निगेटिव्ह 30 जणांचे अहवाल अजूनही प्रतीक्षेत
ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्या दुपारी दोन वाजता होणार आहे. सोमवारी कामकाजाच्या यादीनुसार वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने आता उद्या सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिका कोर्ट एकत्रित ऐकणार आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होईल. रतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली.
लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मुंबई लोकलनं प्रवासाची मुभा देण्यावर ठाम आहात का?
मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
बुधावरी होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
लोकल प्रवासासाठी लसीकरण सक्तीचं करणं हा मुलभूत अधिकारांवर हल्ला असल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका
प्रलंबित असलेले वनहक्क दावे मंजूर करण्याच्या मागणीसाठी आज वनहक्क दिना निमित्त कल्याण, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि भिवंडी याभागातील शेकडो आदिवासी बांधवांनी श्रमिक मुक्त संघटनेच्या वतीने कल्याणच्या प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जोर्पयत हे दावे मंजूर करण्याचे लेखी आश्वासन दिले जात नाही. तोर्पयत हा ठिय्या हटविला जाणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयास देण्यात आला आहे.
श्रमिक मुक्ती संघटनेच्या प्रमुख इंदूताई तुळपुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. कल्याण मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि भिवंडी परिसरातील 256 दावे प्रलंबीत आहेत. तसेच 456 जणांनी अपील केले आहे. त्यांच्या अपीलावरही अद्याप निर्णय झालेला नाही. वनहक्कांच्या नोंदी केल्या जात नसल्याने वहक्कासंदर्भातील विकास योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. वनहक्क कायदा हा 2006 साली मंजूर करण्यात आला. हा कायदा मंजूर होऊन 15 वर्षे उलटून गेली तरी अद्याप वनहक्कांच्या नोंदी केल्या जात नाही. दावे प्रलंबित ठेवले जातात. तसेच अपीलात गेलेल्यांच्या दाव्यावरही निर्णय घेतला जात नाही. यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे तुळपूळे यांनी सांगितले. प्रांत कार्यालयाने लेखी माहिती दिली नाही. तर पुढील आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचा इशारा तूळपुळे यांनी दिला आहे. याबाबत नायब तहसीलदार रिताली परदेशी यांनी सांगितले की, आज वनहक्क दिना निमित्त या आदिवासींचे आंदोलन आहे. वनहक्कांचे दावे मंजूर करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. दोन तालुक्यातील किती प्रकरणो मंजूर झाली याची माहिती तयार आहे. प्रांत अधिकारी यासंदर्भात संबंधित संघटनेला माहिती देणार असल्याचे सांगितले
कोविड सेंटरमधून पसार झालेला चोरटा राजकुमार बिंद याला 7 महिन्यांनी अटक, डोंबिवली मानपाडा पोलिसांची कारवाई , मे 2021 मध्ये चोरीच्या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी केली होती अटक , कोव्हिड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने उपचारासाठी भिवंडी येथील टाटा आमंत्रण येथे केलं होतं दाखल ... 10 मे रोजी पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता , मानपाडा पोलिसांनी 7 महिन्यांनी दादरा नगर हवेली येथून केली अटक
#BREAKING : मुंबई : अंधेरीतील महाकाली दर्शन सोसायटीची लिफ्ट 10 व्या मजल्यावरुन कोसळली, 4 ते 5 जण गंभीर जखमी, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी, बचावकार्य सुरु https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA
तरुणाचा जीव गेल्यावर वन विभागाला आली जाग
गव्याला ट्रँक्युलर करण्यासाठीची गण कोल्हापुरात आणली
गव्याला आटोक्यात आणण्यासाठी प्रशिक्षकासह गण आणली कराडमधून
गडचिरोली- विजय-किरण फाउंडेशनच्या वतीने शालेय व माहाविद्यालयातील 5 किमी अंतरावरील शाळेमधील विद्यार्थीनींना ई सायकल वाटप करण्यांचा कार्यक्रम अखिल भारतीय काँग्रेस कमीटीच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या हस्ते 14 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे आयोजित करण्यांत आले होतं मात्र काही अपिरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
कंगनाला हायकोर्टाचा दिलासा, 25 जानेवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही, 22 डिसेंबरला कंगना खार पोलीस स्थानकांत चौकशीसाठी हजर होणार
दीपक दळवी यांना महामेळाव्याचा स्थळाजवळ काळे फासले. व्यासपीठाच्या मागच्या बाजूने येत असताना कन्नड संघटनांच्या गुंडांनी दीपक दळवी यांना काळे फासले. दीपक दळवी यांना काळे फासल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगाव बंदचा आदेश.मराठी भाषिकांनी आपली आस्थापने बंद ठेवून बंदला पाठिंबा देण्याचे माजी आमदार मनोहर किणेकर यांचे महामेळाव्यात आवाहन.
महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून पुन्हा एकदा मराठी भाषिकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न. व्यासपीठ रस्त्यावर उभारले आहे असे सांगून व्यासपीठ पोलीस बंदोबस्तात हटवण्याचा पालिका कर्मचाऱ्यांचा प्रयत्न.समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यासपीठ हटवण्याचा आदेश दाखवा अशी मागणी केल्यावर पोलीस आणि मनपा कर्मचारी झाले निरुत्तर.
राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे जनहित कक्ष आणि विधी विभाग मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले
यानंतर राजगड पक्ष कार्यलयात पक्ष प्रवेश आणि मनविसे च्या वेबसाईटचे उद्घाटन
"आपण ते वाईट दिवस आता विसरायला हवेत" - मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता
आम्ही हे जाहीरपणे सांगू शकतो की,महाराष्ट्र कोविड 19 चा मुकाबला करण्यात अग्रस्थानी राहीलाय - हायकोर्ट
कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदीवाल चौकशी आयोगासमोर उपस्थित, थोड्याच वेळात सचिन वाझे देखील उपस्थित राहणार
कोल्हापुरातील चंदगड आगारातील वाहतूक नियंत्रकाला संपकरी कर्मचाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संपात सहभागी होत नसल्याचा राग मनात धरून ही मारहाण करण्यात आली. चंदगड पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
मुंबईतील एका 25 वर्षीय अभिनेत्रीवर पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेत्रीच्या घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. वर्सोवा पोलिसांकडून २५ वर्षीय महिलेविरोधात ३२६, ३५४ ब आणि ५०४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटना ही ३-४ दिवसांआधीची असल्याची माहिती. आज ह्या महिलेला दिलेली पोलिस कोठडी संपत असल्याचं देखील कळतंय.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ग्रँड हयातमधील पार्टीत सारा अली खान, सारा तेंडुलकरसह 'ही' दिग्गज मंडळी, आयोजकांवर कारवाई
मुंबई : मुंबईतल्या प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत, कॅनेडियन रॅपर एबी ढिल्लोनच्या गाण्यावर तरुणाई थिरकली होती आणि कोरोनाला गर्दीमध्ये चिरडणाऱ्यांमध्ये बॉलिवूडची स्टार मंडळी आघाडीवर होती. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ग्रँड हयात हॉटेलमधल्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर, प्रसिद्ध होस्ट शिबानी दांडेकर, तसंच सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही मंडळी हजर होती. त्यांना कॅमेऱ्यानं कैद केलं आहे. या कार्यक्रमात अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगची देखील ऐशीतैशी करण्यात आली. खरं तर सेलिब्रिटींना तरुणाई फॉलो करते. सेलिब्रिटींनी कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावावी हा त्यांचा खासगी प्रश्न आहे. मात्र कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यानं ही स्टारमंडळी टीकेचे धनी ठरताहेत.. दरम्यान कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे. लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित केलेल्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेनंतर म्हाडाच्या पेपरफुटीचे मराठवाडा कनेक्शन, प्रकरण असं घडलं...
आरोग्य विभागा पाठोपाठ आता म्हाडाच्या परीक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आले आहे. यातलं मराठवाडा कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेतही जालना मधील दोन आणि औरंगाबाद येथील एका व्यक्तीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. आताच्या प्रकरणात औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमाने स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचे समोर आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -